बरेचसे छोटे उद्योग बंद पडण्याचं कारण जाणून घ्या.!

आजकाल नोकरीची परिस्तिथी बघता नवीन पिढी ही व्यवसायकडे वळलेली आपल्याला दिसते. कुठलाही व्यवसाय म्हंटलकी भांडवल हे आलंच.

परिस्तिथी नसतांना परिस्तिथी वर मात करून घरचांच्या विरोधात जाऊन ही पिढी स्वतःचा एक छोटा उद्योग उभा करतात.
तो उद्योग उभा करण्यामागचे बरेच जणांचे वेगवेगळे स्वप्न असू शकतात.

बिजनेस प्लान मराठी

छोटे-उद्योग-का-बंद-पडतात-1

बिझनेस आयडिया

बरेचसे छोटे उद्योग यामुळे बंद पडतात.

ते स्वप्न डोळ्यासमोर ठेवून अहोरात्र मेहनत करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. स्वतःचा साठवलेला पैशातून आणि बँक मधून घेतलेल्या कर्जातून एक स्वतःच विश्व तयार करायला निघालेली पिढीला भरपूर त्रास सहन करावा लागतो. त्याच त्रासातला एक त्रास म्हणजे उद्योजकांना महिना अखेरीस जमा झालेल्या चिल्लर पैशाचा असतो.

आपण छोट्या उद्योगा बद्दल बोलतोय, तर ही उद्योजक काही कुठलीहजारो रुपयाची एक वस्तू तयार नाही करत. तर ते छोट्या छोट्या वस्तू बनवतात. आत्ता मुद्याकडे बघू…!

हे वाचलंत का? –
* महिला गृह उद्योग यादी
* कमी भांडवल मध्ये सुरु करण्यासारखे व्यवसाय

लहानलहान उद्योजकाकडे महिन्याच्या अखेरीस भरपूर प्रमाणात चिल्लर जमा झालेले असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात चिल्लर चे काय करायचे हा सर्वात मोठा प्रश्न या उद्योजकांना पडतो.

तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, मग बँक कश्यासाठी आहे. नेमकी हीच तर अडचण आहे, की या चिल्लरचे काय करावे हे बँकवाल्यांना पण माहीत नाही. तर या उद्योजकांनी नेमकं काय करायला पाहिजे. बँक फक्त प्रत्येक व्यक्तीकडून एके दिवशी १०००/- रुपयाचीच चिल्लर घेतात.

उस्मानाबाद मध्ये एक छोटासा उद्योग आहे, fanger नमकीन म्हणून त्याच्याकडे ४ -distributor आहेत. त्या distributor कडे १२०- काउंटर आहेत.

उदा.-
एका काउंटरकडे (दुकानदार) ६०००/-ची चिल्लर ६ महिन्यात जमा होतात.
तर, १२० दुकानदार(काउंटर) कडे

 १२० दुकानदार * ६०००/- ची चिल्लर
     = ७२००००/- चिल्लर

ते पण ६ महिन्यात……

तर या उद्योजकांनी उद्योग करायचा की चिल्लर गोळा करायचे. बर चिल्लर गोळा जरी केली, तर ती नेमकी घेणार कोण बँकांनकडे गेले, तर ते हात वर करतात.

उलट तेच उद्योजकांना सल्ला देतात की, छोट्याछोट्या दुकानदारांना ते चिल्लर द्या. आणि यामध्ये पण आत्ता अस झालं की चिल्लर पण द्या त्यावर ५% कमिशन द्या. आणि या उद्योजकांची ६% तर मार्जिन असते.

rupees-mahitilake

याआधी एस-टी महामंडळ देखील या अडचणीतून गेलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल तर आधी एस-टी बस ची तिकीट २१/-,२३/-,२८/- रुपये असायची पण आत्ता २०/-,२५/-,३०/- रुपये अशी करण्यात आली. का तर त्यामागचे हेच ते कारण.

चिल्लर च्या बाबतीत अजून एक उदाहरण आहे.शिर्डी, पंढरपूर आणि शेगाव ला लाखो भाविक येतात. ते त्यांच्यानुसार दान पेटीमध्ये दान टाकतात. कोणी १रुपया तर कोणी ५ तर कोणी १० रुपये.

तर या देवस्थान ट्रस्ट कडे ४० ते ५० कोटी रुपयांपेक्षा दान येत असेल. यात चिल्लर अर्पण करणाऱ्या भाविकांची संख्या पण खूप मोठी आहे.

देवस्थानाकडे इतके चिल्लर आलेत की, त्यांना सुध्दा कळत नाहीये की, ते चिल्लर कुठे ठेवायचे. वर्षांच्या शेवटास देवस्थानाकडे ३० ते ४० लाख रुपयांची चिल्लर जमा असते.

असे कितीतरी पोत्याचे ढीग मंदिरात लागलेले आहेत. त्यात दुष्काळात तेरावा महिना का म्हणून तर सरकार परत २० रुपयाचा कॉइन काढत आहे.

यावर सरकारने तातडीने पाऊल उचलायला हवं. या चिल्लर पायी किती तरी लाखो रुपयाचे व्याज बुडत आहे , हे सरकारच्या लक्ष्यात यायला हवे.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share