अमेरिकेमध्ये श्रीमंत लोकांचं मृत शरीर जिवंत करण्यासाठी सुरक्षित ठेवण्यात येतात.

body preservation after death

आपल्या सगळ्यांनाच हे माहीत आहे. कि मृत्यू जीवनातील सगळ्यात मोठं सत्य आहे. म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू कधीना कधी अटळ आहे. तरीही काही लोक असे असतात, ज्यांना मारण्याची भीती सतत सतावत असते व त्यांना अमर व्हायचं असतं. असेच काही लोकांना मेल्यानंतर हजारो वर्ष पुन्हा जिवंत होऊन जगायचं असत.

आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रोसेस द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत.

या लोकांचं मत आहे की, भविष्यात जर मृत शरीराला जिवंत करण्याची टेकनॉलॉजि आलीच तर मृत शरीरांना पुन्हा जिवंत केलं जाऊ शकेल.

ही आधुनिक लॅब अमेरिकेत आहे. इथे अल्कोर लाईफ एक्सटेंशन फाऊंडेशन नावाची क्रायोनिक्स कंपनी मृतदेहांना भविष्यासाठी सुरक्षित ठेवत आहे. या कंपनीमध्ये सध्या १४०० लोक काम करतात. या कंपनीने एकट्या अमेरिकेत २३० मृतदेहांना संरक्षित केलं आहे. तर जगाबाबत सांगायचं तर या कंपनीने आतापर्यंत ५०० मृतदेह संरक्षित केले आहेत.

हे कस काम करत?

ही कंपनी मृतदेहांना क्रायोप्रिजर्वेशन पद्धतीने संरक्षित करते. म्हणजे मृतदेह क्रायोनिक्स ट्यूबमध्ये -१९६ डिग्रीच्या खालच्या तापमानात ठेवले जातात. तेच जिवंत कोशिका, ऊतक आणि इतर गोष्टी शून्य ते खालच्या तापमानात संरक्षित केल्या जातात.

सरासरी एक मृतदेह क्रायोप्रिजर्वेशन करण्यासाठी साधारण १.८ कोटी रूपये खर्च येतो. तेच जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मेंदुला फ्रीज करायचं असेल तर त्यासाठी जवळपास ६६ लाख रूपये खर्च लागतो.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