हे कसं शक्य आहे.? (भय कथा)

मराठी कथा / marathi story

he-kas-shakya-aahemarathi-katha

marathi katha (Marathi horror story)

हे कसं शक्य आहे..?

‘वाह……किती छान आहे, तुझ घर….! म्हणजे आपलं घर, इतके दिवस का लावलेत, मला घर दाखवायला ?’ त्या घरात प्रथमच आलेली स्मिता घर बघून राजेशला म्हणाली.

राजेश काही न बोलता एक टक तिला बघत होता. स्मिताच्या आनंदात तो हरवून गेलेल्या स्तिथीत तिने त्याला कधी मिठी मारली, ते त्याला कळले देखील नाही.

‘मी घरच्यांना आपल्या बद्दल सर्व काही सांगून टाकले, आत्ता तू कधी सांगणार आहेस सोनू…. ‘स्मिता लाडात येऊन म्हणाली.’

‘योग्य वेळ आल्यावर’ तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तो म्हणाला. दोघे पण एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून प्रेमात संथ गतीने वाहत होते.

स्मिता आज खूप आनंदात होती, कारण तिचे स्वप्न पूर्ण होणार होते. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तो प्रेमी आत्ता पती होणार, या कल्पनेनंच ती भारावून गेली होती .

अचानक दार ठोठावण्याचा आवाजाने ते दोघे भानावर आलेत.

दोघांची नजर सारखीच त्या दाराकडे गेली. दुपारचे सुमारे दोन वाजलेले होते. कोण असणार या वेळेला, या विचार चक्रात राजेश असतानाच त्याने स्मिताचा हात खेचून तिला स्टोर रूम मध्ये नेऊन आत मध्ये बंद केलं.

ही क्रिया इतक्या जलद गतीने झाली की, ते स्मिताला कळलं देखील नाही. ती स्टोर रूम मध्ये एक कैद्यान प्रमाणे बसून अंदाज घेत होती, की कोण आले असेन, आणि याने मला आत का बंद केले असेन…… इकडे दराचा ठोठावण्याचा वेग वाढला होता.

दार उघडताच समोर बायकोला बघून राजेशला भीतीने थरकाप सुटला, व त्याने थरथरत्या आवाजातच तिला प्रश्न केला.

‘तू इतक्या लवकर ऑफिस मधून….?’ इतकेच बोलून तो थांबला, कारण भीतीने संवादाला विराम लावला होता.

‘विसरलात का आज हाफ डे आहे ते,आणि तुम्ही कसे आज लवकर आलात ऑफिसमधून !’ प्रतीक्षाने राजेशला चौकशी करत विचारले.

‘मी….मी….’ राजेश स्टोर रूमकडे बघत म्हणाला.

‘अहो….काय झालं तुमची तब्बेत बरी नाही का?’ प्रतीक्षा ने काळजीने विचारले.

‘आई……आई आजारी आहे, आपल्याला ताबडतोब गावाला जावं लागेल. मी तुला फोन करून बोलावणारच होतो…!’

आईच्या नावाखाली केलेला गुन्हा लपल्या गेला असे त्याला जाणवले , भीती आणि पत्नीला वेड बनविल त्या मिश्र भावनेत तो प्रतीक्षाला लवकरात लवकर घराबाहेर घेऊन गेला.

‘तू कार मध्ये बस मी लगेच कपडे व लागणारे साहित्य घरातून घेऊन येतो.’

‘ अरे पण ……‘काही पण, परंतु नाही….. कार मधेच थांब मी लगेच आलो.’

घरात प्रवेश करताच त्याला स्टोर रूम मधून स्मिताचा रडण्याचा आवाज ऐकू आला.

‘स्मिता मी तुला सर्व काही नंतर सांगेन, तू सध्या इथेच थांब! मी प्रगतीला गावाला सोडून लगेच येतो’

तो स्टोर रूम बाहेर राहून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. स्मिताच्या सर्व आशा, अपेक्षाचा भंग झाला होता.

तिला कळले की राजेशने आपल्याला फसवले. डोक्याला गुढग्याच्या मधात घट्ट धरून ती रडत होती.

एखाद्या स्वाभिमानी स्त्रीच्या अपेक्षा भंग यात्नेतून ती जात होती. तिचे सांत्वन करणाऱ्या त्या काळ्या भिंती व आयुष्याला विराम लावलेल्या त्या वस्तू तिथे होत्या.

तो कधी घराबाहेर गेला तिला कळले देखील नाही.

बराच वेळ लोटून गेला , तो परत यायचं चिंण नाही. रूममध्ये सगळीकळे काळोख पसरलेला. शरीरावरुन काही तरी चालत जातंय, हा भास की सत्यता या मध्ये फरक करणारा त्या रूम मध्ये प्रकाश देखील नव्हता.

रूम मधल्या दारा पलीकडून येणार बारीक प्रकाश फक्त सूर्य मावडतोय इतकंच दर्शवत होता. भुकेने आणि तहानेने तो जीव निपचित जमिनीवर पडला होता.


‘तुला कोणी सांगितलं मी आजारी आहे ते…!
मला तर काहीच झालेलं नाही.’

आईने त्याची संशयास्पद विचारणा केली.

‘मला दीपक म्हणाला, दीपकची ही वाईट सवय कधी जाईल कोणास ठाऊक, त्याला मला गावाला बोलावयचंच होत तर सरळ पण सांगू शकत होता ना?

दीपक हा राजेशचा बाल मित्र…..मित्राच्या नाव खाली आईला आलेल्या संशयाचा पण राजेशने गळा दाबला होता.

‘बर जाऊ दे….आलात तर ठीकच केलं. बरेच दिवस झालेत तू आणि सुनबाई गावाकडे नाही आलेत.

तुम्ही शहरी भागातील लोक गावातील लोकांकरिता वेळ तरी असतो का? तुमच्या कडे!‘आई मी तुम्हाला कितीदा म्हणाले की, मला सुनबाई म्हणत जाऊ नका, तुम्ही माझ्या आई आणि मी तुमच्या मुली प्रमाणे आहे….प्रतीक्षा म्हटलं तरी चालेल !

सर्व जण हसायला लागलेत. पण राजेशच्या त्या हसऱ्या चेहऱ्यापाठीमागे एक चिंतेचा पडदा होता, तो त्या प्रसंगात कोणाच्या लक्षात नाही आला.


मध्यरात्री ची वेळ सुमारे २.२४ झालेले. एक कार गावाकडून शहराकडे सुसाट वेगाने पळत सुटलेली, काचावरून अलगद वाहत जाणाऱ्या पावसाला वाईफर हळूच बाजूला सरकवत होते.

अधून मधून विजेचा कडकडाट होत असल्यामुळे राजेशच्या चेहऱ्यावरचे काही भाव दिसत होते. मानवी शरीरात सैतान असल्यासारखे त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते.

‘ आज तर थोडक्यात वाचलो म्हणायचं, नाहीतर प्रतीक्षा ला सर्व कळलं असत. तशी पण ही स्मिता बाकी मुलीनं पेक्षा जास्तच सेन्सेटिव्ह आहे.

इतर मुलींचे मी पैसे देऊन तोंड बंद करून शकलो, पण स्मिता च्या बाबतीत मला तस काही वाटत नाही, तिला तर माझ्या सोबत लग्नच करायचं आहे.

तिला माझ्या आणि प्रतिक्षा बद्दल कळलंच आहे. ती पुढे चालून काही प्रॉब्लेम तयार करू शकते. त्या पेक्षा तिचा कायमच तोंड बंद करणे योग्य आहे! असो तशी पण स्मिता सोबत बरीच मजा करून झाली.’

या सर्व विचारात असताना तो त्याच्या शहरातल्या घरा जवळ जाऊन पोहोचला. कार पासून घरापरेनंत च्या अंतरात तो पावसाने भिजला होता.

स्मिताला गळा आवळून मारायचं की अजून कुठल्या दुसऱ्या पद्धतीने मारायचं या तंद्रीत तो दार उघडून आत गेला. त्याला स्मिताचा रडण्याचा आवाज ऐकू आला.

‘स्मिता मी आलो…..काही काळजी करू नकोस सर्व काही ठीक होईल……..’ तो घरात स्मिताला मारण्यासाठी साधन शोधत शोधत बोलला.

‘तू मला फसवलं…..तुझं लग्न झालं असतांना देखील तू मला सांगितल नाहीस. माझा गैरफायदा घेतलास ……’ स्मिता जीवाची आकांत करत बोलत होती.

आणि तो घरभर तिचा काटा काढण्यासाठी वस्तू शोधत होता.

‘आधी मला आतून बाहेर काढ….!मी तुला बरबाद करून सोडेन, तुझ्या बायकोला तुझा खरा चेहरा दाखवेल.

मनाप्रमाणे वस्तू हातात लागल्या सारखी त्याच्या चेहऱ्यावर पाशवी स्मित होत. त्याने अलगद स्टोर रूमचा दरवाजा उघडला, स्वतःला पण चाहूल लागू नये, अशा प्रकारे तो आत शिरला, जमिनीवर पाणी असल्याने त्याचे पाय खालून ओले झाले.

हे पाणी कुठून आलं या विचारात असताच, विजेच्या कडकडाटात अंधाऱ्या स्टोर रूम मधले जे दृश्य दिसले. त्यामुळे राजेशच्या पायाखालची जमीनच सरकली.

त्याचे डोळे ताट झालेत, चेहऱ्यावरचा रंग उडाला. ज्या पाण्यावर तो उभा आहे असे त्याला वाटत होते, ते पाणी नसून रक्त होते.

त्या रक्ताचा उगमस्थान शोधायला त्याला जास्त काळ लागला नाही. दुसऱ्या विजेच्या कडकडाटात त्याला स्मिताचे शरीर जमिनीवर पडलेले दिसले. आणि तिने ज्या काचाने स्वतःच्या हाताची नस कापली होती. ती काच त्या उजेडात चमकत होती.

त्याने हळूच आवाज दिला …..

‘स्मिता……’

त्याच क्षणी त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभ असल्याची जाणीव झाली. आणि ती आकृती त्याला बोलली. ‘तुला काय वाटत….इतक्या वेळचा तू कोणासोबत बोलत होतास.

मला तर मरून चार तास झालेत….यातना भोगून पडलेले ते माझे शरीर….आणि मी तिची आत्मा…… आणि सगळी कळे हसण्याचा आवाज ऐकू येत होता.

राजेश ताडकन झोपेतून उठला.

‘अहो……काय झालं, काही वाईट स्वप्न पाहल का…..?

घाबरून उठलेल्या आपल्या पतीला चिंतेने प्रतीक्षाने विचारले.

‘काही नाही….’

चेहऱ्यावरचा घाम पुसत राजेश म्हणाला.

‘अहो……इतक्या रात्री कुठे चाललात?‘कुठे काय….इथेच थोडं फिरतो…..मला सध्या झोप नाही यायची. तू झोप!’

असे म्हणून राजेश आपल्या रूमच्या गॅलरीत येऊन थांबला. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार त्या स्वप्नाचे दृश्य तरडत होते.

स्वप्नातला जो विचार होता, तो त्याला सत्यात उतरवायचा होता. म्हणजेच स्मिताला कायमच चूप करायचं, आणि जे नंतर स्वप्नात पाहल ते काय होत? त्याची नजर सैरावैरा पळत होती.

काळ्या ढगांनी सर्व आभाळ झाकलेल,नुकताच पाऊस पडून गेल्याचे झाडावरचे पाण्याचे चिंन दिसत होते.

बघताबघता त्याची नजर घरापासून जवळ उभ्या असणाऱ्या त्याच्या कारकडे गेली. कारचे वाईफर चालूच ठेवले होते. कोणीतरी नुकतीच कार पार्क केल्यासारखी त्याला जाणवली. गॅलरी मधून वढणार तोच त्याची नजर त्याच्या पायावर पडली.

तो जागच्या जागी स्तब्ध झाला. पायामध्ये बळ नसल्या सारखा आधार घेत बेड वर जाऊन बसला.

डोळे विस्फारून पायावर लागलेल्या रक्ताकडे पाहू लागला….अंगाला शहारा यावा तशी एक कल्पना त्याच्या मनात घर करून गेली….

‘ ती कार मी तर पार्क नाही केली ना?…..हे कस शक्य आहे….मी तर घरातून हललो देखील नाही……आणि हे रक्त….’

‘का शक्य नाही….तू मला धोका देणार हे शक्य होते का ?…..परंतु तू दिला ना! झोपेत डोळे बंद अवस्थेत प्रतीक्षा बोलली.

राजेश ताडकन तिच्या जवडून उठून उभा राहला.

‘प्र…..प……प्रती…क्षा…….’डोळ्या समोर भूत पाहल्या सारखी त्याने प्रतिक्रिया दिली. तिच्या डोळ्यातील प्रत्येक आणि प्रत्येक लांबून मोजता याव्यात अशा लाल रंगाच्या नसा त्याला दिसत होत्या, बेड वरच उभी राहून ती म्हणाली….

