marathi katha / मराठी कथा

first-floor-marathi-story

marathi story

फस्ट फ्लोअर

नुकताच ग्रॅज्युएशन संपून लगेचच मला जॉब मिळाला. चांगल्या कंपनी मध्ये जॉब मिळण्याचा आनंद आणि भीती…. भीती म्हणजेच कंपनी मधल्या स्टाफ आणि सिक्युरिटी ने तयार केलेली काल्पनिक कथेचा प्रभाव

मी माझ्या चेअरवर स्तब्ध बसून माझ्या सोबत काम करणाऱ्या जोडीदार च्या गोष्टी मी मन लावून ऐकत होतो. इच्छा असून सुद्धा मी त्याला या सर्व गोष्टी खोट्या असतात अस म्हणू शकलो नाही.

कारण कंपनी मध्ये माझा पहिला दिवस कशाला उगाचच वाद विवाद नको, म्हणून मी माझ नाक एका बोटानी खाजवत होतो, व होकारार्थी मान हलवत होतो.

माझा भित्रा स्वभाव असल्याने माझ्या मनात थोडं भीतीने घर तयार केलंच होत.

‘कंपनीमध्ये विचित्र असे प्रकार घडतात… पण कोणी त्यावर विश्वास करत नाही. आणि जे विश्वास करतात ते इथून तुझ्या सारख्या मुलांना जॉब साठी जागा तयार करून जातात.’

तो मला समजावत होता, की धमकावत होता कळलं नाही. पण त्यातून त्याला मला काय सांगायचे होते, ते नेमकं कळले होते.

म्हणजे तो इथून भीती मुळे पळून गेलेल्या मुलानं बद्दल बोलत होता. त्यामुळे नेमकं माझ्या आनंदावर भीतीची चादर ओढल्या केली होती.

त्याच्या बोलण्यावरून मला जाणवलं त्याला मला काम शिकवण्या पेक्षा भीती घालण्यात जास्त सारस्व होत.

मीठ मसाला घालून गोष्टी सांगणे चालूच होते. आणि तो थांबला बाजूची पाण्याची बाटली हातात घेऊन त्यातील दोन घोट घेऊन त्याने आपले डोळे मोठे केले व पुढे बोलू लागला.

‘तुला तर फर्स्ट फ्लोअर ची गोष्ट सांगायचीच राहीली.’

‘अस काय आहे फर्स्ट फ्लोअर ला ? मी पण त्याच्या कळली पाण्याची बाटली घेत विचारलं.

“काही तरी विचित्र असे प्रकार घडतात रात्रीला.”

“म्हणजे कसले प्रकार?”

“रात्री १२ ला अक्सिस डोअर काम नाही करत, तू जर आत मध्ये असला, आणि १२ वाजलेले असले तर तुला तेथून बाहेर पडता येत नाही!”

“काय…..?” मी आश्चर्यचकित होऊन विचारलं.

“हो अस होत! तेथे काहीतरी नक्की आहे पण नेमकं काय ते कुणालाच माहीत नाही.”

“नेमकं कुणालाच माहीत नाही म्हणजे? बाकी कंपनी मधल्या स्टाफ ला माहीत असेल ना की तेथे अस काही घडतं ते.”

“नाही! जास्त जणांना नाही माहीत, कारण स्टाफ फक्त सकाळीच असतो. रात्रीला नाही!”

“मग कंपनी मधल्या मोठ्या साहेबाना तर माहीत असेलच ना याबाबद?”

“हो त्यांना आम्ही सर्वांनी सांगितलं पण ते या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.”

“हो का….?” मी पण दिर्घस्वास घेत विचारात बुडालो आणि अचानक मी त्याला म्हणालो.

“अहो सर…. मग तेथे सेक्युरिटी कॅमेरे असतील ना? त्याची रेकॉर्डिंग चेक करा ना! जे आहे ते सर्वांच्या समोर येईल!”

तो माझं अर्ध्यात बोलणं तोडून पुढे म्हणाला.
“नेमके तेथेच कॅमेरे नाही लावलेत, मला तर वाटते काही तरी गडबड आहे. आम्ही जेव्हा पण फर्स्ट फ्लोअर चा विषय साहेबान कळे काढतो.

