Mummy (ममी)
ममी म्हटले म्हणजे सर्वांना वाटते की आई……!
पण ती मम्मी आहे ज्याला आपण मराठीत आई म्हणतो.
आणि मी आज ज्याबद्दल सांगतोय ती म्हणजे ममी….
जी इजिप्त मध्ये आढळते. तसे तर जगाच्या बऱ्याच ठिकाणी ममी आढळते. पण इजिप्त मध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
तुम्ही परत म्हणाल आता ही इजिप्त मध्ये कोणाची आई आहे. तर तस काही नाही. इजिप्त मध्ये राजे, महाराजे, श्रीमंत व्यक्ती यांना मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं ममीकरण करण्यात येत होत.
जेणेकरून त्यांचं शरीर खूप काळ पर्यंत जश्याच तस राहावे म्हणून.
त्याचा विश्वास होता की, काही वर्षांनी ते परत जिवंत होतील. तर आज मी तुम्हला ममी बद्दलची थोडी माहिती देणार….
इंग्रजी शब्द मम्मी हा मध्ययुगीन लॅटिन ममीया, मध्यकालीन अरबी शब्द मोमिया या शब्दाचा उधार आणि एक पर्शियन शब्द मोम (मेण) पासून आला आहे.
ममी एक मृत शरीर आहे. ज्यामधील आंतरिक पेशी व मेंदू बाहेर काढून त्या शरीराला विशिष्ट जागी ठेवण्यात यायचं त्या जागेला पिरॅमिड असे म्हणतात. जे आज पण आपल्याला इजिप्त मध्ये आढळतात.
त्या शरीराचं नाकावाटे मेंदू काढण्यात यायचा आणि त्यावर विशिष्ट प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या व यावर अतिशय थंड वातावरण, अगदी कमी आर्द्रता, खूप कमी वारा इत्यादी तंत्र वापरल्या जायचे. जेणेकरून हजारो वर्षे ते शरीर सुरक्षित राहील.
तसे तर जगाच्या बऱ्याच ठिकाणी मानवी व प्राण्यांच्या ममी सापडतात. पण इजिप्त मध्ये याचे प्रमाण खूप मोठे आहे. इजिप्तमध्ये एक दशलक्षाहून अधिक प्राण्यांची ममी सापडली आहेत, त्यातील बर्याच मांजरी आहेत.
शोधकर्त्यानुसार प्राचीन इजिप्तच्या ममी व्यतिरिक्त, जास्तीत जास्त कोरडे हवामान असलेल्या अमेरिका आणि आशियाच्या भागात अनेक प्राचीन संस्कृतींचे जाणीवपूर्वक मुम्मीकरण केले गेले आहे.
उत्तर अमेरिकेतील फेलॉन, नेवाडा मधील स्पिरिट कॅव्ह ममीज ही जवळपास ९,४०० वर्ष जुनी ममी आहे. तर सर्वात जुनी ममी ही एक लहान मुलांची आहे.
चिली कॉमरोन्स व्हॅली, चिली येथे आढळलेल्या चिंचोरो मम्मींपैकी ही एक आहे, जी जवळपास इसपूर्व ५०५० मधली आहे.
सर्वात पुरातन ज्ञात नैसर्गिकरित्या चिंबलेल्या मानवी मृतदेहाचे एक तुकडे केलेले डोक आहे जे १९३६ साली दक्षिण अमेरिका येथे सापडलं.
ममीकरण चा अभ्यासाची आवड आतापर्यंत अस्तित्त्वात आली आहे, परंतु बहुतेक वैज्ञानिकांनी अभ्यासाचे कार्य 20 व्या शतकाच्या सुरूवातीस सुरू केले होते.
अलीकडील काही वर्षांत, सीटी स्कॅनिंग हे शरीराचे नुकसान होण्याचा धोका न घेता ममींना डिजिटली “अनव्रप (unwrap)” करण्याची परवानगी देऊन शवविच्छेदन अभ्यासाचे एक अनमोल साधन बनले आहे.
यावर बरेचसे शोध करण्यात आले तसेच यावर कादंबऱ्या व चित्रपट प्रदर्शित करण्यात आहे. पण वास्तविकता ही वेगळी असून कल्पनाशक्ती च्या जोरावर बरेच चित्रपट आहेत. जे आपल्या मनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे . Ex- (The Mummy)
तर वरील पोस्टमुळे तुम्हाला ममी बद्दलची बरीचशी माहिती मिळाली असेलच.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद…
- सागर राऊत
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.