आता शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये येणार.!

आता शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 रुपये येणार, मोदी सरकार देते 6000 रुपये, बाकीचे येणार कुठून?

pm-kisan-marathi

महाराष्ट्रात सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार आता शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे.

गुरुवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाचा कार्यभार सभाळणारे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. नवीन योजनेची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, या माध्यमातून दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेवर राज्य सरकार दरवर्षी 6,900 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आधीच वार्षिक 6 हजार रुपये देण्यात येत आहे. ही रक्कम दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.

आतापर्यंत या योजनेचे 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार

सध्याचे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिदें सरकारने अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना वार्षिक 6,000 हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने, राज्यातील शेतकर्‍यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये मानधन मिळणार आहे.

सध्या केंद्र सरकार 6 हजार रुपये देत आहे आणि आता महाराष्ट्र सरकारही तेवढीच रक्कम देणार आहे. तसेच अर्थसंकल्पात राज्य परिवहन बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्कात १ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment