चिंता यातून स्वतःला मुक्त करण्याचे 6 उपाय

मानसिक तणाव कमी करण्याचे उपाय | Stress Management in Marathi

चिंता….म्हणजे काय? या शब्दाची सरळ भाषेत व्याख्या करायची झाल्यास आपण असे म्हणू शकतो की, मनाच्या अशांतीतुन निर्माण झालेली गोष्ट!

तसेच आपण याला असे देखील म्हणू शकतो की, मनाचे जे संतुलन बिघडवते ती म्हणजेच चिंता!

चिंता ही खूप प्रकारची असू शकते. जसे की, कुणाला नौकरीची चिंता, कुणाला लग्न नाही जमत त्याची चिंता, कुणाला आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नसल्याची चिंता, कुणाला भविष्याची चिंता!

चिंता हे एक असे आजार आहे, जे माणसाला आतून मधून पोखरून काढतो. अचानक मरण येणं आणि त्रासून त्रासून मरण येणं यात फरक आहे. यामधील चिंता हे हळू हळू आणि त्रासून मारण्यासारखं असतं.  

चिंतेचे मूळ कारण हे आशा, आकांशा, अपेक्षा आहे. कुठली गोष्ट किव्हा विचार आपल्या मनाविरुद्ध होत असल्यास त्याची चिंता आपल्याला होते.

मला जर चांगली नोकरी मिळाली नाही. तर काय होईल, पगार कमीच मिळत आहे, माझी बायको माझं ऐकत नाही. माझा नवरा माझं ऐकत नाही. इत्यादी प्रकारच्या चिंता माणसाला त्रासून सोडतात.

तुम्ही या सर्व गोष्टींची चिंता करता परंतु चिंतेतून तुम्हाला काहीच मिळत नाही. चिंता केल्याने तुम्ही काहीच बदलू शकणार नाही. उलट यामध्ये तुम्हीच स्वतःचे नुकसान करून बसाल. 

चिंता ही एक तर तुम्हाला भविष्यात ढकलते किव्हा भूतकाळात घेचते. आणि या सर्वांना मध्ये तुम्ही तुमचा वर्तमान गमावून बसता.

जीवनात इतका तणाव अस्तित्वातच नाही जितका तुम्ही  तुमच्या विचारातून तयार करता. तुम्ही जे चिंता करता तो तुम्ही तुमच्या डोक्यात तयार केलेली एक situation आहे.

चिंता सर्वानाच असते. त्यावर आपले नियंत्रण असणे आवश्यक आहे, परंतु ते न करता, त्या चिंतेला जवळ करून आपण आपलं आयुष्य खराब करतो. 

नमस्कार मित्रांनो, माहिती लेक च्या या चॅनेल मध्ये आपले मनपुर्वक स्वागत आहे.

आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की, चिंतेतून स्वतःला मुक्त कसे करायचे.

1) आधी समजून घ्या. तुम्हाला कितीही चिंता असेल तरी या जगाला तुमच्या चिंतेचे काही घेणे देने नाही. तुम्ही चिंतेत हे जग जरी सोडून गेलात, तरी त्याचा काळिमात्र फरक  कुणाला पडणार नाही. तुमच्या आधी पण हे जग चालत होते आणि नंतर पण चालणार, यात काही शंका नाही. म्हणून तुमचे दुःख, तुमची चिंता ही जगात सर्वात मोठी आहे, असे समजू नका..!

2) तुम्ही चिंता करत असल्याने जर त्याचे समाधान होत असेल, तर तुम्हाला चिंता करण्यापासून कोणीच नाही अडवणार. तुमच्या सारखे बहुसंख्य लोक आहे. जे फक्त चिंता करतात. त्यांच्या हातात अजून समाधान सापडलेले नाही. त्यात तुम्ही पण प्रयत्न करू शकता. मी सांगतो तुम्हाला दूर दूर समाधान दिसणार सुद्धा नाही. म्हणून चिंता करत बसू नका..!

3) सर्व गोष्टी आपल्या मना सारख्याच झाल्या पाहिजे, तुम्ही जे ठरवले ते झालंच पाहिजे. या साठीची तुमची चिंता असेल तर, ते सोडून द्या. त्यातर खूप श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या मनासारख्या पण झाल्या नाहीत. 

उदाहरणार्थ खूप पैसे असून सुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीची ते जीव वाचू शकले नाही. 

4) आपल्या कडून चूक झाली असल्यास, तो व्यक्ती आपल्या बद्दल काय विचार करेल. या चिंतेत तुम्ही असाल तर 100% फसाल. फक्त तुमची कसे वागतात. हे पाहण्यास साठी त्याचा जन्म झालेला नाही. त्याला तुमच्यावर लक्ष ठेवण्या व्यतिरिक्त अजून खूप कामे आहेत. तो काय म्हणेल, लोक काय म्हणतात याचा विचार करू नका..!

5) ज्या गोष्टी करता त्यात आनंद मिळत नाही. उदाहरणार्थ जी नोकरी तुम्ही करता त्यात आनंद न वाटणे, आपला मित्र आपल्या पेक्षा किती तरी पट चांगली नोकरी करत आहे, बायको,  नातेवाईल आपलं ऐकत नाही इत्यादी प्रकारातील चिंता जर तुम्हाला त्रास देत असेल, तर त्या आज आणि आत्ताच सोडून द्या.

आणि एक गोष्ट लक्षात घ्या की, जे होते ते चांगल्याच साठी होत. तुमच्या वाट्याला जे असेल, ते तुम्हाला नक्की मिळणारच. आपल्या ताटात जे वाढले आहे. ते आपल्याला खावेच लागणार. म्हणून चिंता करणे सोडून द्या.फक्त तुमच्या हातामध्ये कृती करणेच एक पर्याय आहे. ते तुम्ही मन लावून करा. भगवत गीतेत स्वतः कृष्णांनी पण म्हटलेले आहे.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन

याचा अर्थ असा की, तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे. फळावर नाही. कर्म कर फळ तुला नक्की मिळेल.

6) जे होत आहे, त्यात चांगले काही शोधा. जे काही घडत असेल, त्यात तुम्ही फक्त वाईटच शोधणार तर तुम्हाला त्यात वाईटच दिसणार. आत्ता तुम्ही म्हणणार हे काय नवीन वाईट मध्ये वाईटच असणार यात चांगले काय शोधान्यासारखे.

त्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्ष पूर्वक ऐका.

एकदा 4 मित्र सहलीला जायचं ठरवतात. डोंगरावर जायचे अस ठरून ते तिकडे निघतात. ते चौघेही मित्र चार चाकीने त्या दिशेने निघतात. बराच प्रवास करून झाल्यावर डोंगर चढत असतांना त्यांच्या गाडीचा टायर पंचार होतो. 

नाईलाजाने त्यांना खाली उतरून तो टायर बदलावा लागणार असतो. 

त्या सर्वांची चीड चीड होते. कारण टायर बदलायला कमीत कमी त्यांना 1 तास लागला असता. 

त्यातील एक मित्र खिडकी मधून बाहेर डोकावून बघतो आणि बाकी तिघांना म्हणतो. अरे वा बाहेरचा निसर्ग तर बघा चला आपण खाली उतरून फोटो काढुया. असे म्हणून ते सर्व मित्र खाली उतरतात आणि मस्त फोटो काढतात. 

त्यांचे त्या लोकेशन ला खूप छान फोटो निघतात. मग त्या चौघातला एक मित्र म्हणतो. बर झालं आपली गाडी इथे पंचर झाली. नाहीतर इतके चांगले फोटो आपल्याला काढायला मिळालेच नसते.

नंतर ते टायर बदलून पुढे निघतात. दिवस भर डोंगरावर फिरून ते आज त्याच ठिकाणी उंचावर टेंट टाकायचा प्लॅन करतात. त्याच प्रमाणे ते टेंट पण उभारतात. पण जोराचा वाहत असलेल्या वाऱ्यामुळे त्यांचा टेंट उडून जातो.

ते सर्व मित्र चिंतेतच त्या जागी उघड्यावर झोपतात. आणि अचानक एक मित्र म्हणतो ते बघा वर किती मस्त आकाश आहे. त्यातील लुकलूकणार्या चांदण्या किती मस्त दिसत आहे. आपण टेंट मध्ये झोपलो असतो. तर हे चांदण्यांनी टिपलेले आकाश आपल्याला पाहायला मिळाले नसते . बर झाला तो टेंट उडून गेला..

या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला सांगायच इतकंच होते की, वाईटात चांगले शोधा. तसेच वाईट व्यक्ती जरी असेल त्यात पण काही चांगल्या गोष्टी दडलेल्या असतात ते शोधा. तुम्हाला त्यात नक्कीच चांगल्या गोष्टी दिसेल.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. या आर्टिकल चा इतरांना फायदा व्हावा असे वाटत असल्यास मित्रानं मध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. तसेच अश्याच प्रकारच्या माहिती वाचण्यासाठी माहिती लेक ला अवश्य भेट द्या. परत भेटूया एका नवीन विषयावर…धन्यवाद

  • सागर राऊत 

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Motivational

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *