या प्रकारे करा! लागवड, काकडी कधीच कडू होणार नाही.

काकडी लागवड

kakdi lagwad

काकडी या पिकाला व फळाला एक सलाड म्हणून व जेवण करतांना तोंडी लावायला एक वेगळीच ओळख आहे. काकडी आपल्या कडे संपूर्ण देशात शेतकरी पेरतात.

या पिकाला जास्त मागणी ही सलाडसाठी उन्हाळ्यात राहते. आपल्या कडे उन्हाळा मध्ये लग्न व कार्यक्रम मध्ये काकडीला कच्ची खान्याकरिता खूप मागणी राहते.

काकडी खाल्याने उन्हामध्ये आपले शरीर थंड राहण्यास मदत होते व काकडी मुळे कमी पाणी प्यावे लागते. यामुळे काकडी ही आपल्या कडे उन्हाळ्यात पिकवली जाते. कारण ती खाणे फक्त उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.

काकडी ला आपल्याकडे उन्ह्याळ्यात जास्त मागणी राहते. त्यामुळे आपण जर उन्ह्याळ्यात काकडी ची लागवड करत असणार, तर हा सौदा नेहमी फायद्याचा ठरतो.

काकडी लागवड करतांना प्रगत माहिती वापरून बरेच शेतकरी आज भक्कम नफा कमावत आहेत. अश्याच प्रगत माहिती सोबत आज आपण काकडी लागवड कशी करावी. हे या लेखात पाहणार आहोत.

काकडी साठी शेतीची मशागत कशी करावी.?

  • डिसेंबर महिन्या मध्ये आपले पीक निघाल्या, नंतर त्या शेतात ट्रॅक्टर ने नांगरणी करून घ्यावी. आणि माणसाच्या हातून त्या शेतमधील ढेकुल फोडून घ्यावे व शेतात मस्त गाग्रा करावा.
  • त्या नंतर पावसात न भिजलेले शेतखत घ्यावे, पावसाने भिजलेले शेणखत कधीच घेवू नका. त्यामधील अर्क हा वाहून गेलेला असतो. शेणखत घेवून शेतात टाकून द्यावे.
  • नंतर वखार मारून घ्या म्हणजे शेणखत सर्व शेतात पसरून जाईल.
  • आता काकडी ची लागवड करिता सऱ्या पडून घ्या.

कोणतेही पीक किंवा फळ शेतात घेण्याआधी त्याच्या जाती आपल्याला माहीत असणे खूप महत्वाचे आहे. कारण या मध्ये खूप वेगवेगळ्या जाती येतात. ज्या वेगवेगळ्या प्रदेश मध्ये आपले उत्पादन देतात. 

काकडी च्या जाती

1) पूना खिरा 

पुना खीरा ही काकडीची जात आपल्याला बाजारात कमी कालावधी मध्ये विकायला काढता येते. लवकर आल्यामुळे बाकी शेतकऱ्यानं पेक्षा भाव सुधा चांगला मिळतो. या काकडी मध्ये दोन प्रकारच्या काकड्या आपल्याला पाहायला मिळतात.

एक हिरव्या रंगाची व दुसरी थोडी तांबडी या दोन्ही काकडीचे बियाणे आपल्याला बाजारात मिळून जातात. ही काकडी पिकायला खूप मस्त आहे. या काकडीचे २ एकर मध्ये तुम्ही 12 ते 14 टन उत्पादन घेवू शकता व चांगला नफा कमवू शकता.

2) शीतल

शीतल ही जात तुमच्या भागात खूप पाऊस पडत असेल, तर तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. ही जात डोंगर भागात लागवड करण्याकरिता अगदी उपयुक्त मानली जाते.

कारण अश्या भागात ही चांगल्या प्रकारे वाढते व उत्पन्न चांगले होते. ही कमी कालावधी वाली जात असल्यामुळे तुम्ही याची फळ 45 दिवसातच बाजारात विकायला काढू शकता.

या जातीची लागवड करून तुम्ही 35 ते 40 टन इतके उत्पन्न घेवू शकता.

योग्य बीयाची निवड केल्यानंतर आता आपल्याला त्या जाती करिता योग्य हवामान कोणते आहे हे जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे.

काकडी करिता योग्य हवामान कोणते ?

काकडी या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जमीन चांगली मानली जाते. हे पीक उष्ण कटिबंध आणि कोरड्या हवामान मध्ये चांगल्या प्रकारे वाढते.

काकडी या पिकाला थंडी मध्ये बाजारात मागणी कमी असल्यामुळे, याची लागवड थंडी मध्ये शेतकरी करत नाही आणि थंडी या पिकाला सहन होत नाही. काकडी या पिकाला उष्ण वातावरण खूप मानत व पीक खूप जोमदार होते.

काकडी या पिकाची अंतर मशागत कशी करावी?

काकडी हे पीक जास्त पाण्याचे असल्यामुळे या मध्ये तन खूप वाढते. 

या मुळे कमीत कमी 20 दिवस आड या पिकात खुरपणी व निंदन द्यावे. आणि हे पीक जर आपण पावसाळ्यात घेत असाल, तर पावसाच्या पाण्यामुळे काकडीच्या मुळी पावसामुळे उघड्या पडतात.

तर याला वेळेवर माती लावून झाकून टाकाव्या.

काकडी चे फळे थोडी मोठी झाले, की कोवळी असताना विकली की बाजारात चांगला भाव मिळते. काकडी चे उत्पादन एका एकर मध्ये 100 ते 120 क्विंटल होते.

या प्रकारे जर आपण काकडी ची लागवड करत असाल, तर काकडी कधीच कडू येणार नाही. काकडी या फळाला आयुष्य कमी असल्यामुळे याला काढल्या बरोबर विकावे लागते. जास्त दिवस काकडी ही राहू शकत नाही. बाजारपेठेत भाव नसल्यास जो भाव मिळेल त्या भावात या फळाला शेतकरी विकून टाकतात. 

परंतु काकडी जर कडू असेल, तर तिला विकणे खूप अवघड होवून जाते. अश्या परिस्थितीत शेतकऱ्याला काही वेळ काकडी ला फेकून द्या लागते व त्याचे शेतीला लावलेले पैसे सुद्धा निघत नाही. 

यामुळे शेतकरी मित्रांनो काकडी ची लागवड करतांना बी चांगल्या प्रकारचे निवडा ज्यामुळे काकडी ही कडू निघणार नाही. 

उन्ह्याळ्या मध्ये काकडी या पिकाला भरपूर पाणी पाहिजे असल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन योग्य रित्या करून घ्या.

जेणे करून पाण्या अभावी पीक खराब होऊन ते उन्हाने जळणार नाही. पाणी देत असताना सर्वीकडे पाणी पोहचत आहे की नाही याची खात्री करा.

काकडी च्या वेलाला फुलोर असल्यावर स्पिंकलेर ने पाणी देणे टाळा. यामुळे पाणी फुलावर पडल्यामुळे फुल चिटकून जाईल किंवा पाण्याच्या अती वेगामुळे फुले गळून जातील. 

अश्याच शेतीच्या व शेतीविषयक योजने करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share