नाशपती फळाबद्दल सविस्तर माहिती (Pears in marathi)

pears meaning in marathi

स्वस्थ राहण्याकरिता चांगला व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. स्वस्थ राहण्याकरिता आपण भाजीपाल्या व्यतिरिक्त फळ सुध्दा खायला पाहिजे. फळांची गोष्ट केली, तर आज मार्केट मध्ये खूप पौष्टीक फळ उपलब्ध आहेत.

त्यातीलच एक आहे नाशपती. मोजक्याच लोकांना या फळा बद्दल माहिती आहे. तसेच या फळांचे फायदेही कमी लोकांना माहीत आहे. याच करीत तुमच्या साठी आम्ही हा लेख लिहिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला नाशपती काय आहे? आणि त्याचे फायदे काय ते सांगणार आहे.

नाशपती म्हणजे काय? (Pear fruit in marathi)

pears in marathi

pears in marathi

नाशपती हे एक फळ आहे. जे थोडे खायला सफरचंद सारखे लागते. हे फळ आपल्या कडे उन्हाळ्यात पाहायला मिळते आणि याचे काही दुसरे प्रकार बाराही महिन्यांमध्ये पाहायला मिळतात. या फळाला भारतामध्ये नाशपती असे म्हणतात, तर भारताबाहेर इंग्रजीमध्ये याच फळाला पेअर असे म्हणतात. हे फळ खायला गोड असते. परंतु यातील काही प्रकार थोडे आंबट असतात.

हे वाचलंत का? –
* चिया सीड म्हणजे काय?
* मेथी बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्की माहित नसेल.!

तसे तर नाशपती चे खूप प्रकार आहेत त्यामधील काही मोजके प्रकार आम्ही खाली दिले आहेत.

1) ग्रीन ओनजू (Green Anjou)

2) रेड ओनजू (Red Anjou)

3) ग्रीन बार्लेट (Green Bartlett)

4) रेड बार्लेट (Red Bartlett)

5) बॉस्क (Bosc)

6) फॉरेल (Forelle)

7) कोमाइस (Comice)

चला तर आता पाहू नाशपती चे फायदे (benefits of pear) कोणते आहेत.

पेर फळ खाण्याचे फायदे (Pear fruit Benefits in marathi)

नाशपती चे खूप फायदे आहेत, त्यातील काही फायदे आपण आता पाहणार आहोत. चला तर बघूया आरोग्यासाठी नाशपती चे फायदे.

1) ब्लड प्रेशर करिता नाशपती चा फायदा

जर तुम्हाला ब्लड प्रेशर चा त्रास आल्यास, त्यामधून स्वतःला दूर करायचं असल्यास. तर नाशपती ला आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यावे. हे फळ उच रक्तदाब च्या समस्ये पासून तुम्हाला दूर करून तुम्हाला नेहमी स्वस्थ रहायला मदत करेल.

2) पाचनशक्ती वाढवण्याकरीता

आपल्या बाहेर खाण्या पिण्याच्या खराब सवई व मसाल्यांच्या अति सेवनामुळे पोटाच्या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. याकरिता तुम्ही नाशपती ला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून तुमची पचनशक्ती मजबूत करू शकता.

यामध्ये पेक्टिन नावाचा एक घटक असतो. जो म्हणायला फायबरच आहे. या घटकांच्या नियमित सेवनाने तुमची पचनक्रिया स्वथ होऊन तुमचे आरोग्य चांगले होते. लक्षात ठेवा तुम्हाला पोटा संबंधित कोणती बिमारी असल्यास नाशपती खाण्यापूर्वी डॉक्टर चा सल्ला घ्या. नाहीतर त्या समस्या आणखी वाढू शकतात.

3) हाडांसाठी फायदा

वाढत्या वयात आपल्याला खाण्या पिण्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे शरीरात पोषक तत्व कमी होतात. ज्या मुळे हड्यांची समस्या जाणवू लागते. ज्यामुळे शरीरात ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार जन्म घेतात. हा आजार शरीरात कैल्शियम, विटामिन्स आणि मिनरल्स च्या कमतरते मुळे होतो.

या आजारा मध्ये हाडे कमकुवत होतात. ज्यामुळे त्या थोडे काही झाले की तुटू शकतात किंवा तुम्हाला कमर दुःखी, पाठ दुःखी सारखे आजार होऊ शकतात. याच करीत आपल्याला नाशपती चे सेवन करून ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारापासून स्वतःची सुटका करायची आहे. नाशपती तुमच्या शरीरातील ph ला संतुलित ठेवतो. यामधील बोरॉन नावाचा घटक शरीरात कैल्शियम तयार करण्यात मदत करतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस पासून आपण दूर राहू शकतो.

4) इम्युनिटी वाढवण्यासाठी नाशपती

स्वस्थ आणि निरोगी आरोग्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. या करिता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नाशपती खूप चांगले मानले जाते. नाशपती मध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट गुण हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात.