तर ते टाळाटाळ करतात. माझा अंदाज आहे, ते आपल्या पासून काहीतरी लपवत आहेत!

“कुठल्या एरिया मध्ये हा प्रकार घडतो ?

“यु. पी. यस. रूम जवळ.”

“तेथेच कॅमेरे का बरं नसतील?” मी स्वतःलाच प्रसन्न विचारत होतो. थोड्या वेळाने विचार चक्रातून बाहेर येऊन मी त्याला परत विचारलं.

“तुम्हाला काय वाटते, नेमकं काय असेल तेथे?”

“तेच तर…..,मला माहित असत तर तुला आत्ता पर्यंत सांगितलं असताना! पण एक गोष्ट मी सेक्युरिटी कळून
ऐकली की गावापासून ही कंपनी दोन किमी दूर आहे. त्याच गावची ही आधी स्मशानभूमी होती. त्या जाग्यावर आत्ता ही कंपनी स्थापन करण्यात आली.

मी थोडा विचार करत त्याला विचारले. ” आत्ता पर्यंत तिथे कुणाला काही त्रास किंवा जीवित हानी झाली का?

“नाही……!”

“मग आपण याचा विचारच कशाला करायचा. आणि रात्री फर्स्ट फ्लोअर ला जायचंच कशाला. आपली ड्युटी करायची आणि सरळ घरी जायचं!”

‘बाळा आपल्याला ३-३ तासांनी रेअडिंग घ्यावं लागतं आणि ज्या दिवशी तुझी नाईट ड्युटी असेल तेव्हा तर तुला जावंच लागेल.’

“काय…..? नाईट ड्युटी मध्ये आपल्याला त्या फ्लोअर वर जावं लागतं?”

“हो…! म्हणून हा विचार करण्याचा मुद्दा आहे.”

“मग कस करायचं…?”

“चिंता करू नकोस…! एक उपाय आहे .”

“कुठला उपाय..? मी भीती भऱ्या स्वरात म्हणालो.”

“रेअडिंग ला १२ च्या आधी किंव्हा १२ नंतर जायचं. म्हणजे तूला काही होणार नाही.” परत तो डोळे मोठे करत म्हणाला.

“आणि १२ लाच मी फ्लोअर ला असलो तर….?”

“मग झालंच तुझं काम…!”

इतक्या प्रमाणात भीती दाखवल्यामुळे मी पुरता घाबरलो होतो. हे सर्व खर तर नसेल ना? या विचारात असतांनाच एकदम त्याने मला आवाज दिला. मी दचकूनच त्याच्याकडे बघितलं.

“हो आणि बिल्डिंग मध्ये एक सेन्सर डोअर आहे, तो आपोआप चालू बंद होतो. तसे तर त्या डोअर समोर जोपर्यंत कोणी व्यक्ती उभं राहणार नाही.

तो पर्यंत ते डोअर उघडणार नाही. पण रात्रीला तस होत. अचानक डोअर चालू बंद होतो. जस कोणी आत बाहेर जात आहे.

त्या डोअर शेजारी ड्युटी असलेले बरेच सेक्युरिटी त्या भीतीमुळे पळून गेलीत.”


त्या काळ रात्रेचा तो दिवस उजळला. मी सकाळपासूनच विचारात मग्न होतो. त्या रात्री माझी नाईट ड्युटी होती. कंपनी जॉईन करून तीन आठवडेच झाले होते. माझी पहिली नाईट आली होती.

डोक्यात विचित्र असे विचार गोंगावत होते. बरेच दा मनात जॉब सोडून द्यायचा विचार आला. पण जॉब सोडायला पण आधी कंपनी मध्ये जावेतर लागणारच ना.


घड्याळ हळूहळू पुढे सरकत होती. तसतशी माझ्या मनात भीती दाटत होती. फर्स्ट फ्लोअर वर जाऊन रेअडिंग तर घ्यावेच लागणार, त्यासाठी मी मनाची तयारी केली.

व बारा वाजायला तीस मिनिट कमी असतांनाच मला सांगितल्या प्रमाणे मी आधी रेअडिंग घ्यायला निघालो.

लिफ्ट फर्स्ट फ्लोअर ला येऊन थांबली. लिफ्ट बाहेर एक पाय काढताच लक्ष हाताला लावलेल्या घड्याळी वर गेले. ११:३५ झालेले.

माझे आणि घड्याळातील १२ वाजायला बराच वेळ होता. हृदयाचे ठोके हळूहळू वाढत चालले. इच्छा नसताना माझे एक एक पाऊल यु. पी. यस. रूमकडे जात होते.

रूम मध्ये पोहचताच लगेच गडबडीत रेअडिंग घ्यायला सुरुवात केली. भीतीमुळे कळलं नाही की बारा वाजायला पाच मिनिटं बाकी आहे ते, आणि ज्याची भीती होती, नेमकं तेच झालं. मी आत मध्ये अडकल्या गेलो.

आत्ता भीतीने माझ्यावर साम्राज्य जमवलं. लटलटत्या शरीराने डोअर उघडण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्या वेळाने डोअर उघडताच मी बाहेर आलो. त्या फ्लोअर वर मी एकटा असून सुद्धा एकट अस भासत नव्हतं.

कुणी तरी आपल्याला बघतोय अस वाटत असल्याचा इशारा माझं मन मला देत होत.

दुरून मला लिफ्ट दिसत होती. लिफ्ट पर्यंत पळत जायचं की हळू फक्त इतकाच निर्णय घ्यायचा बाकी होता.

मानसिक बधिरता काय ते त्यादिवशी कळलं मला काय करायचे ते कळत नव्हते. मी हळूच देवाच नामस्मरण करत चालू लागलो. लक्ष फक्त एकच…. कशीतरी लिफ्ट गाठायची आणि अचानक माझी नजर सेन्सर डोअर वर गेली.

तो लागलेला होता. नजर हटणारच तर डोअर अचानक उघडला आणि आत तर कोणीच नाही आलं हे लक्षात येताच माझे हातपाय तर गळुनच गेलेत. हळू चालणाऱ्या पावलांनी आत्ता वेग घेतला होता.

आणि लगेच लिफ्ट जवळ जाऊन पोहचलो. आत्ता तर यापेक्षा अधिक वाईट काहीच होऊ शकत नव्हत. लिफ्ट बंद होती.

“हे कसं शक्य आहे…..? मी आत्ताच तर लिफ्टनी वर आलो होतो.” स्वतःलाच केलेल्या प्रश्नात अचानक लिफ्ट चालू झाल्याने व्यत्यय आला.

लिफ्ट मध्ये शिरताच कानाला पावलांच्या चाहूल खुणा लागण्यात. आणि लिफ्ट डोअर बंद होणारच का तर कोणीतरी लिफ्ट जवळून गेलं. ग्राउंड फ्लोअर वर येताच स्वतःला कस तरी सांभाडून बिल्डींग बाहेर पळालो.


काळोखाच राज्य संपून दिवस उजाडला होता. पक्षांचा किलबिलाट, मंद असा फुलांचा सुगंध, आणि हवेतला गारवा हळूच शरीराला स्पर्श करत होता.

पण या सर्व निसर्गा पासून लांब मी आपल्या वेगळ्याच जगात अडकून बसलो होतो.

“हाऊ वॉज युअर लास्ट नाईट…..?
सागर…..काय झालं….?”

माझा सिनिअर सकाळी जॉबला येऊन पण ठेपला तरी मला काही कल्पना नव्हती. तो मला विचारत होता.

“तुझी रात्र काशी गेली…. ?”

“आ….?” थोडं भानावर आल्यावर त्याला प्रतिसाद दिला.

“अरे काय झालं….? काही सांगशील की नाही!”

“काही नाही….थोडं डोकं दुखत आहे.”

“तुझी फर्स्ट नाईट असल्यामुळे तस होत असेल! होईल हळूहळू सवय…..!”

“बर मी निघतो आत्ता….परत नाईट ला यावं लागणार!”

“बर जा…..आणि हो चहा घे आधी जाऊन तुला बर वाटेल?”

