जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस 2023 – आज जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. ऑटिझम या आजारावर हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘तारे जमीन पर’ आहे.
Autism spectrum disorder meaning in marathi
world autism awareness day
ज्यामध्ये इशान अवस्थी या मानसिक आजाराचा रुग्ण असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर खान आणि बालकलाकार दर्शील सफारी आहेत. या चित्रपटात ऑटिझमने ग्रस्त असलेल्या, मुलाच्या आयुष्यातील अनेक समस्या दाखवल्या आहेत.
हे वाचलंत का ? – * होम लोन भरण्यास असमर्थ असल्यास! या पद्धतीचा अवलंब करा.! * डोक्यात केमिकल लोचा झाला म्हणजे काय? |
ऑटिझम हा एक मानसिक आजार आहे. या आजाराचे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. यामध्ये बहुतेक असे दिसून येते, की ऑटिझमची लक्षणे मुलांच्या सुरुवातीच्या आयुष्यात दिसू लागतात.
त्यामुळे या आजाराने ग्रस्त बालकांचा मानसिक विकास थांबतो आणि असे मुले लोकांना भेटन्यास घाबरतात.
या आजाराने ग्रस्त असलेल्या, मुलांमध्ये अगदी लहान वयातच ऑटिझमची लक्षणे दिसू लागतात. मात्र, काही मुलांमध्ये ऑटिझमची लक्षणे उशिराहि दिसून येतात. साधारणतः ऑटिझमची लक्षणे वयाच्या दोन वर्षांनी दिसू लागतात.
ऑटिझमची लक्षणे
- डोळ्याचा संपर्क टाळणे.
- नावाला प्रतिसाद न देणे.
- कोणाशी न बोलने किंवा प्रतिक्रिया न देणे.
- खूप राग येणे.
ऑटिझम असलेल्या व्यक्तीमधील वागणूकीमुळे लक्षणांची तीव्रता बदलू शकते. ऑटिझम असलेल्या काही मुलांना वाचन आणि लिहिण्यात समस्या असू शकतात, तर काहींची बुद्धी सामान्य मुलांपेक्षा कमी असू शकते.
तर काही मुलांची बुद्धिमत्ता इतर सामान्य मुलांपेक्षा खूप जास्त असू शकते.
ऑटिझमची कारणे
अनुवांशिक
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरसाठी अनेक वेगवेगळे जीन्स जबाबदार असू शकतात. अनुवांशिक विकारामुळे काही मुलांना ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असू शकतो. जसे की – रेट सिंड्रोम किंवा फ्रेजाइल एक्स सिंड्रोम.
पर्यावरणाचे घटकामुळे
विषाणूजन्य संसर्ग, औषधोपचार आणि गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या समस्या यामुळे हा आजार होऊ शकतो. पण ऑटिझम किती प्रमाणात होण्याची शक्यताआहे , यावर संशोधक संशोधन करत आहेत.
ऑटिझम प्रतिबंधित आहे का?
ऑटिझम टाळणे शक्य नाही. परंतु उपचारांच्या माध्यमातून काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळवता येते. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर लवकरात लवकर शोधून त्यावर उपचार केले जातील, तितकेच चांगले आहे.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे वागणूक, कौशल्ये आणि भाषा सुधारण्यास मदत होईल.
ऑटिझम उपचार
ऑटिझमवर सध्या कोणताही उपचार नाही. ऑटिझमच्या उपचाराचा उद्देश एकच आहे कि, मुलाची लक्षणे नियंत्रित करणे आणि त्याची शिकण्याची क्षमता वाढवणे हा आहे.
ऑटिझम असलेल्या रुग्णावर उपचार करण्याचा मार्ग देखील सतत बदलला पाहिजे, कारण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा केल्याने कंटाळा येऊ शकतो आणि उपचारांना मदत करणे थांबू शकते.
उपचारांसाठी वापरल्या जानाऱ्या पद्धती
- वर्तणूक आणि संप्रेषण थेरपी
- शिक्षण थेरपी
- कौटुंबिक उपचार
- स्पीच थेरपी
- व्यावसायिक थेरपी
- डेली लिव्हिंग थेरपी
- शारिरीक उपचार
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरशी संबंधित सत्यता
- गैरसमज – ऑटिझम असलेल्या लोकांना भावना जाणवत नाहीत.
- वस्तुस्थिती – ऑटिझम असलेल्या मुलांना/व्यक्तीला सर्व भावना जाणवू शकतात, परंतु त्यांना इतर लोकांशी संवाद साधण्यात / बनवण्यात अडचणी येतात.
- गैरसमज – ऑटिझम बरा होऊ शकतो.
- वस्तुस्थिती – ऑटिझम हा एक विकार आहे. ज्यावर उपचार करणे शक्य नाही. हा एक आजीवन विकार आहे आणि तो थेरपी किंवा औषधोपचाराने बरा होऊ शकत नाही.
- गैरसमज – ऑटिस्टिक लोक बौद्धिकदृष्ट्या अक्षम असतात आणि बोलू शकत नाहीत.
- वस्तुस्थिती – ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) असलेल्या, व्यक्तींच्या क्षमता आणि कार्ये भिन्न असतात. काहींना बौद्धिक अपंगत्व किंवा बोलण्यात अडचणी असू शकतात, तर काहींना नसू देखील शकतात.
- गैरसमज – ऑटिझम असलेले लोक स्वतंत्रपणे जगू शकत नाहीत किंवा यशस्वी करिअर करू शकत नाहीत.
- वस्तुस्थिती – अनेक ऑटिस्टिक व्यक्ती स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम आहेत आणि यशस्वीरित्या करिअर करत आहेत.
- गैरसमज – ऑटिझम फक्त मुलांमध्ये होतो.
- वस्तुस्थिती – ऑटिझम हा आजीवन विकासात्मक विकार आहे. बालपणात लक्षणे अधिक दिसू शकतात, परंतु वाढल्यानंतरही ऑटिस्टिक लक्षणे कायम राहतात. बर्याच प्रौढांमध्ये, त्याची लक्षणे बालपण गेल्यानंतरच दिसून येतात.
- गैरसमज – सर्व ऑटिस्टिक लोकांमध्ये समान लक्षणे असतात.
- वस्तुस्थिती – ऑटिस्टिक लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे असू शकतात. जसे कि, संभाषणात अडचण, संवेदनात्मक प्रक्रिया करण्यात अडचण आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे यासारखे लक्षणे दिसून येतात. आणि ऑटिझम असलेली प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी असते.
- गैरसमज – ऑटिस्टिक मुले अधिक हिंसक असतात.
- वस्तुस्थिती – ऑटिस्टिक मुले अधिक हिंसक नसतात. हा फक्त गैरसमज आहे.
मोहिनी राऊत