अटल पेन्शन योजना, मिळवा महिना 10000 रुपये

Atal Pension Yojana in Marathi

Atal Pension Yojana in Marathi

पेन्शन योजना महाराष्ट्र

Atal Pension Yojana : नमस्कार मित्रांनो.., केंद्र सरकारने देशातील नागरिकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता देशातील प्रत्येक नागरिकाला अटल पेन्शन योजने मुळे 10,000 रुपये. इतकी रक्कम दिली जाणार आहे.

या करिता कोणते कागद पत्र लागणार आहे? योजनेचा लाभ कसा घ्यायचा? योजना कशी आहे? 10000 रू कसे मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या पोस्ट मध्ये पाहूया.!

आपल्याला भविष्या बद्दल नेहमी काळजी लागलेली राहते, तशी तुम्हाला सुद्धा असेलच आणि मला सुद्धा आहेच. आपण सर्व भविष्यासाठी काही थोडे पैसे जमा करून आर्थिक बचत करत राहतो. जे आपल्याला उद्याला कामाला येईल. 

याच अनुषगाने केंद्र सरकारची ही योजना आहे, या योजने च्या मदतीने तुम्ही तुमची भविष्याची आर्थिक चिंता दूर करू शकता.

अटल पेन्शन योजना 2023

या योजने करिता तुमचे बँक किंवा पोस्ट मध्ये खाते असणे अनिवार्य आहे, योजने करिता आपण पोस्ट किंवा बँक मधून अर्ज करू शकता. आधार कार्ड योजने साठी अनिवार्य नाही.

आपण ज्या प्रमाणे थोडी थोडी बचत करून एक मोठी रक्कम जुळवतो. त्याच प्रमाणे या योजने मध्ये तुम्हाला आपल्या आयुष्याच्या 60 वर्षा पर्यंत थोडे थोडे पैसे गुंतवायचे आहे.

याचा फायदा तुम्हाला 60 वर्षा नंतर 5000 रू महिन्याला पेन्शन मिळेल. यामध्ये जर पती, पत्नी यांनी दोघांनी गुंतवणूक केली. तर दोघांना पण 60 वर्षा नंतर 10000 रू मिळतील.

सरकार च्या या योजनेचे येवढेच उद्देश आहे. गरीब नागरिकांना त्यांच्या उतरत्या वयात एक आधार म्हणून सहाय्य करणे. या योजने करिता वयाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अटल पेन्शन योजने मध्ये आपल्या 5000 रुपये जास्तीत जास्त आणि कमीत कमी 1000 रुपये एवढे पेन्शन मिळेल. या योजने करिता तुम्हाला दर महिन्याला जी राशी भरायची आहे.

ते पैसे तुमच्या खात्या मधून प्रत्येक महिन्याला कटतील. पैसे भरण्यासाठी तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही. 

या योजनेत काही चांगल्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. आपण या योजनेत नियमित पैसे भरत असल्यास आपला मृत्यू झाला तर. लाभारत्याच्या पत्नीला या योजनेची रक्कम दर महिन्याला भरावी लागते. आणि तिला वयाच्या 60 वर्षा नंतर पेन्शन मिळेल.

काही कारणास्तव दोघांचाही मृत्यू झाला. तर या योजनेचे पैसे हे लाभरत्याच्या मुलांना मिळतील किंवा तुम्ही ज्याला नोमिनी म्हणून ठेवलं असेल त्याला मिळतील.

या योजनेचा लाभ फक्त तेच व्यक्ती घेवू शकतात ज्यांचे वय 18 वर्षा वर आहे व 40 वर्षाच्या आत आहे.

एक व्यक्ती फक्त एकच अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकतो. 

ही योजना फक्त भारतीय नागरिकांनसाठी आहे.

तुम्ही इन्कटॅक्स भरत असाल, तर तुम्ही या योजने करिता पात्र नाही.

आपण या योजने मध्ये पैसे या तीन प्रकारे भरू शकता.

  • महिन्याला 
  • तीन महिन्याला 
  • सहा महिन्याला 

आपल्याला पैसे किती दिवसांनी भरायचे आहे. हे आपण वर्षातून एकच दा बदलवू शकतो. वर्षाच्या एप्रिल महिन्यात.

या प्रकारे आपण अटल पेन्शन योजनेचा लाभ घेवू शकता व आपले म्हातारपण आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकता.

अधिक माहिती करिता आपण government च्या website ला भेट देवू शकता. माहिती आवडली असेल, तर आपल्या मित्रांना शेअर जरूर करा.


हे वाचलंत का ? –

Share