उधार घेतलेले पैसे किंवा बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या पद्धती उपयोग करा.!
आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे
Financial Planning : खूप वेळा आपल्याला पैसे उधार घेण्याची गरज पडते. यामुळे आपल्यावर कर्ज वाढून जाते. खूपदा आपल्याला असे देखील पाहायला मिळते कि, लोक त्यांचे कर्ज पूर्ण फेडू शकत नाही. कर्जाच्या टेन्शन मूळे ते दिवसानुदिवस आतून पोखरले जातात. त्यातून काहींची सुटका होते, तर काही परंतु लोक कठोर पावलं उचलून हे जगच सोडून जातात.
परंतु काही सोप्या गोष्टी चे पालन केलेत, तर तुम्ही नक्की कर्ज मुक्त होऊ शकता. त्याबद्दल या आर्टिकल मध्ये सविस्तर वाचूया.!
१) विचार करून कर्ज घ्या.!
जर विचार करून कर्ज घेतले असेल तर, त्यामधून तुमचा उद्देश देखील साध्य होतो, तसेच तुमचे कर्जाचे ओझे सुद्धा कमी राहते. शक्यतो, जास्त कर्ज हे जास्त व्याज दारात घेतले जाते. त्यामुळे तुमच्यावर अचानक व्याजाची भर पडल्यामुळे नैराश्य आणि ताण निर्माण होतो.
कर्जदारांनी कर्ज घेण्या आधी आपली सध्याची आर्थिक परिस्थिती आणि परतफेड करण्याची कालावधी हि काळजीपूर्वक समजून घेणे महत्वाचे आहे.
तसेच, घेतलेल्या कर्जाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, कर्जाचा पैसा जबाबदारीने वापरणे खूप आवश्यक आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे. ऋण काढून सण करायचे नसतात. म्हणायचे तात्पर्य असे कि, गरज नसतांना कर्ज घेणे टाळा.!
२) आपले उत्पन्न वाढवा.!
जेव्हा कर्ज घेता. तेव्हा डोक्यात हा विषय असायला हवा कि, घेतलेले कर्ज लवकरात लवकर कश्या प्रकारे फेडता येईल. त्याकरिता उपाय योजना करा.!, तसेच तुमचे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा.!, इतर व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग शोधा.! तुम्ही मिळवलेले अतिरिक्त उत्पन्न हे तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला मदत करेल.
३) इमरजेंसी पैसे कमवा.!
जेव्हा गरजेपेक्षा जास्त खर्च उद्भवतात. तेव्हा कर्ज काढण्याचे टाळण्यासाठी इमरजेंसी पैसे कमावणे खूप गरजेचे आहे. कमीत कमी तीन ते सहा महिन्यांचे खर्च सहज रित्या मिळेल असे प्रयत्न करा. जास्तीत जास्त पैसे खात्यात कसे वाचतील, याकडे लक्ष ठेवा.
४) नवीन कर्ज घेणे टाळा.!
सध्याचे घेतलेले कर्ज फेडत असतांना, नवीन कर्ज घेणे आवर्जून टाळा. खरेदीसाठी क्रेडिट कार्ड ऐवजी नगद पैश्याचा व्यवहार करा किंवा डेबिट कार्ड वापरा. जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्ज फेडत नाही आणि स्वतःचा आर्थिक पाया बाजबूत करत नाही, तोपर्यंत मोठे खर्च आणि कर्ज टाळा.
हे वाचलंत का ? –
दादा, तुम्ही उधार घेतलेले पैसे कसे फेडायचे या विषयावर खूप छान लिखाण केले हो पण उधार दिलेले पैसे कसे मिळवायचे या विषयावर ब्लॉग लिहून माझ्या सारख्यांचे मार्गदर्शन करावे.
खूप दिवसा पासून पैसे अडकले आहे हो देतच नाही आहे पुढचा😞