बाकी देशात FD वर किती व्याज मिळतो..?
तुम्हाला हे माहीत आहे का…? की काही देशातील बँक मध्ये त्या देशातील लोकांना पैसे ठेवायला पैसे द्यावे लागतात.
माहीत नसेल तर हा लेख खास करून तुमच्यासाठी आहे तर….
जस आपल्या देशात बँक मध्ये आपण FD (fixed deposit) करतो. का करतो कारण आपल्याला बँक कडून चांगले रिटर्न मिळावे म्हणून, तर आपल्या देशातील बँक आपल्याला FD वर ६% ते ७% व्याज देतो.
परंतु काही देशात अस होत नाही. काही देशात -०.१०% व्याज दर आहे,तर काही देशात -०.२५% व्याज दर आहे. त्या लोकांना बँकांमध्ये पैसे ठेवायचे पण पैसे मोजावे लागतात.
अमेरिका देशाचा सद्याचा व्याज दर १.७५% आहे, तर जपान आणि स्वीडन चा -०.१०% ते -०.२५% इतका आहे.
विकिपीडिया ने दिलेल्या माहितीनुसार खाली काही देशाची नाव व त्या देशातील व्याज दर आहे.
Country Central bank interest rate %
1) India 5.40
2 United states 1.75
3) United kingdom 0.75
4) Japan -0.10
5) Pakistan 13.25
6) Sweden -0.25
7) Kuwait 2.75
8) China 1.75
आत्ता तुम्हला वाटेल की त्या देशातील लोकांना बँक लुटत आहे. तर ते साफ खोट आहे……!
कसे ते आपण जाणून घेऊया या उदाहरणाने….. आपल्या देशात FD वर ७% ते ८% इतका व्याज दर आहे. इतक्या व्याजाने आपण बँक कडे आपले पैसे ठेवतो. तेच बँक दुसऱ्या कुणाला व्याज द्यायचे असेल(घरासाठी,व्यवसायकरिता) तर ते १०% नि त्यांना देतो.
म्हणजे बँक त्यातलेच ७% आपल्याला देतो, व वरचे ३% स्वतःच्या जवळ ठेवतो. बँक आपल्याला त्याच्या खिशातून पैसे नाही देत. ही आपल्या देशातील सिस्टिम झाली.
दुसऱ्या देशात व्याज दर कमी असण्यामागचे कारण म्हणजे की, ते देश खूप डेव्हलप झालेले आहे. म्हणजे जितका देश डेव्हलप असेल तितक्या त्या देशाचा व्याज दर कमी आहे. कारण तेथील लोकांना व्याजाची गरजच भासत नाही.
म्हणून त्या देशामध्ये कोणी FD पण करत नाही, आणि व्याज पण घेत नाही. असे काही % लोकच तेथे व्याज घेतात.
तेथील लोक बँक कडे FD च करणार नाही, तर बँक दुसऱ्या लोकांना व्याज कसे देणार. म्हणून तर त्या देशात व्याज दर कमी आहे. कारण त्यांना त्याची आवश्यकताच भासत नाही.
अमेरिका देशातील लोक आपले पैसे जास्तीतजास्त गुंतवणूक करतात. जसे की mutual funds, stock market(शेअर बाजारात) इत्यादी.
आत्ता तुम्हला वाटत असेल की आपल्या देशातील बँक मग आपल्याला लुटता…हो ना अस नक्कीच वाटत असेल. परंतु ते पण साफ खोट आहे.
कारण आपला देश पण डेव्हलप होत आहे. खूप वर्षी आधी बँक १२% व्याज द्यायचं. कारण त्या वेळचा देश आणि आत्ताचा देश यात खूप फरक आहे.
काही वर्षांनी आपल्या देशात पण व्याज दर २%ते ३% होईलच. पण त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. कारण तेव्हा आपला देश खूप प्रगतिशील झालेला असेल. त्या वेळेस तुम्हा आम्हला जास्त व्याज घ्यायचं कामच नाही पडणार.तेव्हा सर्वांच्या जवळ आवश्यक तितका पैसा असणार.
त्यासाठी तुम्ही बँक मध्ये FD केल्या पेक्षा कशात तरी गुंतवणूक करा म्हणजे जेणे करून तुम्हाला त्याच योग्य परतावा मिळेल. ७% ते ८% च्या लोभात आपण आपलं कितीतरी नुकसान करून घेतो. अस एक पाऊल उचला जेणेकरून तुमची येणारी पिढी तुमचं नाव काढेल.
बस आत्ता जास्त नाही बोलत परत तुम्हाला वाटेल हा नक्की माहिती सांगतोय की ऍड करतोय. तर मला इतकंच सांगायचे होते, की आपल्या देशात FD वर इतका व्याज दर का आहे आणि बाकी देशात पैसे ठेवायचे का पैसे द्यावे लागते.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत. धन्यवाद..!
- सागर राऊत
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.