QR code information in Marathi / QR code in Marathi
Image Source – presto.com
QR code म्हणजे काय? आणि तो कसा काम करतो?
तुम्ही खूप जागी बार कोड आणि QR कोड बघितला असेल, याला पाहून तुमच्या मनात प्रश्न आला असेलच की, याच उपयोग नेमका काय?QR कोड म्हणजे काय? आणि हा कसा काम करतो?
बार कोड आणि QR कोड तुम्ही खूप जागी बघितले असणार; यातील बार कोड तर खूप जागी बघायला मिळतो हा कॉमन आहे. बार कोड मध्ये दोन प्रकारच्या उभ्या लाईन असतात काळ्या व पांढऱ्या रंगाच्या. बारकोड तुम्हाला कोणत्याही प्रोडक्ट वर पाहायला मिळेल. हा बुक्स वर सुद्धा असतो. जेव्हा तुम्ही कोणत्या मोठया दुकानात जाता. तेव्हा तुम्ही घेतलेल्या प्रोडक्ट वरील बार कोड ला स्कॅन करून तुम्हाला ते प्रोडक्ट दिले जाते.
QR कोड बद्दल बोलायचं झालं, तर हा कोड चोकोनी असतो आणि यामध्ये एक वेगळाच पॅटर्न तयार केलेला असतो. QR code तुम्हाला तिकीट, वेबसाईट, ऑनलाईन पेमेंट, आणि आता आधार कार्ड वर पण हा कोड येत आहे.
जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती घ्यायची असेल. तेव्हा हा कोड स्कॅन करून घ्या. QR कोड च पूर्ण नाव Quick response code आहे. चला तर मग बघूया की QR code काम कसा करतो आणि याचे काय फायदे आहेत.
आपण बार कोड च्या तुलनेत QR कोड मध्ये अधिक माहिती साठवू शकतो. आणि QR कोड फाटल्या नंतर ही आपण यातील माहिती काढू शकतो. QR कोड मध्ये आपल्याला तीन कोपऱ्यात तीन बॉक्स असतात.
त्याचसोबत यामध्ये टायमिंग लाइन आणि error connection ब्लॉक असतात. तर आता बघू हा काम कसा करतो.
तर यामध्ये 4 by 2 चे ब्लॉक असतात. जे एकमेकांना error connection नि जोडले असतात. यावर दिलेल्या बॉक्स मध्ये नंबर सेट असतात. ज्या नंबर वर काळे बॉक्स असतात. त्याला आपण मोजून घेऊ उदाहरणार्थ 1 4 7 आणि 3 या वर ब्लॅक तर 1+4+7+3=15 याचा नंबर मध्ये 15 चा अर्थ फुलस्टॉप अस आपण मानून घेऊ यानुसार जे ब्लॅक चा अर्थ फुलस्टॉप आहे.
याच प्रकारे आपण कोणत्याही QR कोड मध्ये कोणती माहिती आहे. हे आपल्या मोबाईल च्या साहाय्याने स्कॅन करून वाचू शकतो. आता पाहू की बारकोड कसा काम करतो.
हे वाचलंत का? – * आपला मोबाइल डुप्लिकेट तर नाही.? या तीन पद्धतीने तपासा.! * मालवेयर पासून आपले डिव्हाईस कसे वाचवायचे.? |
QR कोड कसा वापरावा?
QR कोड तयार करणे खूप मोठी गोष्ट नाही. QR कोड तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तयार करू शकता. ते ही फ्री मध्ये. आपण जर विचार करतो, याच्या वापरायची तर तुम्हाला QR कोड हा कुठेही मिळून जातो. तर आपण पाहूया की तुम्ही याला personally कसा वापरावा.
1) तुम्ही याचा वापर तुमचा वायफाय चा पावर्ड secured ठेवण्याकरिता करू शकता. जस तुम्ही तुमच्या मित्राला password न सांगता QR कोड देऊन कनेक्ट करू शकता.
2) जर तुमची कोणती शॉप असेल, तर तुम्ही payment घेण्यासाठी qr कोड चा वापर करू शकता.
3) तुम्ही याला तुमच्या फेसबुक पेज साठी सुद्धा वापरू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या फेसबुक पेज ची लिंक कोडींग करू शकता आणि जेव्हा कुणी हा QR कोड स्कॅन करेल तेव्हा तो तुमच्या पेज वर जाईल.
4) तुम्ही याचा वापर तुमच्या विसीटिंग कार्ड मध्ये सुद्धा करू शकता. ज्याद्वारे तुम्ही तुमची संपूर्ण माहिती देऊ शकता.
5) तुम्ही याचा वापर तुमच्या वेबसाईटसाठी सुद्धा करू शकता.
