bear meaning in marathi

bear-meaning-in-marathi

अस्वल

1) अस्वल दिवसाला खूप सक्रीय असतात. हे क्वचितच रात्री दिसतात. तेही खाद्य शोधण्यासाठी.

2) अस्वल ला एकट राहायला आवडते. हे फक्त प्रजननासाठी एकत्र येतात. नंतर वेगळे होऊन जातात.

3) अस्वल चे समोरील पंजे, हे मागच्या पंजा पेक्षा मोठे असतात.

4) बर्फाच्या ठिकाणी राहणाऱ्या अस्वलीच्या अंगावर एक इंचा मध्ये 9600 केस असतात. हे केस त्यांना बर्फाच्या थंडी पासून वाचवतात.

5) दक्षिण अमेरिकेत आढळणारे अस्वल. हे रात्रीला जास्त सक्रिय असतात. हे रात्रीच शिकार करतात.

6) अस्वलाचा विकास हा हळू हळू झालेला आहे. आधीचे अस्वल हे कुत्र्या एवढे असायचे, सर्वात जुने अस्वल हे Dawn bear. हे दोन करोड वर्षांपूर्वी पृथ्वी वर राहत होते. त्यांचा आकार एका छोट्या कुत्रा एवढा असायचा.

7) जगात काही असे अस्वल आहेत, जे काळे राहतात. नंतर काही दिवसाने ते पांढरे होऊन जातात. अमेरिकेत या अस्वलांन बद्दल अंधश्रद्धा आहे, की यांच्याकडे काही दैवीशक्ती आहेत.

8) बर्फाच्या ठिकाणी राहणाऱ्या अस्वल चे वजन 480 किलो राहते. जे तसेच मादी अस्वल चे वजन हे या पेक्षा अर्धे राहते.

9) रशिया मधील संयुक्त रशिया पार्टीचे चिन्ह हे अस्वल आहे. जे त्यांचा विजयला दर्शविते.

10) bear हा एक इंग्रजी मधील खूप जुना शब्द आहे. त्याचा अर्थ होतो चमकता भुरा.

11) अस्वल हे माणसा प्रमाणे पाहू शकतात. हो त्यांना माणसानं पेक्षा थोडं कमी दिसत. परंतु अस्वल ची वास घेण्याची क्षमता ही माणसापेक्षा शंभर पटीने जास्त आहे.

12) बर्फाळप्रदेशात राहणारी अस्वले हे 32 किलोमीटर वरून कोणताही गंध ओळखू शकतात. त्याचसोबत ते बर्फात आत असलेली तीन फूट खाली असलेली मासोळी चा गंध घेऊ शकतात.

13) बर्फ मध्ये राहणारे अस्वल 160 किलोमीटर पोहू शकतात.

14) अमेरिकेतील 98 टक्के अस्वल हे अलास्का मध्ये आहेत.

15) दक्षिण अमेरिकेत राहणारे अस्वल दिमक खातात. या अस्वलांना समोरील दोन दात नसल्यामुळे हे दिमक ला आत ओढून घेतात.

16) दैत्य पांडा अस्वल चे डोके हे खूप मोठे असते. याचे कारण की त्यांचा जबडा हा खूप मजबूत असतो. जो बांबू खाण्यासाठी आहे. हे अस्वल 99 टक्के भोजनात बांबू खातात आणि बाकी बांबू मधील किडे व मास.

17) पांडा अस्वल ला एक अंगठा असतो. जो बांबू तोडण्यासाठी व खाण्यासाठी असतो. दिवसाला 21 किलो बांबू हे अस्वल खाऊ शकतात.

18) बर्फाळप्रदेशात राहणारे अस्वल हे 8 फुट लांब उडी मारू शकतात.

bear in marathi

bear-in-marathi

bear information in marathi

19) अस्वल चे पाय हे त्यांचं संतुलन बनवून ठेवण्यासाठी थोडे वाकडे असतात.

20) अस्वल हा असा स्तनपाई प्राणी आहे, जो कलर मध्ये पाहू शकतो.

21) काही अस्वल हे दोन पायावर चालू शकतात.

22) अस्वलांची हृदय गती 40 प्रति मिनिट असते आणि बर्फाळप्रदेशात झोपलेल्या अस्वलाची हृदय गती 8 प्रति मिनिट असते.

23) अस्वल हे 64 किलोमीटर प्रति तास धावू शकतात.

24) सूर्य जातीच्या अस्वल चे पंजे हे खूप मोठे असतात व त्यांची जीभ ही 9 इंच लांब राहते.

25) बर्फाळप्रदेशात राहणारे अस्वल फक्त मांसाहारी असतात. बाकी कडे राहणारे अस्वल इतर काही खातात.

26) जंगलात राहणारे अस्वल हे 30 वर्ष जगते व पिंजऱ्यात असलेले 47 ते 48 वर्षे.

27) अस्वल हे खूप हुशार असतात त्यांना पकडण्यासाठी लावलेला पिंजरा किंवा फास ते ओळखू शकतात.

28) अस्वलाच्या दाता वरून त्यांच्या वयाचा अंदाज आपण लावू शकतो.

  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Animal’s

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *