नवरीसाठी 52 भन्नाट विनोदी उखाणे|Marathi Ukhane for Female

Share

लग्न म्हटलं की आनंद, उत्साह, नाच-गाणी आणि धमाल आलीच! लग्नसमारंभात नवरीने उखाणा घेण्याची परंपरा विशेष महत्त्वाची असते. पारंपरिक उखाण्यांसोबतच आजकाल विनोदी उखाण्यांनाही मोठी पसंती मिळत आहे. नवरीने एखादा भन्नाट आणि मजेशीर उखाणा घेतला की संपूर्ण लग्नमंडपात हशा पिकतो आणि वातावरण आणखी रंगतदार होते.

या लेखामध्ये आम्ही नवरीसाठी खास निवडलेले मजेशीर, खट्याळ आणि धमाल विनोदी मराठी उखाणे दिले आहेत. यामध्ये नवऱ्याच्या सवयी, मित्रमंडळी, नोकरी, व्यवसाय, दारू, प्रेम आणि संसारावर आधारित भन्नाट उखाण्यांचा समावेश आहे.

Telegram Channel वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

हे उखाणे तुम्ही लग्नात, हळदी समारंभात, रिसेप्शनमध्ये किंवा गृहप्रवेशाच्या वेळी घेऊ शकता. प्रत्येक उखाण्यात थोडी मस्ती, थोडा विनोद आणि भरपूर मनोरंजन आहे.

तुमच्या नवऱ्याचे नाव रिकाम्या जागेत टाका आणि आपल्या खास अंदाजात उखाणा सादर करा. मात्र उखाणे घेताना प्रसंगाचे भान ठेवा आणि सर्वांना आनंद मिळेल याची काळजी घ्या.

चला तर मग, पाहूया नवरीसाठी खास धमाल विनोदी मराठी उखाणे आणि लग्नसमारंभात सर्वांना खळखळून हसवूया!


पाहुणे आहेत वरातीत, पिऊन तर्राट,
________ च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.

9 to 5 जॉब करून, आयुष्याची लागली आहे वाट,
मी जॉब सोडणार आता, कारण ________ रावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ.

समुद्र कितीही खवळला तरी, किनाऱ्यावर आदळतात लाटा,
________ राव कितीही पिले तरी, विसरत नाही घरच्या वाटा.

महाराष्ट्रात एक, फेमस जंगल आहे ताडोबा,
________ राव बाहेर आहेत मांजर, आणि माझ्यासमोर बनतात वाघोबा.

संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा,
मी केला पसारा तर तो, ________ रावांनी आवरायचा.

शिडी वर शिडी, बत्तीस शिडी,
________ राव वडतात बिडी, आणि मी लावते काडी.

कुणी जुगार सट्टेबाज, कोणी खेळतो मुंबई मटका,
________ अहो कमी खेळा, नाहीतर एक दिवस बसेल मोठा फटका.

पाहुण्यांसाठी कितीही करा, ते ठेवतात नावे,
________ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकले असेल तर आपआपल्या घरी जावे.

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
________ रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.

सोसता सोसेना हा, संसाराचा ताप,
________ राव अजूनही सुधरले नाहीत, होऊन दोन मुलांचे बाप.

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
________ राव आहेत, माझ्यासाठी पागल.

उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन,
तरीपण ________ राव आहेत, माझे मोठे फॅन.

प्रेमाने भरवते मी, कोंबडी वड्याचा घास,
पण ________ रावांना आहे, मुळव्याधाचा त्रास.

प्रत्येक नाक्यावर भेटते, सिगारेट आणि चहाची टपरी,
________ राव आहेत, एक नंबरचे छपरी.

छान बनवतो, नाक्यावरचा अण्णा इडली डोसा,
________ राव आहेत बिनकामी, आता त्यांना आयुष्यभर पोसा.

बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड,
________ राव काढतात नेहमी, मुलींची खोड.

भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,
________ आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.

आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा,
________ च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.

गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या,
________ आहे माझा, हार्दिक पंड्या.

व्हिस्कीपेक्षा छान आहे वोडका,
________ आपल्या लग्नानंतर, भाजी बनवेल मी दोडका.

हजार कमी पडतात, लाखाशिवाय बात नाही,
________ रावांचा FB वर फोटो लाईक केल्याशिवाय, पोरी राहत नाही.