अश्याच प्रकारे तुम्ही याचा वापर खूप ठिकाणी माहिती देण्याकरिता करू शकता. तुम्हाला आता याचे फायदे माहीत झाले असेल तर जसे काही गोष्टीचे फायदे असतात. व सोबत नुकसान सुद्धा तसेच याचे सुद्धा काही नुकसान आहेत. जर कोणाला तुमच्या मोबाइल ला हॅक करायचे, असेल तर तो या कोड मध्ये हॅकिंग कोड टाकून तुमच्या कडून स्कॅन करून घेऊ शकतो.
तर या नंतर तुम्ही कुठेही व केव्हाही QR कोड स्कॅन करतांना. जे trusted source आहेत, त्यांनाच स्कॅन करा. ही गोष्ट व्हायचे खूप कमी चान्स आहेत.
QR code तयार करण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळ ला भेट देऊ शकता आणि या वरून तुम्ही तुमच्याकडे कोणतीही माहिती असेल ती QR कोड मध्ये साठवू शकता.
CLICK ON THE LINK FOR MAKE QR CODE – (QR maker website)
QR कोडचा शोध
QR कोड सर्वात आधी 1994 मध्ये टोयोटा ग्रुप च्या “डेन्सो-वेव्ह” उपकंपनीने वापरला होता. जी जपानी कंपनी आहे. म्हणूनच त्यांना क्यूआर कोडचा शोधकर्ता म्हणून ओळखले जाते.
वास्तविक पाहता QR कोड कंपनीच्या विविध पार्टस ला ट्रॅक करण्यासाठी तयार करण्यात आला होता, परंतु जेव्हा लोकांना त्याची माहिती तसेच त्यापासून फायदा मिळाला. तेव्हा त्याची उपयुक्तता वाढू लागली. आणि आज ते जवळजवळ सर्व कंपन्यांमध्ये वापरले जात आहे.
बारकोड म्हणजे काय? आणि तो कसा काम करतो?
barcode in marathi
image Souce – gs1.org
बारकोड हा दिसायला एक आडवी पट्टी ज्यात उभ्या काळ्या व पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असतात. परंतु यामध्ये आपण जास्त माहिती साठवू शकत नाही. हा एक वेळ स्टोर झाला की तुम्ही याला नंतर सहज रित्या वाचू शकता.
जर आपण बार कोड काम कसा करतो? याचा विचार करतो, तर या यामध्ये 1 ते 9 पर्यंत कोणताही नंबर असू शकतो. यामध्ये सर्व लाइन मध्ये 7 टाकला आहे. जर यामध्ये 7 लाइन उभ्या आहेत. ज्या मधील काही काळ्या आणि काही पांढऱ्या आहेत.
तर या मधील प्रत्येक लाइन ला एक नंबर असतो. आपण जेव्हा या बारकोड ला laser scanner ने scan करतो. तेव्हा ज्या पांढऱ्या लाइन आहेत. त्या लेझर च्या किरणांना परत पाठवतात आणि काळ्या लाइन लेझर ला आत घेऊन घेतात. ज्या पांढऱ्या लाइन वरून लेझर किरणे परत आलीत तो एक आहे.
आणि जिथून लेझर परत जात नाही. तो शून्य असतो. तर अस आपण त्याला सात-सात मध्ये devide करून माहिती करून घेतो की पहिला दुसरा आणि तिसरा कोणता आहे. याच प्रकारे आपण बार कोड चे नबर सहजरित्या वाचू शकतो.
आधी हे बारकोड ला वाचण्याकरीता खूप भारी laser चा वापर केला जायचा. आज आपल्याकडे handle readers आहेत. ज्याने खूप सहज रित्या आपण ते वाचू शकतो. परंतु या मध्ये काही दोष आहेत. ते म्हणजे बारकोड जर फाटला तर याला वाचणे खूप कठीण आहे आणि यामध्ये आपण माहिती सुद्धा कमी टाकू शकतो.
निष्कर्ष
आम्ही तुम्हाला QR आणि बारकोड बद्दल बरीच माहिती दिली आहे. आशा आहे की तुम्हा सर्वांना QR कोड म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे समजले असेल. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने कोणताही QR कोड स्कॅन करू शकता. याच्या मदतीने तुम्हाला कोणताही मजकूर, वेबसाइटचा पत्ता किंवा एखादे उत्पादन असल्यास त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते.
QR कोड स्कॅन करताना तुम्ही काही खबरदारी देखील घेतली पाहिजे. जर एखादा QR कोड विश्वासार्ह नसेल किंवा तुम्हाला काहीतरी चुकीचे वाटत असेल, तर तो स्कॅन करू नका.
काही लोक QR कोडद्वारे तुमच्या फोनवर virus सॉफ्टवेअर पाठवून तुमचे नुकसान करू शकतात. त्यामुळे QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगा.
qr code information in marathi हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..! धन्यवाद…
- धिरज तायडे
माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.