बळीराजाला मिळणार 3 लाख रुपये कर्ज, ही असतील नियम

Shetkari Karj Mafi

shetkari-karj-mafi

बळीराजाला मिळणार 3 लाख रुपये कर्ज बघा तुम्हाला मिळणार का.?

Shetkari Karj : नमस्कार शेतकरी मित्रांनो..! वातावरण मध्ये होणाऱ्या अनैतिक बदला मुळे शेतकऱ्याला खूप मोठ्या नुकसान ला सामोरे जा लागत आहे. अवकाळी पाऊस तर शेतकऱ्याला जणू मारायला निघाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व यामुळे त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत जात आहे.

शेतकरी पीक पेरतो. त्याला राखतो परंतु काढणी च्या काळात त्या पिकाला निसर्ग उध्वस्त करून टाकत आहे. 

शेतकऱ्याला पीक विकल्या नंतर काही थोडे फार पैसे मिळतात. ते त्याला कर्ज फेडण्यात आणि आपला वर्ष भरासाठी संसाराचा गाडा चालवण्यात जातात. आणि दुसऱ्या वर्षी पीक पेरणी वेळी शेतकऱ्या जवळ पेरणी करिता काहीच पैसे शिल्लक राहत नाही.

यामुळे शेतकऱ्याला मजबुरी मध्ये शेती करिता कर्ज काढावे लागते. ज्यावर त्याला आणखी कर्ज आणि त्याचे व्याज भरावे लागते, परंतु आता सरकार नी शेतकऱ्यासाठी बिनव्याजी कर्जाची योजना आणली आहे.

या योजने नुसार शेतकऱ्याला तीन लाख रुपया पर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.

शेतकऱ्याला आता त्याच्या पेरणी करिता व शेतीच्या देखभाली करिता कर्ज मिळणार आहे. आणि ते ही बिनव्याजी आता ही update कशी आहे आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. 

शेतकरी मित्रांनो 2019 साला पासून सरकार शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज देत आहे. या कर्जाची रक्कम एक लाख रू ते तीन लाख आहे. आणि हे कर्ज शेतकऱ्याला दोन्ही सरकार कडून दिले जाते (राज्य व केंद्र).

आता तुम्ही म्हणाल, हे कर्ज काढायचं कुठून तर हे कर्ज तुम्ही तुमच्या जवळील जिल्हा मध्यवर्ती बँक मधून अगदी सहज रित्या काढू शकता.

किंवा प्रायव्हेट बँक मधून सुद्धा हे कर्ज देण्यात येते. आणि हो बँक चा कर्ज देताना एक नियम असतो. तुम्ही कर्जाची परत फेड कालावधीत चांगल्या प्रकारे करत असणार, तर तुम्हाला व्याज अनुदान दिले जाते.

आपण बँक सोबत व्यवहार चांगले ठेवले. आपली कर्जाची परत फेड चांगल्या प्रकारे केली. ते दुसऱ्या वर्षी कर्ज घ्यायला आपल्याला बँक मध्ये जास्त चकरा माराव्या लागणार नाही.

बँक आपल्याला अगदी सहज रित्या कर्ज पुरवेल. काही शेतकरी कर्ज थकीत ठेवतात. भरत नाहीत त्यांना कर्ज माफ होण्याची आशा राहते. अश्या कर्जदारांना बँक चांगल्या प्रकारे वागवत नाही. यामुळे त्यांना परत कर्ज मिळणे कठीण होवून जाते आणि काही दिवसांनी बंद देखील होते.

2023 या वर्षात हे कर्ज एक एप्रिल पासून शेतकऱ्याला देण्यास सुरवात होणार आहे. कर्ज हे नेहमी बँक मार्फत वाटप केले जाते. यामुळे या वर्षी सुद्धा तुम्हाला हे कर्ज बँक मार्फत मिळणार आहे.

जिल्हा बँक, सहकारी बँक या सरकारी बँक मार्फत या कर्ज वाटपाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि हा वरील सांगितल्या प्रमाणे जे कर्जदार नेहमी आपले कर्ज भारतात त्यांना या कर्ज वाटपात प्राधान्य देण्यात येणार आहे.


हे वाचलंत का ? –

Share