Land Purchase Scheme 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी शेती संबंधी अतिशय महत्वाची माहिती घेवून आलो आहे. कारण आपल्या महाराष्ट्र सरकार ने शेती खरेदी आणि विक्री करण्यासाठी काही नवीन नियम आणले आहेत.
आपण सर्व शेतकरी असल्यामुळे शेती खरेदी विक्री संबंधी सर्व माहिती आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. आपल्याला शेती संबंधी कोणताही व्यवहार करतांना कुठल्याही प्रकारची अडचण होवू नये. म्हणून तुम्हाला ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
आपल्या महाराष्ट्र सरकारने शेती खरेदी व विक्री करायच्या नियमात थोडे बदल केले आहेत. जे तुम्हाला शेती विकत घेतांना किंवा विकत असताना माहीत असणे गरजेचे आहेत.
चला तर मग या पोस्ट मध्ये मी तुम्हाला त्या सर्व नियमान बद्दल माहिती देतो तर पूर्ण माहिती नक्की वाचा.
शेती विकणे व विकत घेण्याबाबत नियम
शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने जो नवीन नियम काढला होता. या कायद्यामुळे आपल्याला आपल्या शेतीचे तुकडे करून विकणे अशक्य झाले आहे. या कायद्यामुळे कोणताही शेतकरी त्याच्या शेतातील गुंठा भर जमीन दुसऱ्याला विकू शकत नाही.
म्हणजेच शेत जमिनीचा छोटा तुकडा विकू शकत नाही. याच सोबत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यासाठी आणखी एक योजना आणली होती. सखोल योजना या योजने मध्ये जर तुम्ही अर्ज केला. तर तुमचे शेती संबंधी जे ही भांडण आहेत. ते २००० रू फी भरून मिटवू शकता.
शेती विषयक नवीन नियम खालील प्रमाणे
पहिला नियम
सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर जर तुमच्या जवळ तीन एकर शेती आहे आणि त्याचा सर्वे नंबर एक आहे. आणि जर तुम्हाला त्यातील काही गुंठे शेत विकायचे असेल, तर ते काही गुंठे जागा तुम्ही समोरील व्यक्ती च्या नावे करू शकत नाही.
हो, तुम्ही जर त्याच सर्वे नंबर मध्ये प्लॉट साठी ले आऊट तयार केले, असेल आणि त्यामध्ये एक दोन गुंठयाचे तुकडे पाडले तर तुम्ही जिल्हाधिकारी याची मंजुरी घेवून या व्यवहाराची नोंद करू शकता.
दुसरा नियम
या नियामा पूर्वी जर कुणी प्रमाणित शेती क्षेत्रापेक्षा कमी शेतीची खरेदी केली असेल, तर अश्या व्यवहारांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागेल.
तिसरा नियम
एखादा तुकडा स्वतंत्र निर्माण झाला असेल, म्हणजेच शेत मोजणी करतांना वेगळा निघाला असेल, व तो प्रमाणित क्षेत्रा पेक्षा कमी असेल आणि भूमी अभिलेख द्वारे हद्द ठरवून दिली असेल. तर अश्या जागेला परवानगी घेणे आवश्यक नाही.
परंतु त्याचे तुकडे करून विकण्यासाठी परवानगी लागेल.
हे वाचलंत का ? –