फ्लाइट मधील जेवण चवदार नसते. फ्लाइटमध्ये अन्न खराब ठेवले जाते की, आणखी काही कारण आहे?

Why does airplane food taste bad

फ्लाइट प्रवासादरम्यान तुम्ही फ्लाइट मधील जेवण कधी केले आहे का? बहुतांश लोक तक्रार करतात, की फ्लाइट फूड चवदार नसत. आज आपण जाणून घेऊ, यामागचे कारण काय?

बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी आपण रेल्वे, कार आणि बसने प्रवास करायचो, आता वेळेची बचत करण्यासाठी पैशांचा विचार न करता अधिकाधिक प्रवास विमानाने केला जातो. याचे अनेक फायदे आहेत पण काही तोटे देखील आहेत.

आज आपण अश्याच एका विषयाबद्दल जाणून घेऊया. जिथे ट्रेनने प्रवास करताना, तुम्ही तुमच्यासोबत घरगुती स्वादिष्ट पदार्थ घेऊन जाऊ शकता आणि ते निवांत उघडून लोणचे आणि इतर गोष्टींसह खाऊ शकता. परंतु फ्लाइटमध्ये अनेक गोष्टी घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत आणि लांब अंतराच्या प्रवासात तुम्हाला फ्लाइटमध्ये उपलब्ध अन्नच खावे लागेल.

बहुतांश लोक तक्रार करतात की, फ्लाइट फूड चवदार नसते. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो कि, फ्लाइटमध्ये अन्न खराब ठेवले जाते की आणखी काही कारण आहे?

यावर अनेक संशोधने झाली आणि एका गोष्टीवर सर्वांचे एकमत झाले की, हवेत उंचावर गेल्यावर आपल्या चवींवर वेगळा परिणाम होतो. हा परिणाम केवळ चवीवरच नाही, तर वास घेण्याच्या आणि पाहण्याच्या क्षमतेवर देखील होतो. या सर्व गोष्टी मिळून आपल्या अन्नाची चव आपल्या इंद्रियांपर्यंत (मेंदू पर्यंत) पोचवतात, त्यामुळे त्यात खूप बदल दिसू लागतो.

जेव्हा आपण फ्लाइटमध्ये उडत असतो. तेव्हा आपल्या संवेदनांवर (सेन्स) विपरीत परिणाम होतो. यामुळेच तुम्हाला जेवण चांगले आणि चविष्ट वाटत नाही. यामध्ये दोष फक्त अन्नाचाच नसून, तर परिस्थितीचाही आहे. फ्लाइट दरम्यान केबिनमध्ये हवेचा दाब कमी असतो, आर्द्रतेचा अभाव आणि आवाजाची पातळी जास्त असते.

याचा परिणाम आपल्या वास घेण्याच्या क्षमतेवर होतो. पुरेशा मॉइश्चर शिवाय आपण वास घेऊ शकत नाही. वास आणि चव यांचा संपर्क एकमेकांशी जोडलेले असल्याने, आपल्या जेवणाला जेवढी चविष्ट चव घरी येते तेवढी फ्लाइटमध्ये येत नाही.

वेगवेगळ्या अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, 30 हजार फूट उंचीवर आपण गोड, खारट आणि मसालेदार 20 ते 30 टक्के कमी समजू शकतो. पण इथे आपल्याला उमामीची चव म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट जास्त मिळते. अशा परिस्थितीत पनीर, मशरूम, चीज, टोमॅटो, मांस किंवा सीफूड खाल्ल्यास चव चांगली येते.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