मूंग शेती ठरेल फायद्याची बस या प्रकारे करा, मूंग शेती

Mung Sheti in Marathi : मूंग शेती म्हणजेच मूंगाची शेती, तशी तर तुमच्याकडे शेतात पाणी असेलच, तर तुम्ही कोणत्याही ऋतू मध्ये ही शेती करू शकता, परंतु मूंग शेती करिता पावसाळा उत्तम मानला जातो. पावसाळ्यात मुंगाची शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळते.

mung sheti in marathi

सर्व डाळी या प्रोटीन युक्त मानल्या जातात. या मधून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. याच प्रमाणे मूंगची डाळ सुद्धा आपल्या करिता प्रोटीन युक्त आहे. मूंग शेती आपण खरीप, रब्बी, या दोन्ही हंगामात घेवू शकतो.

हे पीक काढणी झाल्यावर, आपल्या शेतात आपण नांगरणी करून याच्या उर्वरित भागाला माती मध्ये दाबून त्याच खत तयार करू शकतो. 

या मुळे आपल्या शेतीमधील मातीत खताची काही प्रमाणात पूर्तता होते. 

मूंग शेती करायला माती कशी असावी.?

  • मूंग शेती करण्यासाठी उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन अतिशय चांगली मानली जाते. मूंग शेती करिता आपले शेत हे योग्य रित्या पाण्याचा निचरा होणारे असावे. नाहीतर पाणी एका जागी थांबल्यास मूंग पीक पाण्याने खराब होऊ शकत.
  • या पिकाला अती जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासत नाही. 
  • मूंग शेती करिता शेत तयार करतांना खोल नांगरणी करून चांगली माती पालटून नंतर शेतीला पाण्याचा निचरा होण्याकरिता समतोल करून घ्यावे. नंतर पेरणी करावी. 
  • मूंग पेरणी करिता योग्य दिवस व तारीख १५ जुलै पर्यंत मानली जाते आणि तुम्ही जर लवकर येणारा मूंग व्हरायटी पेरणार असणार तर ३० जुलै पर्यंत तुम्ही पेरणी करू शकता.

मूंग शेती करिता खत व्यवस्थापन

मूंग हे डाळ वर्गीय पीक असल्यामुळे, या पिकाला कमीत कमी नायट्रोजन मिळाले तरी चालते. 

या करिता तुम्ही एका एकरात ७ किलो नायट्रोजन टाकू शकता आणि १२ ते १५ किलो फास्फोरस देवू शकता.

(ही माहिती इंटनेट वरील रिसर्च नुसार दिली जात आहे. तुम्ही कोणत्याही पिकाला खत देण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

आज या आधुनिक काळात आपण शेती करत असताना, आपल्या शेतीला फक्त रासायनिक खते देतो. त्यामुळे आज आपल्याला पीक कमी होत आहे. आणि आपली जमीन खराब होत आहे.

यामुळे मूंग शेती करत असताना वर्षाला शेन खत आपल्या शेतात नक्की टाका. यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढेल व आपल्याला पीक चांगले होईल.

याच सोबत आज रासायनिक खताच्या अती वापरामुळे, बुरशी ची समस्या खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

त्याकरिता ६०० ग्राम राईसोबियम कल्चर आणि पाव किलो गूळ सोबत पाण्यात टाकून गरम करून घ्या आणि थंड झाल्यावर त्यामध्ये आपले बी चांगले भिजून घ्या आणि उन्हात सुकायला टाकून द्या. आणि दुसऱ्या दिवशी पेरणी करून घ्या.

मूंग शेती मधील तन व्यवस्थापन 

मूंग पेरणी केल्यानंतर पाच ते सात दिवसांनी पेन्डीमेथलिन ३.३० लिटर घेवून त्याला ५०० लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि प्रति हेक्टर फवारणी करा. लक्ष असू द्या फवारणी झाल्या नंतर त्या शेतात कुणी फिरणार नाही.

मूंग पीक जेव्हा एक महिन्याचे होऊन जाईल. तेव्हा त्याला निंदन द्यावे. यामुळे तन व्यवस्थापन होईल व त्याच्या मुळांना हवा मिळेल. 

मूंग शेती मधील रोग नियंत्रण व व्यवस्थापन 

आपण पेरणी दरम्यान बुरशी नाशक वापरले, असले तरी मूळ कीड लागून झाड वाळू शकतात या करिता पेरणी आधी क्लोरोपैरिफॉस पावडर २० ते २५ किलो प्रति हेक्टरी शेतात टाकून द्या. 

मूंग हा एका हेक्टर मध्ये ७ ते ८ क्विंटल होतो, पावूस चांगला झाला तर हे पीक कमी-जास्त होवू शकते. मूंग शेती करण्याकरिता एका हेक्टर मध्ये २०,००० ते ३०,००० इतका खर्च येतो.


हे वाचलंत का ? –

Share