ज्यांची मुलगी लग्नाला आलेली असते, त्या आई वडिलांना आपल्या मुलीला चांगला मुलगा मिळावा त्यासाठीची होणारी धळ-पळ हि काय आपल्या पासून लपलेली बाब नाही. मुलगा असो कि मुलगी प्रत्येकाला आपला जीवन साथी चांगलाच असायला पाहिजे असं वाटत, यात काय वावगं.!
आज काळ मुलगा बघतांना , मुलाचं घरदार, श्रीमंती, चेहरा, शरीरयष्टी सगळं एका दृष्टीक्षेपात दिसते, पण ज्या गोष्टींची अत्यंत आवश्यक व उपयुक्त ठरेल अशी त्या विषयी अधिक निकड व योग्य असलेली माहिती आजूबाजूच्या लोकांकडून किवा त्याच्या कडून प्रत्यक्ष भेटीत विचारली गेली पाहिजे.
ते प्रश्न खालील प्रमाणे असू शकतात. जसे कि,
१) कामाचे, व्यवसायाचे ठिकाण अगदी योग्य पत्ता सकट माहिती करणे
२) महिन्याचे वेतन किती, म्हणजेच मुलाचे उत्पन्न.
३) कुठल्या प्रकारचे व्यसन जसे की, सिगरेट, गुटखा, दारू, जुगार इत्यादी
४) लग्ना आधी लफडी होती का? असल्यास ती लफडी बंद आहेत की चालु आहेत. ( या प्रश्नांची माहिती बाहेरूनच घ्यावीत. तोंडावर विचाराल तर तोंडावर खाल.!)
५) महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोर्न ची लत किती प्रमाणात आहे. (घाणेरडे चित्रपट पाहण्याचा नाद)
६) स्वभाव कसा आहे. संशयी, मनमिळावू, खोळसर, कि लाजाळू
७) त्या मुलाला कुटुंबात कशी वागणूक मिळते. ( मुलाचे कुटुंबात काय स्थान आहे.)
८ ) एकत्र की विभक्त कुटुंब पद्धती आवडते. (जॉईंट फॅमिली कि एकटे राहणे)
९) मित्रांची ओढ किती प्रमाणात आहे. संध्याकाळ कुठे घालवली जाते. तसेच संध्याकाळी घरी किती ला परत येतो.
१०) लोकं सोबत बोलण्याची पद्धत कशी आहे.
११) समाजात त्याला कुठल्या नावाने संबोधले जाते. (उदा. – जसे नरेंद्र नावाच्या व्यक्तीला नारू म्हणतात.)
हे वाचलंत का ? –