लाजाळू का लाजतो? (लाजाळू झाड माहिती)

लाजाळू झाड माहिती

touch-me-not

लाजाळू का लाजतो? (लाजाळू वनस्पती माहिती)

लाजाळूचे झाड सर्वांच्या परिचयाचं आहे. पण हात लावताच का आपलं अंग चोरून बसतो .? व परत कसा आपल्या मूळ परिस्तिथी येतो.? हे बरेच लोकांना माहिती नसेल किंवा असेल, तरी इतकं खोलवर माहिती नसेल.
तर चला मग आज त्याबद्दल माहिती घेऊया…!

लाजाळू यालाच इंग्लिश मध्ये Shameplant (लाजाळू), touch me not plant असे म्हणतात. यालाच बियनॉमिनाल मध्ये मिमोसा पुडिका (Mimosa pudica) असे देखील म्हणतात.

पुडिका हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ लाजाळू. तसेच त्याला झोपाळू वनस्पती देखील म्हणतात.

या वनस्पतीला आपण स्पर्श करताच कोमीजतो म्हणजेच लाजल्या सारखा आपले पाने मिटवून घेतो. व थोड्या वेळाने परत आपल्या पहिल्या स्थितीत येतो. यामागे शास्त्रीय कारण आहे…..!

याच्या पानात टर्गर द्रव असतो. त्या टर्गर दाबामुळे लाजाळूचे पाने ताट असतात. आणि जेव्हा त्याला आपला किव्हा इतर कुठल्या वस्तूचा स्पर्श होतो. तेव्हा यातील टर्गर चा दाब कमी होतो, व त्यातील पानातील द्रव खाली जातो. त्यामुळे ती वनस्पती कोमीजते. जणू काही ती लाजत असल्याप्रमाणे आपल्याला भासते.

लाजाळूला गुलाबी रंगाचे फुले येतात. बघायला ते खूप सुरेख दिसतात. लाजाळू हे झाड मुख्यतः दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका व मध्य अमेरिका इथे सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. तसेच आशिया खंडात भारत, नेपाळ,श्रीलंका, जपान इत्यादी ठिकाणी आढळतो.

जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ विल्हेल्म फेफर ला १७ शतकात प्रयोग दरम्यान असे आढळले, की या वनस्पतीला पाण्याचा थेंब व बोटाच्या स्पर्शाचा यावर परिणाम होतो.

सर्व शास्त्रज्ञ लाजाळू का लाजतो हे जाण्यासाठी त्याच्या मागे लागले होते. लाजाळूवर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी खूप विचित्र विचित्र प्रयोग केले. त्यावर विद्युत सिग्नलिंग प्रयोग केले गेले आणि पाने कशी मिटतात त्याचे निरीक्षण केले.

तसेच आत्ताचा प्रयोग २०१७ मध्ये न्यूरो सायंटिस्ट ग्रेग गेगे याने केला होता. ज्याने मिमोसा पुडिकाला डियोनेआ जोडले.

shameplant

दोन्ही वनस्पतींमध्ये विद्युत वायरिंगला जोडण्यात आले होते. आणि त्यांना इलेक्ट्रोकार्डियोग्रामशी जोडले गेले होते व दोन्ही वनस्पती पासून मिळणाऱ्या प्रतिसादाचे निरीक्षण करण्यात आले आणि आत्ता सुद्धा लाजाळूवर प्रयोग होतात. तर वरील पोस्टमूळे तुम्हाला आयडिया आलेली असेल की “लाजाळू का लाजतो” ते.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद…

  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share