तुम्ही वाळवंटात हरवले असाल.! तर तुम्हाला दिशा कशी कळेल?

जर तुम्ही वाळवंटात हरवले असाल.! तुम्हाला फक्त कुठल्या दिशेने जायचे आहे. इतकेच माहिती असेल आणि तुमच्या कडे असे कुठल्याच प्रकारचे यंत्र नाही, ज्यामुळे तुम्हाला योग्य दिशा कळेल, तर तुम्ही पुढील गोष्टी करून योग्य दिशा माहिती करून घेऊ शकता. चला तर त्याबद्दल माहिती घेऊया.!

फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे…

Direction in Marathi

Image Source – Social Media

१) एक उभी काठी जमिनीवर 90 डिग्री वर ठेवा आणि सावलीचे टोक जिथे आहे, तिथे एक छोटासा दगड ठेवा.

२) त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे थांबा आणि सावलीचे टोक जिथे सरकले असेल, तिथे दुसरा दगड ठेवा.

३) त्या दोन बिंदूंमध्ये एक सरळ रेषा काढा, ही झाली तुमची पूर्व-पश्चिम रेषा.

४) त्यानंतर तुमचा डावा पाय पहिल्या दगडावर आणि उजवा पाय दुसऱ्या दगडावर ठेवा. आता तुमचे तोंड उत्तरेकडे असेल. पृथ्वीवर कुठेही, सावलीचे पहिले चिन्ह हे पश्चिम दिशाच असते, आणि दुसरे म्हणजे पूर्व दिशा .

या पद्धतीने तुम्ही दिशा माहिती करून घेऊ शकता. हि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा.! तसेच हि उपयुक्त माहिती तुमच्या परिजनांमध्ये अवश्य share करायला विसरू नका.!

अश्याच प्रकारच्या माहिती साठी परत माहिती लेक या वेबसाइट ला अवश्य भेट द्या.! धन्यवाद..!

  • सागर राऊत

हे वाचलंत का ? –

Share