माती विना शेती | Hydroponics म्हणजे काय ?

हायड्रोपोनिक शेती विषयी माहिती

aquaculture

माती विना शेती (Hydroponics)

नावातच माहिती दडलेली आहे..! “माती विना शेती…” म्हणजेच मातीचा वापर न करता शेती.

तुम्ही म्हणाल. “हे काय नवीन आत्ता….?”

पण ही पद्धत नवीन नसून खुप जुनी आहे. फक्त आत्ता कुठे या पद्धतीचा वापर करून आपण शेती करायला चालू केलेली आहे.
ही पद्धत तशी इस्राईल मधली आहे. पण आत्ता याचा वापर जगात बऱ्याच देशात करायला चालू झालेला आहे. जसे की इंग्लंड, अमेरिका आणि आत्ता त्यात आपल्या देशाने पण भर घातली आहे.

तर आज जाणून घेऊया “माती विना शेती” नक्की काय प्रकार आहे.

मी आधी सांगितल्या प्रमाणे यामध्ये मातीचा वापर न करता शेतीचे उत्पन्न घेता येते. यालाच माती विना शेती असे म्हणतात. तसेच इंग्रजीत याला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.

indoor garden system

हे वाचलंत का? –
* लाजाळू का लाजतो?

* गुळवेल चे फायदे आणि उपयोग

Hydro म्हणजे पाणी
आणि ponics म्हणजे कार्यरत
पाण्यावर कार्यरत असलेले शेती.


परत तुम्हाला प्रश्न पडला असेल की “माती न वापरता शेती किव्हा कुठलं झाड तरी लावता येत का…?”

“पण ते शक्य आहे….!” कारण झाड जगवायला मातीची आवश्यकता नसून त्याला घटकांची आवश्यकता असते.

आणि ते घटक झाडाला दुसऱ्या माध्यमातून जरी मिळाले. तरी झाड जगतो सुद्धा आणि त्याला फळ , फुल लागतात सुद्धा. या पद्धतीच्या शेतीचा फायदा असा की, याला मातीची म्हणजेच जागेची जास्त आवश्यकता नसते.

ही पद्धत वापरून आपण आपल्या टेरेस वर अंगणात किव्हा एखाद्या भिंतीवर सुद्धा भाज्या उगवू शकतो. माती विना शेती ही पद्धत सोपी व स्वस्त असून यापासून जे पीक घेणार जसे की पालक, टोमॅटो, मेथी, इत्यादी हे आरोग्यास चांगले असतात.

या पद्धतीत रासायनिक औषधांचा वापर नसल्याकारणाने या पद्धतीत घेतलेले पीक हे विषविरहित असत.

ही पद्धत आत्ता पुढे चालून काळाची गरज होणार आहे. कारण वाढती लोकसंख्या, खूप प्रमाणात शेतीत औषध चा वापर करून दूषित झालेली जमीन तसेच जमिनीची टंचाई निर्माण झाल्यामुळे ही पद्धत आपण लवकरात लवकर आत्मसात करायला हवी.

एक विषेश म्हणजे नापीक जमिनीवर सुद्धा आपण पीक घेऊ शकतो.

याचा अजून असा फायदा आहे की, वनस्पतीची वाढ कमी असून याला फळ, फुल लवकर येतात.

मुंबई सारख्या शहरात जागेची तर खूपच टंचाई आहे. तर त्यासाठी आपण व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे एकवर एक शेतीसाठी मजला चढून त्यात शेती करू शकतो आणि आपल्याकडे टेरेस तर असतच.

टेरेस का फक्त पतंग उडवायला व कपडे वाळवायला नसून त्यापासून आपण असा पण फायदा घेऊ शकतो. तर आत्ता आपण पाहूया की माती विना शेती कशी केली जाते.

Hydroponic चे प्रकार

१) ऍक्टिव्ह पद्धत

२) पॅसिव्ह पद्धत

माती विना शेती (Hydroponics) |hydroponics in marathi

hydroponics-in-marath
Image Source – AGRITECTURE

१) ऍक्टिव्ह पद्धत:- या पद्धतीत पाण्याच्या साहाय्याने पीक घेतल जात. म्हणजे यामध्ये पाणी सतत रिसायकलिंग (परत परत पाणी फिरून येणे.) ही पद्धत ऍक्टिव्ह मध्ये मोडते.

२) पॅसिव्ह पद्धत:- या पद्धतीत हैड्रोस्टोन व कोकोपीट चा वापर करून पीक घेतल्या जात.

दोन्ही पद्धतीत फक्त झाडाला आवश्यक घटक पोचवायचे असतात.

वरीर दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला लक्षात आलेलच असणार की माती विना शेती ही शक्य आहे. तुम्ही ही स्वतः थोड्या जाग्यात का होईना पण ही शेती करायला हवी.

कारण वाढत्या कीटकनाशकांचा वापरामुळे विषारी झालेल्या पालेभाज्या पेक्षा अश्या पद्धतीने बिनविषारी पालेभाज्या पिकवून खाव्यात. म्हणून ही पद्धत आवर्जून आत्मसात करा. खास करू महिलांनी यात पुढाकार घ्यायला हवा.

वरील दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. अश्याच छान छान माहिती साठी वाचत राहा.
………महितीलेक…….

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