त्यांनी बोललेले बरेचसे शब्द माझ्या कानावरून गेलेत. न राहून मी त्यांना शेवटी रात्रीला झालेला प्रकार सांगितला. व ते लगेचच म्हणाले.
“बघ मी म्हणालो होतो ना तुला…?


माझ्या बरेच मित्रांना हा प्रकार सांगितला तर ते हसले मला व म्हणाले.
“सागर….तू अश्या गोष्टीवर विश्वास ठेवतो? आमचा तर विश्वासच बसत नाही.”

“गोष्टीवर कशाला मला अनुभव आला! आणि तुम्हाला हसायला काय झालं ? तुम्ही असता तेथे तर कळलं असत तुम्हाला!” थोडा राग आवरतच मी म्हणालो.

“बर ठीक आहे, पण तुला इतकं तर माहीत आहे ना. की कुठल्याही गोष्टी मागे काहिनाकाही कारण असत!”

“हो……!”

“मग ते शोधून काढणा तू! चार दिवसांपासून बाराच्या आधी रेअडिंग घेण्यात काय फायदा…घाबरट कुठला!”

“सदाशिव काका असतात फ्लोअर वर त्यामुळे थोडी भीती कमी झाली.”

“हे कोण आत्ता..?” मित्रांनी चौकशी करत विचारलं.

“अरे हो सांगायचं राहीलच. सदाशिव काका बिल्डिंग मध्ये बाथरूम,फ्लोअर क्लीनिंग करायचं काम करतात. त्यांचा स्वभाव खूप छान आहे.

पहिल्या रात्री भीतीमूळ पळत जाताना त्यांनी मला बघितले. त्या रात्रीपासून ते स्वतःच काम सोडून माझ्या सोबत फर्स्ट फ्लोअर ला रेडिंग घ्यायला येतात.

रात्री आम्ही खुप वेळ पर्यंत गप्पा मारतो. बिचारे खूप गरीब आहेत. मला ते स्वतःच्या मुलासारखे वागतात. माझ्याच वयाचा त्यांचा मुलगा आजाराने वारला.”

मी हे सांगत असताना माझे मित्र सर्व शांततेत ऐकत होती. आणि अचानक माझा एक मित्र म्हणाला.

“अरे मग त्या रात्री तुला लिफ्ट जवडून जे गेलेत ते सदाशिव काकाच असेल…! बघ एक शंका क्लिअर झाली.

“अरे हो….”मी पण एक्साईट होऊन म्हणालो.

“आत्ता बाकी गोष्टी का होतात त्याचा सुगावा लाव. आपण इंजिनिअर आहोत. आपण नेहमीच प्रॅक्टिकली विचार करायचा.”


मित्रांनी सांगितलेल्या ज्ञानाचा आणि थोडा शेरलॉक होम्स च्या मूवी चा पण माझ्यावर परिणाम पडला होता. सकाळच्या माझ्या ड्युटी मध्ये मी माहिती गोळा करायला लागलो.

लिफ्ट का बंद होते. अक्सिस डोअर का उघडत नाही, दोन मिनिटांसाठी ते पण रात्री १२लाच का अस होत.

या सर्व गोष्टी चा सुगावा लावण्यात मला चार दिवस गेलेत. आणि पाचव्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं.

यावेळेला नाईट ड्युटी चालू झाल्यावर मी उत्सुकतेने कंपनी मध्ये गेलो. जवड जवड प्रकरण सुटल्या सारखी मी त्या रात्री १२ वाजयची वाट पाहत होतो.

११.३०लाच मी फ्लोअर वर येऊन ठेपलो. लक्ष हातावरल्या घडाळ्यावर.
एक एक मिनिट जसा तास भासू लागला.

आज एक नवीन उत्सुकता आणि भीती दोघांचे मिश्रण झाले होते. न राहून सोबत असलेल्या सदाशिव काकांनी मला विचारलं.

“कितीदा घड्याळाला बघशील….? तुझं नेमकं काय चाललंय…?

“काही नाही हो काका….! आजच तर माझ्या प्रश्नच उत्तर मला मिळणार.”

