Small Business Ideas : सध्याचे युग हे शिक्षणा पेक्षा स्किल वर अधिक भर देत आहे. सरकारी नोकऱ्यांचे स्वप्न पाहणारे तरुण स्टार्टअपच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्यांच्या वार्षिक पॅकेजइतके दरमहा कमाई करत आहेत आणि इतर तरुणांनाही त्यांच्या व्यवसायात रोजगार देत आहेत. हा फॅक्ट आपल्याला सर्वत्र दिसून पडत आहे.

यासोबतच देशातील तरुण अनेक विशेष स्किल शिकून आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत. या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून, तरुण मोठ्या प्रमाणावर छोटी-छोटी कामे व्यवस्थित करत आहेत आणि चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. आज आपण अशाच एका स्किल स्पेशलायझेशन कोर्सबद्दल बोलणार आहोत.

कार-डिटेलिंग स्पेशालिस्ट (Car-detailing Specialist)

स्पेशलायझेशनच्या या युगात टॉप ट्रेंड स्किल्सद्वारे आज अनेक छोटी आणि सोपी कामे मोठ्या व्यवसायाला जन्म देत आहेत. कार-डिटेलिंग स्पेशालिस्ट हे असेच एक कुशल काम आहे, या फिल्ड मध्ये स्पेशालिस्ट बनून तुम्ही तुमच्या शहरातूनच महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता.

कार-डिटेलिंग ही कारची काळजी घेण्याची एक सुनियोजित प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कार केवळ धुणेच नाही तर त्यापलीकडे पण एक व्यवसाय यामध्ये आहे. ज्यामध्ये कारच्या इंटीरियर आणि एक्सटीरियर भागाचा समावेश आहे. कार-डिटेलिंग विशेषज्ञ हा एक प्रकारचा कार डॉक्टर असतो, जो त्याच्या स्किल च्या आधारावर कारची योग्य काळजी घेतो.

यामध्ये सर्व प्रकारच्या कारवर ट्रीटमेंट केले जातात. सिरॅमिक कोटिंग, इंटीरियर क्लीनिंग आणि कार अॅक्सेसरीज इत्यादी कार-डिटेलिंगचे खास माध्यम आहेत.

कार-डिटेलिंग स्पेशालिस्ट कोर्से (Car-detailing Specialist course)

काही संस्था कार-डिटेलिंग बद्दल कोर्स देखील चालवतात, हा कोर्स मोठ्या प्रमाणावर परदेशात केला जातो, परंतु आपल्या देशात देखील काही संस्था याशी संबंधित कोर्स चालवतात, ज्याची माहिती तुम्हाला तुमच्या ठिकाणानुसार मिळू शकते.

या कोर्सची किंमत फक्त ₹ 10000 इतकी आहे आणि हा कोर्से पूर्ण करायला वेळ देखील फक्त 3 महिन्यांचा लागतो. हा कोर्से पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रही देखील मिळते.

ज्याद्वारे तुम्ही कार-डिटेलिंग स्पेशालिस्ट म्हणून बाजारात स्वतःचा बिसनेस चालू करू शकता, तसेच, कोर्स केल्यानंतर, तुम्ही तुमच्या नावासह कार-डिटेलिंग स्पेशालिस्ट देखील लिहू शकता.


माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *