गुगलने डूडल बनवून एका खास व्यक्तिमत्त्वाचे टाकले फोटो

Dr. Mario Molina

आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि, गुगलचे सर्च इंजिन जगभरात वापरले जाते. असं म्हणतात कि, गुगलकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. गुगल सर्च इंजिनवर तुम्ही तुमचा प्रश्न टाकताच तुमच्या प्रश्नाची अनेक उत्तरे तुमच्यासमोर उघडतात. तसेच गुगलच्या सर्च इंजिनला प्रत्येक कॅटेगरीच्या युजर्सपर्यंत पोहोचता येते, अशा परिस्थितीत गुगलही आपल्या यूजर्सना दररोज काहीतरी खास देत असते.

आज गुगलने डूडल बनवून एका खास व्यक्तिमत्त्वाचे फोटो टाकले आहे. गुगल आज डॉ. मारियो मोलिनाचे डूडल सर्च इंजिनवर ठेवण्यात आले आहे. आता तुमच्या मनात हाच प्रश्न येत असेल, की शेवटी डॉ. मारियो मोलिना कोण आहे? या लेखात आम्ही तुम्हाला डॉ. मारिओ मोलिना बद्दल सांगणार आहे.

मेक्सिकन केमिस्ट डॉ. मारियो मोलिना हे एक संशोधक होते, त्यांच्या संशोधनादरम्यान त्यांना असे आढळून आले, की क्लोरोफ्लुरोकार्बन हे पृथ्वीच्या जीवरक्षक ओझोन थरासाठी धोकादायक आहेत. डॉ. मारियो मोलिना अंटार्क्टिक ओझोन छिद्र शोधणारे पहिले होते.

डॉ. मारियो मोलिनाचा जन्म आणि मृत्यू

गुगल डूडलच्या माध्यमातून आज डॉ. मारियो मोलिनाचा ८० वा वाढदिवस साजरा करत आहे. यांचा जन्म 19 मार्च 1943 रोजी मेक्सिको सिटीमध्ये झाला. फक्त 2020 मध्येच 7 ऑक्टोबर रोजी महान शोधानंतर त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. मेक्सिकोमध्ये राहत असताना वयाच्या ७७ व्या वर्षी डॉ. मारिओ मोलिना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नोबेल पारितोषिक 1995 साली मिळाले

1995 मध्ये डॉ. मारियो मोलिना यांना त्यांच्या उत्कृष्ट शोधासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. डॉ. मारियो मोलिना यांना लहानपणापासूनच विज्ञानात विशेष रस होता. त्यांनी आपल्या बाथरूमचे प्रयोगशाळेत रूपांतर केले. यावरून त्यांची विज्ञानातील रुची लक्षात येते.

जगासाठी मोठा शोध लावणाऱ्या डॉ. मारियो मोलिना यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह नेचर जर्नल या पुस्तकाद्वारे त्यांचे संशोधन मांडले. हे संशोधन मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा आधार बनले.

नंतर आंतरराष्ट्रीय करारामुळे ओझोन थराला धोका निर्माण करणाऱ्या सुमारे 100 रसायनांवर बंदी घालण्यात आली होती.

Share