या देशात सर्वाधिक पगार मिळतो, भारताचा यात कितवा क्रमांक

काही कंपन्या जास्त पगार देतात, तर काही कंपन्या कमी पगार देतात. त्याचप्रमाणे पगार देण्याच्या बाबतीत अनेक देश खूप पुढे आहेत, तर भारताचा यात कुठला क्रमांक आहे ते जाणून घेऊया.!

Salary in India

Salary in India : जगात करोडो लोक महिनेवारी पगारावर काम करतात. हेच त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन असते. दर महिन्याला येणाऱ्या पगारातून लोक आपला खर्च उचलतात आणि दैनंदिन गरजाही पूर्ण करतात.

पगाराच्या बद्दल बोलायचे झाले तर, काही कंपन्या जास्त पगार देतात, तर काही कंपन्या कमी पगार देतात. जास्त पगार देण्याच्या बाबतीत अनेक देश खूप पुढे आहेत, तर कमी पगार देण्याच्या बाबतीत बरेच देश मागे सुद्धा आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही त्या देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे जास्त पगार दिला जातो. चला तर जाणून घेऊया.

या देशामध्ये मिळतो जास्त पगार

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, युरोपमधील स्वित्झर्लंड या देशात सर्वाधिक सरासरी मासिक वेतन दिले जाते. येथे सरासरी पगार सुमारे $6298 आहे. यानंतर, लक्झेंबर्ग हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे महिन्याचा पगार हा सरासरी $5122 आहे. यानंतर सिंगापूर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे सरासरी मासिक पगार $4990 इतका आहे.

अमेरिका हा चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचा सरासरी मासिक पगार $4664 आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर आइसलँडचे नाव येते. आइसलँडचा मासिक पगार 4383 डॉलर आहे. यानंतर कतारचा क्रमांक लागतो. कतारमध्ये सरासरी मासिक पगार $4147 आहे. दुसरीकडे, नेदरलँडचे नाव आठव्या क्रमांकावर आहे, जिथे सरासरी मासिक वेतन 3550 आहे.

यामध्ये भारताची कितवा क्रमांक?

यानंतर UAE चा सरासरी मासिक पगार $3511 नऊव्या क्रमांकावर आहे. तसेच नॉर्वे 10 व्या क्रमांकावर आहे. जिथे पगार 3510 डॉलर इतका आहे. जर आपण भारताबद्दल बोललो, तर या यादीत भारत मागे आहे. भारताचा क्रमांक ६४ व्या क्रमांकावर आहे. भारताचा मासिक सरासरी पगार $594 आहे. अशा परिस्थितीत टॉप 10 देशांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी भारताला खूप मेहनत करावी लागणार आहे.


हे वाचलंत का ? –

Share