मी जे काय बोलत होतो ते नक्की काका कळत नसणारच. वेळ जवळजवळ आली होती ,आणि मी पळतच यु. पी. यस. रूम मध्ये गेलो. आणि लक्ष एक एक मिनिट पुढं जाणाऱ्या घड्याळीकडे आणि तो क्षण आला, आणि रूम लॉक झाली.

२ मिनिटांनी रूम ओपन होताच पळत मी लिफ्ट जवड गेलो. लिफ्ट बंद होऊन चालू झाली. माझा हा विचित्र प्रकार सदाशिव काका दुरूनच बघत होते.

नंतर मी सेन्सर डोअर कडे गेलो. त्या डोअर जवड बसून अर्धा तास झाला. काही हालचाल नाही. मी लक्ष देऊन डोअर कडे बघत होतो. अचानक डोअर ओपन झालं. आणि माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

मी लगेच धावत सदाशिव काका कडे गेलो. आणि मोठा स्वास घेत म्हणालो.
“आत्ता भीती वाटण्यासारखी काही कारण नाही.”
काका माझ्याकडे एकसारखे बघत होते. त्यांना काही कळलं नाही. पण ते माझ्या हसण्यात सामील झाले.


मी माझ्या सिनियर यायची वाट पाहत होतो. ते येताच मी जोरात म्हटलं.

“केस सोलव्ह…..!”

“काय…..?”

“हो!”
माझं बोलेल डोक्यावरून गेलं त्यांच्या. बर ऐका आधी शांत बसा मी सांगतो काय झाले ते.

“बर सांग काय झालं…?”

आणि मी सांगायला सुरुवात केली.
“फर्स्ट फ्लोअर वर डोअर बंद होणे, लिफ्ट बंद पडणे आणि सेन्सर डोअर ऑटोमॅटिक ओपन होणे, या मागे कोणी भूत नसून टेकनोलॉजि आहे.”

“ते कसं…?” त्यांनी आचार्यांनी विचारलं.”

” ते अस की मी कमांड रूम कडून माहिती घेतली. त्यात समजलं की डोअर आणि लिफ्ट बंद का होतात.”

“का होतात…?”

“त्याच कारण की रात्री १२ ला सिस्टिम रिस्टोर होतो. त्या मुळे हे सर्व २ मिनिटांसाठी बंद पडतो.”

“अरे देवा…..हो का….?”

“हो…!”

“हे तर सर्व ठीक आहे मग सेन्सर डोअर तर रात्री कधी पण चालू बंद होतो. त्याच काय कारण असणार….?”

“त्याच कारण अस की ते डोअर बॉडी ला सेन्स करतो म्हणून त्याच नाव सेन्सर डोअर आहे. आणि रात्री ते का ओपन होत की त्याच्या पुढं पाल, बेडूक किंवा इतर कीटक जेव्हा येतात तेव्हा ते सेन्स करून डोअर ओपन होतात.

बघणाऱ्याला वाटेल की कोणी व्यक्तीच आत मधेच आली का. आणि मी काल डोअर जवड बसलो तर मला तेथे एक बेडूक दिसला.”

“हो का….? म्हणजे आत्मा वैगरे हा प्रकार काही नाहीच तर…!”

“हो…आपण उगाचच घाबरत होतो. आणि हो या मध्ये माझी सदाशिव काकांनी पण थोडी मदत केली बर का…!”

“हो का…..पण सदाशिव काका कोण…?”

“तेच सदाशिव काका जे फ्लोअर, बाथरूम क्लीन करतात.”

“काय…..? कुठे फर्स्ट फ्लोअर ला आणि रात्री…?

“हो….आणि यात आश्चर्य वाटण्यासारखं काय….?”

“अरे पण बिल्डिंग मध्ये कोणी सदाशिव नावच माणूस रात्री का दिवसा पण काम करत नाही. आणि त्या दिवशीच मी तुला सांगितलं की तू रात्रीला पूर्ण बिल्डिंग मध्ये एकटाच असणार काम करायला.”

मी आश्चर्य चकित होऊन ओरडलो.

“म्हणजे सदाशिव काका…..?”

………..समाप्त………


  • सागर राऊत
Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Marathi Story

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *