बदक पालन करून व्ह्या श्रीमंत! कर्ज आणि 35 टक्के अनुदान

Duck farming loan

Duck farming loan : सरकार देत आहे, कर्ज आणि 35 टक्के अनुदान बदक पालन करून व्ह्या श्रीमंत

नमस्कार शेतकरी मित्रांनो.., आज बदक पालन व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेतकरी याला कुक्कट पालना सारखेच बघत आहेत. पण या व्यवसाय मध्ये कुक्कुट पालना पेक्षा खूप कमी जोखीम आहे. आणि यातील एक प्लस पॉइंट हा आहे. कोंबडी च्या मास व अंड्यान पेक्षा बदकाच्या मास व अंड्यामध्ये प्रथिने हे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

आणि त्यामुळे लोक खाण्याकरिता बदकच्या अंड्यांना जास्त पसंती देत आहेत. यामुळे त्याची मागणी दिवसेदिवस वाढत जात आहे.

आपण जर शेती आधारित कोणता व्यवसाय करायचा विचार करत असाल, तर हे एक चांगल्या उत्पनाचे साधन बनू शकते. खूप लोक हे बदकाचे पालन करून चांगले पैसे कमावून आपले जीवनमान उंचावत आहेत. या लेखामध्ये तुम्हाला बदक पालन कसे करावे हि माहिती दिली आहे.

बदक वर्षाला जवळपास ३०० अंडी देते. या अंड्याची बाजारात किंमत 6 ते 8 रुपये आहे. बदकाच्या मासा मध्ये व अंड्या मध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, याची मागणी नेहमी चांगली राहते व आता वाढत जात आहे.

आता याला लागणाऱ्या खर्चाची व यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गोष्ट केली, तर 1000 बदक संगोपन चांगल्या प्रकारे करण्याकरिता जवळ पास 80 हजार ते 1 लाख खर्च येतो आणि यामधून उत्पन्न हे जवळ पास 2 ते 3 लाख होईल.

बदक पालनसाठी कर्ज कसे मिळेल?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या द्वारे नाबार्ड कर्ज व सबसिडी देते. हेच नाही तर बाकी आणखी बँक सुद्धा या व्यवसायसाठी कर्ज देतात. कर्जाची माहिती समोर बघू.

  • बदक व पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी सरकार 25% अनुदान देते.
  • तुम्ही जर ओबीसी किंवा सामान्य वर्गा मध्ये येत असाल, तर तुम्हाला 25 टक्के अनुदान मिळणार.
  • तसेच जे लोक अनुसूचित जाती मधून येतात, त्यांच्या करिता जास्त अनुदान दिले जाते. त्यांना 35 टक्के अनुदान दिले जाते. सोबतच एस सी व एस टी करिता येवढेच अनुदान देण्यात येते.
  • आणि तुमच्या कडे हा व्यवसाय करण्याकरिता काहीच भांडवल नसेल. तर सरकार याकरिता कर्ज देते.
  • तसेच तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा लोन मधून बदक पालन साठी लोन घेवू शकता.

बदकाच्या या जाती तुम्ही पाळू शकता.

बदक पालन व्यवसाय करण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावे लागणार, की काही बदक हे अंडे द्यायला चांगले असतात, तर काही माससाठी. काळजी नको आपल्या देशात दोन्ही गोष्टीची पूर्तता करणारी बदकाची जात सुद्धा आहे.

ज्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी चांगल्या प्रमाणात मिळवू शकता. यामुळे बदक पालन सुरु करण्याआधी तुम्हाला त्यांच्या जाती बद्दल माहीत असणे चांगले राहणार.

बदकाच्या जाती

अंड्यांचे उत्पादन करिता बदक

  • भारतीय धावक बदक
  • खाकी कैपबेल बदक
  • व्हाइट आणि ग्रेनिष भारतीय धावक बदक

मास उत्पादन करिता बदक

  • रुल कागुआ बदक
  • स्वीडन बदक
  • मस्कोवी बदक
  • आयलेसब्री बदक

मास व अंडे दोन्ही करिता उपयुक्त बदक

  • खाकी कैपबेल बदक

हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