सॅल्मन फिश खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तसेच नुकसान सुद्धा

रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्याकरिता ज्या प्रकारे शरीराला चिकन, मटण किंवा अंड्याची गरज असते, त्याप्रमाणे शरीराला माशांची तितकीच गरज असते. जर मासे नियमित स्वरूपात खाल्ले गेले, तर अनेक समस्या आपोआप दूर होतात. कधीकधी डॉक्टर एखाद्या विशिष्ट आजारात मासे खाण्याची शिफारस करतात.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला एका खास प्रकारच्या माशांबद्दल सांगणार आहोत, म्हणजे ‘सॅल्मन फिश’. सॅल्मन माशाला (salmon fish) मराठी भाषेत रावस मासा (Rawas Fish) असे म्हणतात. या माशाचे फायदे जाणून घेतल्यानंतर, आपण आपल्या आहारात नक्कीच त्याचा समावेश करणे पसंत कराल. चला तर मग जाणून घेऊया (salmon fish in marathi) रावस मासा बद्दल आणि त्याचे काही फायदे.

सॅल्मन फिश म्हणजे काय? Salmon fish in Marathi

rawas fish

salmon-fish-in-marathi

salmon fish in marathi / salmon meaning in marathi

सॅल्मन मासा हा साल्‍मोनिडे (Salmonidae) कुटूंबातील एका माशाचा प्रकार आहे. सॅल्मन माश्याचे मूळ ठिकाण हे उत्तर अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर हे आहे.

हा एक प्रकारचा मासा आहे, जो मुख्यतः ताजे आणि मिठाच्या पाण्यात मिळतो. प्रामुख्याने हे मासे गुलाबी किंवा केशरी रंगाचे असतात. या माशाचा शरीरावरील भाग चांदीचा असतो आणि त्याची आतील त्वचा हि गुलाबी किंवा केशरी रंगाची असते. हे मासे प्रामुख्याने समुद्र किंवा मोठ्या नद्यांमध्ये सहज सापडतात.

रावस मासा (salmon fish) म्हणून ओळखल्या जाणारा हा मासा सागरी आणि गोड्या पाण्यात आढळणाऱ्या माशांची एक प्रजाती आहे. हा जो साल्मोनिडे कुटुंबातील आहे. ज्यात ट्राउट, व्हाईटफिश आणि ग्रेलिंग सारख्या प्रजातींचा समावेश आहे. रावस मासे नदीमध्ये अंडी घालतात. असे मानले जाते की हे मासे अंडी घालण्यासाठी गोड्या पाण्यात येतात. नंतर ही अंडी समुद्राच्या दिशेने वाहू जातात आणि समुद्रापर्यंत पोहचल्यावर मोठी होतात.

या माशाचे जास्तीत जास्त वजन 57.4 किलो असू शकते आणि लांबी 1.5 मीटर पर्यंत असू शकते.

  • salmon meaning in marathi – रावस मासा

Salmon fish (रावस मासा) मधील पोषक तत्व

जर तुम्ही फक्त अंडे हेच प्रथिनांचा उच्च स्त्रोत म्हणून विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. रावस मासे प्रथिनेच्या बाबतीत कोणत्याही मांसाहारी पेक्षा कमी नाहीत. ravas fish मध्ये इतर माशांच्या तुलनेत जास्त प्रथिने असतात. अशा स्थितीत शरीरातील प्रथिनांच्या समस्येवर मात करण्यासाठी ravas fish चे सेवन आपण करू शकता. हा मासा व्हिटॅमिन-बी आणि व्हिटॅमिन-डी साठी सर्वोत्तम आहार मानला जातो.

हा लोकप्रिय सागरी माशामध्ये सहज पचण्याजोगे प्रथिने आहेत, हा मासा अमीनो ऍसिडने समृद्ध आहे. rawas fish मध्ये टेमोलिटिक्सच्या स्वरूपात ओमेगा -3 सारख्या फॅटी ऍसिड तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी आहेत. तसेच कोलीन, पॅन्टोथेनिक ऍसिड आणि बायोटिन दिखील यामध्ये आहेत.

या व्यतिरिक्त, रावस मासा मध्ये सेलेनियम, जस्त, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम सारख्या खनिजे देखील असतात. खाली दिलेल्या चार्ट मध्ये रावस माश्यामधील पोषक तत्वे दिलेली आहेत.

पौष्टिक तत्वप्रमाण
पाणी (Water)75.52 ग्रॅम
ऊर्जा (Energy) 127 किलो कॅलोरी
प्रथिने (Protein) 20.5 ग्रॅम
लिपिड (चरबी) – lipid (fat)4.4 ग्रॅम
कॅल्शियम (Calcium) 7 मिग्रॅ
लोह (Iron, Fe)0.38 मिग्रॅ
मॅग्नेशियम (Magnesium) 27 मिग्रॅ
फॉस्फरस (Phosphorus) 261 मिग्रॅ
पोटॅशियम (Potassium)366 मिग्रॅ
सोडियम (Sodium)75 मिग्रॅ
झिंक (Zinc)0.39 मिग्रॅ
कॉपर (Copper)0.063 मिग्रॅ
सेलेनियम (Selenium)31.4 µg
थायमिन (Thiamine)0.08 मिग्रॅ
रिबोफ्लेविन (Riboflavin) 0.105 मिग्रॅ
नियासिन (Niacin)7.995 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी -6 (Vitamin B-6) 6 0.611 मिग्रॅ
व्हिटॅमिन बी -12 (Vitamin B-12)4.15 g
व्हिटॅमिन ए (Vitamin A, RAE) 35 g
फॅटी ऍसिड (Fatty acids saturated) 0.81 ग्रॅम
कोलेस्टेरॉल (Cholesterol) 46 मिग्रॅ
अल्कोहोल, इथाइल (Alcohol, ethyl) 0 ग्रॅम
  • rawas fish in english – salmon fish

रावस मासा खाण्याचे फायदे – benefits of salmon fish

salmon-in-marathi

salmon fish in marathi / rawas fish in english

रावस मासा त्याच्या विशिष्ट पोषक घटकांच्या अस्तित्वमुळे विविध प्रकारचे आरोग्य लाभ मिळवण्यास मदत करते. हे जगातील सर्वात पौष्टिक पदार्थांपैकी एक मानले जाते. विशेषतः ओमेगा -3 फॅटी ऍसिड यामध्ये उपलब्ध असल्या कारणामुळे त्याचे खूप फायदे आहे. चला तर जाणून घेऊया रावस मासा खाण्याचे फायदे –

१) हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य

आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आपण रावस फिशचे सेवन करू शकता. रावस माश्यामध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, ते धमन्या आणि शिरा (नसांना) लवचिक ठेवतात. तसेच यामधील असलेले एमिनो ऍसिड हृदयाच्या स्नायूंना बळकट करतात.

नियमितपणे रावस माशांचे सेवन केल्याने, ते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी ऊतकांचे नुकसान कमी करतात तसेच दुरुस्त करण्यास देखील मदत करतात. रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेमुळे ते रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

तसेच प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी करतात. रावस मासे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाऊ शकता. किव्हा याबद्दल तुम्ही वैद्यकीय सल्ला देखील घेऊ शकता.

२) मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योग्य

ओमेगा -3 फॅटी ऍसिड चे चांगले प्रमाण असलेले पदार्थ मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात. हे पदार्थ स्मृती क्षमतेसह मेंदूशी संबंधित सर्व भागांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थ मज्जासंस्थेचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

या व्यतिरिक्त, हे शरीराची सूज कमी करण्यास देखील मदत करतात. रावस फिशचे सेवन करणे देखील एन्टीडिप्रेसेंट म्हणून काम करते. रावस मासा सेवन केल्याने स्मरण शक्ती क्षमता, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते. याव्यतिरिक्त, हे मूड डिसऑर्डर सुधारण्यास देखील मदत करू शकते.

३) वजन कमी करण्यासाठी योग्य

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी rawas fish खूप फायदेशीर आहे. rawas fish मध्ये असलेल्या उच्च प्रथिनांचे सेवन केल्याने भूक नियंत्रित करण्यास मदत होते. अशा पदार्थांमध्ये भरपूर पाणी तसेच फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पोट भरून ठेवू शकते.

अशा परिस्थितीत, ग्रील्ड सॅल्मन म्हणजे भाजलेले rawas fish हे पोट भरून ठेवतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही. म्हणून हा मासा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रावस मासा मध्ये असलेले पोषक घटक हार्मोन्स नियंत्रित करतात. जे भूक कमी करतात. त्यामधील प्रथिने तुमचे चयापचय दर वाढवतात.

Salmon Fish मध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत करते. तुमचे वजन कमी करण्यासाठी तुम्ही रावस मासा खाऊ शकता.

४) डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य

डोळ्याच्या समस्ये साठी बरेच डॉक्टर मासे खाण्याचा सल्ला देतात कारण कि या माश्यामध्ये पुरेसे ओमेगा -3 फॅटी ऍसिड आहे. ज्याचे सेवन हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. या माशात असलेले ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि एमिनो ऍसिड मॅक्युलर डिजनरेशन, रेटिनाचा कोरडेपणा, दृष्टी कमी होणे, डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी करण्यास मदत करतात.

हे देखील सिद्ध झाले आहे की जे लोक नियमितपणे ओमेगा -3 फॅटी ऍसिड किंवा मासे सेवन करतात. त्यांची दृष्टी इतरांपेक्षा चांगली असते. ravas fish अधिक पौष्टिक आणि निरोगी आहे. दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांसाठी हे आणखी फायदेशीर आहे, कारण त्यात चांगले प्रथिने असतात. जे पचायला सोपे असतात.

५) केसांच्या आरोग्यासाठी योग्य

अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य फायद्यांसह, रावस मासा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ravas fish मध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड, प्रथिने, व्हिटॅमिन बी 12 आणि लोहाचा (iron) चांगला स्रोत आहे. हे पोषक आपल्या डोक्याच्या आरोग्यास चांगले ठेवण्यात मदत करतात.

याशिवाय, ते केसांच्या मुळांना पुरेसे पोषण देतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते. रावस माश्याचे नियमित सेवन करून तुम्ही केस गळण्यापासून वाचवू शकता. जर आपण पुरेशा प्रमाणात रावस माशांचे सेवन करू शकत नसाल तर केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी माश्याच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

६) रक्तदाब कमी करण्यासाठी योग्य

रावस माशामध्ये विशेषतः इकोसापेन्टेनिक ऍसिड आणि डिकोसाहेक्सेनोइक ऍसिड याने समृद्ध असतात, तसेच वर सांगितल्याप्रमाणे ओमेगा -3 फॅटी ऍसिड चे खूप प्रमाण असतात.

हे सेलेनियममध्ये देखील समृद्ध आहे, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. उच्च रक्तदाबमुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका आणखी वाढू शकतो. हृदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी लोकांनी रावस मासा सेवन करावे. ( सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

७) त्वचेच्या आजारांसाठी योग्य

rawas fish चे फायदे त्वचेसाठी देखील पाहिले जाऊ शकतात. rawas fish प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जाते. प्रथिनांचे सेवन आपल्या स्नायूंसाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर रावस माशांना आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.

ravas fish मध्ये ओमेगा -3 फॅट्स भरपूर असतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि लवचिक बनते. या व्यतिरिक्त, रावस माश्या मध्ये आढळणारे अस्‍थैक्‍स‍िथिन (astaxanthin)चे कॅरोटीनॉइड अँटिऑक्सिडंट मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. याकारणास्तव, त्वचा गोरी, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी जगभरातील सौंदर्य तज्ञांनी रावस मासा खाण्याची शिफारस केली आहे.

८) मुलांसाठी रावस माश्याचे सेवन योग्य

प्रौढांबरोबरच, रावस मासा लहान मुलांसाठी देखील फायदेशीर आहे. रावस माशा मधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड, डीएचए आणि ईपीए शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. पण DHA आणि EPA ची कार्ये वेगवेगळी आहेत. ईपीए मूड आणि वर्तन नियंत्रित करतो तर डीएचए पूर्व आणि प्रसूतीनंतरच्या मेंदूच्या विकासास मदत करतो.

संशोधकांचे म्हणणे आहे की, जे मुलं आपल्या जगात हरवलेले असतात. त्यांच्यासाठी या माश्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. रावस मासा सेवन केल्याने मुलांमध्ये एडीएचडी किंवा अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डरची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

९) गर्भधारणे दरम्यान सेवन करणे योग्य

salmon-fish-for-pregnancy

salmon fish in marathi

संशोधकांनी सिद्ध केले आहे की, गर्भधारणेदरम्यान रावस माश्याचे नियमित सेवन आई आणि बाळासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, रावस मासा चे सेवन केल्याने शरीरातील ओमेगा -3 फॅटी ऍसिड ची पातळी वाढू शकते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्सच्या प्रभावापासून देखील वाचवू शकतात.