5) मधुमेहावर नाशपतीचा फायदा

जर आज आपण मधुमेहा चा विचार करतो, तर आज ही एक खूप मोठी समस्या झाली आहे. मधुमेह हा सर्दी खोकला सारखा कुणालाही होत आहे. एकदा जर कुणाला मधुमेह झाला, तर त्याला आयुष्य भर आरोग्याच्या समस्या जाणवतात. मधुमेहापासून दूर राहण्या करीता नाशपती चे सेवन करणे लाभदायक आहे.

यामध्ये एंटी-डायबिटिक गुण आहेत. जे डायबेटीस पासून तुम्हाला वाचवून ठेवतात. याच सोबत नाशपती मध्ये फायबर चे प्रमाण खूप असल्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोज चे प्रमाण संतुलित ठेवण्यात हे मदत करतात.

6) हृदयासाठी फायदेशीर

जर आरोग्या संबधी बोलायचं झालं, तर आज हृद्यसंबंधीत आजार आज सामान्य झाले आहेत. याचे कारण आहे; आपले बद्दलेले राहणीमान. जर अशा काळात आपल्याला हृदयाला स्वस्थ ठेवायचे असल्यास, नाशपती ला आहारात जागा द्यावी लागणार. नाशपती हे उंच रक्तदाब व हृदयाच्या सर्व आजारावर परिणामकारक आहे. यामुळे तुमचे हृदय स्वस्थ राहील. तर आजच नाशपती ला आपल्या आहारात समाविष्ट करा.

7) वजन कमी करण्याकरिता

आज वाढते वजन ही जवळ-जवळ सर्वांची समस्या होत चालली आहे. तुमचे सुद्धा वजन वाढत असेल, तर नाशपती हे तुमच्या कामाचे फळ आहे. एका अध्ययना मध्ये असे दिसून आले, की तुम्ही नाशपती चे सेवन नियमित करता, तर तुमचे वजन संतुलित राहून अधिक ची चरबी कमी होण्यास मदत होते. याच करीत नाशपती तुमच्या आहारात असेल, तर वजन वाढण्याची समस्या तुम्हाला येणार नाही.

8) लिव्हर करीता नाशपती चा फायदा

आपल्या शरीरात खूप प्रकारचे पार्ट आहेत, त्यातीलच एक आहे लिव्हर. नाशपती खाणे तुमच्या लिव्हर साठी लाभकारक आहे. यामध्ये हेपाटोप्रोटेक्टिव घटक आहे. जो तुमच्या लिव्हर ला कोणत्याही आजारापासून वाचवतो. आपल्या लिव्हर ला स्वस्थ ठेवण्यासाठी आणि नेहमी निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारात नाशपती चा समावेश करा.

9) सूजन कमी करण्यासाठी फायदेशीर

आपल्या शरीरावरील सुजण कमी करण्यासाठी नाशपती हे उपयुक्त आहे. नाशपती मध्ये असलेला कैरोटीन आणि जियाजैंथिन हे सुजन कमी करण्यासाठी परिणाकरक ठरतात. या मध्ये असलेला इंफ्लेमेटरी गुण हा कोणत्याही प्रकारची सुजन कमी करण्यात मदत करतो. याकरिता या फळाला आपण आहारात घेऊ शकतो.

10) गळ्याच्या समस्येसाठी

काही वेळा उन्हाळ्यात आपल्याला गळ्यात किंवा स्वास घेताना त्रास होतो./ याकरिता नाशपती तुमची मदत करू शकते. तुम्ही जर नाशपती चे जूस घेता. तर यामुळे तुम्हाला आराम होईल. नाशपती हे गळ्यातील वोकल कॉर्ड ला आलेली सुजन कमी करू शकते व गळ्याच्या त्रासाला दूर करते. जर तुम्हाला उन्हाळ्यात उष्णते मुळे होणाऱ्या त्रास मधून वाचायचे असेल, तर नाशपती चे जूस एक चांगला पर्याय आहे.

nashpati in marathi

nashpati in marathi

नाशपती चे दुष्परिणाम

नाशपती चे दुष्परिणाम म्हणजे घाबरण्याचे काही कारण नाही. फक्त तुम्हाला सावधान करून देण्यासाठी थोडी माहिती दिलेली आहे. कारण तुम्ही याचा स्वाद चाखता चाखता याचे सेवन प्रमाना बाहेर करू नये.

  • जर तुम्हाला सर्दी खोखला झालेला असेल, तर नाशपती खाणे टाळा. कारण हे खूप थंड स्वरूपाचे फळ आहे. यामुळे तुमचा सर्दी खोखला वाढू शकतो.
  • नाशपती ला सफरचंद सारखेच कापल्या नंतर लवकर खावे. कारण हे थोडा वेळाने खराब होऊन त्याचा कलर भुरकट होऊन जातो. व यानंतर याला खाने हानिकारक आहे.
  • तुम्हाला पोटाचा कोणता त्रास असेल, तर हे फळ डॉक्टर चा सल्ला घेउन नाशपती खावे.

हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

( महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला नाशपती बद्दल माहिती देणे असल्याकारणाने नाशपती चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.)

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share