महिलांना हार्ट अटॅक येण्याआधीची ७ लक्षणे

Heart Attack Symptoms in Marathi

सध्या हार्ट अटॅक मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत डॉक्टरही रुग्णाला पहिला प्रश्न विचारतात की, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला कोणती लक्षणे दिसली? किंवा तुम्हाला काय वाटले. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, महिला आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे एकमेकांपासून खूप वेगळी असतात.

पुरुष आणि स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक ची लक्षणे एकमेकांपेक्षा कशी वेगळी आहेत. या आर्टिकल च्या माध्यमातून समजून घेऊया.!


स्त्री-पुरुषांच्या हृदयाची रचना एकमेकांपासून वेगळी

स्त्रियांच्या फुफ्फुस, मेंदू आणि स्नायूंपासून प्रत्येक छोट्या गोष्टीची बनावट, पुरुषांपेक्षा वेगळी असते. किंवा सोप्या भाषेत म्हणायचे झालेच तर, स्त्रिया आणि पुरुषांची शारीरिक रचना एकमेकांपेक्षा वेगळी आहे.

त्यामुळे हृदयाच्या बनावटीत आणि त्याच्या कार्यपद्धतीत काही फरक पडणे साहजिकच आहे.

स्त्रियांचे हृदय लहान असते आणि रक्तवाहिन्या अरुंद असतात. दुसरीकडे, बघितले तर पुरुषांचे हृदय मोठे असते आणि रक्तवाहिन्या देखील मोठ्या असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हृदयविकार वेगळ्या प्रकारे होऊ शकतो.

धमन्यांच्या आत कोलेस्टेरॉल प्लाक गोठू लागल्यावर कोणत्याही व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. दुसरीकडे, पुरुषांमध्ये, हृदयापर्यंत रक्त पोहोचणाऱ्या सर्वात मोठ्या धमन्यांवर प्लाक जमा होतो. हा प्लाक महिलांच्या सर्वात लहान रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. त्यामुळे दोघांना हार्ट अटक येण्याची पद्धत वेगळी आहे.


पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे

१) अचानक जास्त घाम येणे

२) छातीत दुखणे

३) घसा आणि जबडा दुखणे

४) धाप लागणे

५) छातीत जळजळ आणि धडधडणे

हि झाली पुरुषांमधली हार्टअटॅक ची लक्षणे आत्ता बघूया स्त्रियां मध्ये हार्टअटॅक ची लक्षणे


स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे

१) आंबट डंकार येणे

२) तणाव आणि चिंता

३) मळमळ होणे

४) अपचन

५) धाप लागणे

६) चक्कर येणे

७) झोप न लागणे

हि सर्व लक्षणे स्त्रियां मध्ये दिसतात. तसेच अश्या प्रकारची कुठलेही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.! ही माहिती तुम्हाला कशी वाटली कंमेंट करून नक्की कळवा.? धन्यवाद


हे वाचलंत का ? –

Share