गर्भवती महिलांनी आठवड्यातून दोनदा रावस माश्याचे नियमित सेवन केल्याने त्यांचा ताण, नैराश्य, दाहक प्रतिसाद कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे गर्भवती महिला स्वतःच्या आणि त्यांच्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी रावस माशांचे सेवन करू शकतात. (आई आणि बाळा च्या आरोग्याचा प्रश्न आहे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या..!)

१०) कर्करोग टाळण्यासाठी योग्य

कर्करोग टाळण्यासाठी रावस फिशचे सेवनही आपण करू शकता. आर्टिकल मध्ये बरेचदा सांगितल्याप्रमाणे, रावस माशांमध्ये ओमेगा – 3 फॅटी ऍसिड आढळतात. हे फॅटी ऍसिड कोलन कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग आणि स्तन कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. त्याकरिता तुम्ही मासे शिजवलेले खाऊ शकतात.

कर्करोग हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा उपचार केवळ वैद्यकीय उपचाराने शक्य आहे. म्हणून, कर्करोगासारख्या स्थितीत, रावस मासे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे.

Rawas Fish पासून होणारे नुकसान – salmon fish in marathi

  • जर रावस मासे पकडण्यासाठी कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला गेला, तर तो हानिकारक असू शकतो. विशेषतः, गर्भवती आणि स्तनपान करणारी महिलांनी रावसमाश्याच्या वापराबद्दल सावध असले पाहिजे, कारण त्यात पॉलीक्लोरिनेटेड, बायफेनिल्स आणि पारा सारखी रसायने असू शकतात. याशिवाय, वैद्यकीय सल्ल्यानंतरच मुलांनीही रावस माशांचे सेवन करावे.
  • बरेच दिवसापासून बर्फात ठेवलेले रावस मासे खाणे टाळावे. यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • कृत्रिमरित्या वाढवलेल्या रावस माश्याचे सेवन करण्यापूर्वी, त्यांना कोणत्याही प्रकारचे जीवाणू टाळण्यासाठी लस दिलेली नाही, हे तपासा. अशा माशांचे सेवन आपली शारीरिक वाढ थांबवू शकते आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकते.
  • दोन प्रकारचे रावस मासे आहेत. ज्यात एक नदी किंवा समुद्रात आढळतो आणि दुसरा जो तलावांमध्ये पाळला जातो. ravas fish जगभरात खूप लोकप्रिय आहे. संशोधक सांगतात की, तलावांमध्ये वाढवलेल्या ravas माशांमध्ये पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल डायऑक्सिन, (PCBs) पारा आणि अनेक क्लोरीनयुक्त कीटकनाशके यासारखे दूषित घटक असतात. अश्या प्रकारच्या माश्यांचे सेवन केल्याने कर्करोग, मधुमेह आणि स्ट्रोक इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

Rawas Fish ला कश्या प्रकारे खाऊ शकतो?

  • रावस मासा तेलात तळून खाल्ले जाऊ शकतात.
  • रावस मासा भाजी करून खाऊ शकतो.
  • हे वाफवून (स्टीम) करून खाऊ शकतो.
  • हे लिंबू लोणीसह शिजवून खाऊ शकतो.

वर दिलेल्या आर्टिकल मध्ये आपण रावस मासा (salmon in marathi) बद्दल जाणून घेतले आहे. आशा करतो कि हे आर्टिकल तुम्हाला नक्की आवडले असेलच; अश्याच छान छान माहिती साठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • सागर राऊत

संदर्भ (Reference) –

(महत्वाची सूचना – हा मासा खाण्यापूर्वी, कृत्रिमरित्या मासे वाढवताना कोणत्याही रासायनिक अन्नपदार्थाचा वापर केला गेला नाही याची खात्री करा. आरोग्य फायद्यांसाठी मासा खाण्यापूर्वी डॉक्टरांचे मत घ्या. समुद्रातून बाहेर काढल्यानंतर कित्येक दिवस बाहेर असलेले रावस मासा खाणे टाळा. जे लोक काही गंभीर आजारावर उपचार घेत आहेत, अशा लोकांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.


हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share