मशीन लर्निंग म्हणजे काय?। What is Machine Learning

मशीन लर्निंग मराठी माहिती

मशीन लर्निंग मराठी माहिती
machine learning

मशीन लर्निंग म्हणजे काय?- What is machine learning in Marathi

आज आपण एका नवीन Technology बद्दल माहिती घेऊया. ज्या टेकनोलॉजि च नाव आहे. मशीन लर्निंग चला तर मग जाणून घेऊया मशीन लर्निंग काय आहे? आणि ते काम कसे करते?

Arthur Samuel यांनी सर्वात आधी 1959 मध्ये मशीन लर्निंग चा विचार मांडला. त्यांचा म्हणण्यानुसार मशीन लर्निंग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चे अप्लिकेशन आहे. ज्यामध्ये आपण कॉम्पुटर मध्ये एक असा प्रोग्राम टाकू शकतो, जो तेच काम करेल जे यूजर ला पाहिजे असेल.

सोप्या भाषेत समजायचे झाले तर, मशीन लर्निंग एक प्रकारचं अल्गोरिदम आहे. जे सॉफ्टवेअर ला चांगल्या प्रकारे चालवण्यात मदत करते. आता च्या काळात याचा उपयोग खूप प्रकारे केला जात आहे, जसे की फेस रेकॉग्निशन (चेहरा ओळखणारी प्रणाली)

अशा प्रकारच्या किचकट प्रक्रिये करिता प्रोग्रॅम तयार करणे खूप कठीण जाते, याकरिता मग मशीन लर्निंग चा वापर करावा लागतो.

आपल्या जवळून फेस रिकोग्निशन द्व्यारे खूप डेटा जमा केला जातो. जो जगातील खूप चेहऱ्यांचे विश्लेषण करून जमा केला जातो.
नंतर या जमा केलेल्या डेटा ला एका अल्गोरिदम मध्ये टाकले जाते व ते अल्गोरिदम त्या डेटा ला मशीन पर्यंत पोहचवते.

ज्यामध्ये मशीन लर्निंग च्या साहाय्याने एक प्रोग्रॅम तयार केला जातो. हा प्रोग्रॅम आपण लिहलेल्या प्रोग्रॅम सारखा नसतो.
या प्रोग्रॅम ला एका विशिष्ट प्रकारच्या मशीन च्या साहाय्याने प्रोसेस करून फेस रेकॉग्निशन केले जाते.

मशीन लर्निंग चे प्रकार (types of machine learning)

समाणतः मशीन लर्निंग चे तीन अल्गोरिदम प्रकार असतात.

1) Reinforcement learning
2) Un-Supervised learning
3) Supervised learning

कोणत्या कारणांमुळे मशीन लर्निंग इतकी लोकप्रिय आहे?

हल्लीच झालेल्या रिसर्च मध्ये हे समोर आले आहे की, मशीन लर्निंग जगातील Top 10 स्कील मध्ये तिसऱ्या स्थानी येते. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, मशीन लर्निंग का इतकी लोकप्रिय आहे. अस म्हटल जात की, ज्याची जेवढी क्षमता तो तेवढ काम करतो. पण मशीन लर्निंग ची क्षमता नाही. यामध्ये तुम्ही किती पण मोठा डेटा प्रोसेस करू शकता.

मशीन लर्निंग अँप्लिकेशन

● self-driving car
● face detection
● fraud detection
● motion censer

भविष्यामध्ये मशीन लर्निंग चे कोणत्या क्षेत्रास फायदे होतील?

● Financial service
● Healthcare service
● Education service
● Digital marketing service
● network security

या प्रकारे खूप साऱ्या क्षेत्रात याचा वापर हा मोठ्या प्रमाणात व जलद गतीने वाढत आहे.
हल्ली आता असा रोबोट तयार केला आहे. जो अगदी मानवासारखा दिसतो. त्यामध्ये पण मशीन लर्निंग चा वापर केला आहे.

– धीरज तायडे


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share