चहासोबत लागतो, चांगला मस्का पाव,
________ रावांची बाहेर किती लफडी, ते विचारू नका राव.

ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग,
________ रावांचे नाव घेते, तुमच्या नानाची टांग.

दारूच्या नावाने, नेहमी असते बोंब,
________ अहो कमी प्या, नाहीतर येतील कोंब.

नळावर पाणी भरताना, मारायचे लाईन,
________ रावांनी अखेर केले, कोर्ट मॅरेज करून पेपर साईन.

आयलायनर लावला की, मुली दिसतात छान,
________ राव नेहमी, माझा मेकअप करतात घाण.

कारल्याची भाजी, लागते खूप कडू,
________ रावांचे प्रवचन ऐकून, लागतात कान सडू.

गाजर खायला, आवडते सशाला,
________ च नाव घ्यायला, आग्रह कशाला.

हाताची घडी, तोंडावर बोट,
________ डोकं नसेल चालत, तर मारा एक व्हिस्कीचा घोट.

फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा,
________ रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा.

बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी तोटा,
तरीपण ________ रावांनी उडवल्या, लग्नात १०० च्या नोटा.

पिऊन आल्यावर, अंगात येतो खूप जोश,
मला बघताच, ________ रावांचे उडतात होश.

नवरात्रीमध्ये गरबा खेळताना, झाली पहिली भेट,
________ रावांची झाली, मी बायको सेट.

नागपंचमीला नाग, प्यायला येतो दूध,
________ राव पिऊन आले की, नसते त्यांना कसली सुध.

बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू,
________ राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू.

________ राव आणि माझा, संसार होईल सुखकर,
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.

हळदीमध्ये पाहुणे पिऊन, झाले आहेत टाईट,
________ राव कमी प्या, पोट वाढलं आहे, आता जीन्स होईल टाईट.

लग्न करण्याच्या आधी, खूप केले होते वादे,
________ राव दिसतात, तेवढे नाही आहेत साधे.

खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या,
________ रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिरच्या.

लग्न किती पण चांगले करा, पण काही लोक ठेवतात नावे,
________ रावांची इच्छा आहे, अशा लोकांना दोन कानाखाली ठेवून द्यावे.

सर्व मिळून नाचू उडू, घालूया फुगड्या,
सासरच्या महिला रुसल्या, कारण ________ रावांनी नाही दिल्या, त्यांना लुगड्या.

अर्ध्या वाटेत, काटा मला लागला,
________ रावांचे नाव घेते, त्यांच्या डोक्यावर कावळा हागला.

कोणाला आवडतो BJP, तर कोणाला SHIVSENA पक्ष,
________ राव मला आवडतात, कारण ते आहेत अपक्ष.

उष्णता खूप वाढली म्हणून, ह्यांनी आणली कुल्फी,
________ रावांसोबत काढते आज, सर्वांसमोर सेल्फी.

थंडी सहन होत नाही, तर हात ठेवा शेकोटीच्या ज्वालांवर,
________ मी नाचणार नाही, नेहमी तुमच्या तालांवर.

________ रावांना आहे, नोकरी सरकारी,
म्हणून तर मी घेऊ शकले, उंच भरारी.

थंडी गुलाबी, हवा ही शराबी,
खिशात पैसे नसले तरी, ________ रावांचे शौक आहेत नवाबी.

लग्न एकदाच होते, करा जपून,
________ पिऊन आले की, मी बसते लपून.

आवाज ऐकू येत नाय तर, करा साफ कान,
________ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

कोकणात जाताना, गाडीत बसतात खूप हादरे,
________ रावांचे नाव घेते, आहेत खूप पादरे.

संसाराची गाडी, दोघांनी मिळून ओढायची,
________ रावांची मस्ती सहन करून, आयुष्यभर साथ निभवायची.

फुलपाखरू उडते बागेत, मधमाशी करते गुणगुण,
________ रावांच्या खोड्यांमुळे, घरात हसते खिदळते मन.

आंबा असतो गोड, लिंबू असतो आंबट,
________ रावांचा स्वभाव कधी गोड, तर कधी तिखट.

Must Read: उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव|Marathi ukhane for male


Share

Leave a Comment