‘ प्रतीक्षा नाही…..स्मिता…..’

‘हे……हे…कस शक्य आहे….?

‘मी तर तुला आधीच सांगितलं सर्व काही शक्य आहे…..आणि तुझ्या मनात आधी जो विचार चालू होता ,फक्त तेवढे ते शक्य नाही…कारण मी आधीच मृत्यूला जवड केलं!’

‘ए……प्रतिक्षा तू काय बोलतेस…..? ‘प्रतीक्षा नाही……स्मिता…..तुझी बायको माझ्या ताब्यात आहे…..!

बिचारीला तर माहीत पण नाही, की तिचा नवरा इतका नीच आणि खालच्या पातडीवर जाईल ते!’

राजेश स्वतःचा जीव मुठीत धरून त्या रूम मधून बाहेर पळाला. भिंतीचा आधार घेऊन तो लपला होता.

‘कोणापासून लपतोयस….? माझ्या पासून की स्वतःपासून…!’

अंधाऱ्या रात्री काळजाला भेदून जाणारा तो आवाज दिशाहीन. असल्यामुळे नक्की कोठून ऐतोय, हे त्याला कळत नव्हते.

हृदयाचे ठोके आधी पेक्षा अधिक तीव्रतेने वाढले होते, मंद ओळखीचा सुगंध आणि अस्पस्ट असा पैंजनाचा आवाज हळूहळू मोठा मोठा होत गेला, मंद अश्या प्रकाशात एक आकृती हळूहळू त्याच्याकडे सरकत असल्याची त्याला भासले, त्या आकृतीला ओळखण्यास त्याला जास्त काळ नाही लागला.

ती त्याचीच पत्नी प्रतीक्षा होती. सुटलेले केस हवेत अस्त वेस्त अवस्थेत उडत होते, साडीचा लांब पदर जमिनीला हळुवार स्पर्श करत त्या दिशेने सरकत होता.

प्रतिक्षा चे अक्राळ विक्राळ रूप त्याने प्रथमच बघितले होते. रात्रीच्या मंद प्रकाशामध्ये प्रतीक्षा त्याच्याकडे हळूच चालत येत होती. त्याचा चेहरा सर्व घामाने डबडबलेला होता.

ती कधी त्याच्या पाठी मागे जाऊन उभी राहिली त्याला देखील कळलं नाही. आणि तिने रडण्यास सुरुवात केली.

‘मी तुला अस काय मागितलं होत….रे,

रडता रडता तिचा आवाज कठोर होत गेला.

‘ आणि मला मारायला जाणार होतास ना तू….जा ना….मार ना मला….’ अस म्हणून तिने त्याला जोरात धक्का दिला…तो लांब जाऊन पडला. आणि तो वेदनेने जोरात किंचाडत होता.

प्रतीक्षाने भानावर येऊन म्हटले. ‘अहो….काय झालं….? प्रतीक्षा ने जवळ जाऊन विचार…..

‘तू दूर हो माझ्या पासून….!’असे म्हणून त्याने तिला बाजूला ढकललं. परत तिच्या आवाजात बदल झाला.

‘ कळलं प्रेम काय असत….तुझी बायको तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, म्हणून तीन तुला काळजीने विचारलं….. पण तुला नाही कळणार रे….

‘असो तुझा तर आता शेवट जवड आला आहे…..,तिच्या डोळ्यात त्याला बदलेची भावना व्यक्त होत होती. तुझा शेवट आला….असे म्हणत ती मारण्यासाठी सरसावली.

परत तो तेथून स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात सैरावैरा पळत सुटला…..आणि तोंडावर एकाच वाक्य…..आई…..आई…..

‘आणि मदत पण कोणाला मागतोय?…..आईला….एका आईच्या मुलाचा बळी घेणार बाप….आईची मदत मागतोय!राजेश पळता पळता जाग्यावर स्तब्ध झाला.

आणि भित्र्या आवाजात तो हळूच बोलला.

‘काय…..?’

‘हो….तूच तुझ्या मुलाचा जीव घेतला,मी तुझ्या मुलाची आई होणार होते!

प्रतीक्षा आणि राजेश दुरून एकमेकानकडे पाहत होते, सगळीकडे शांतता परासली. अचानक प्रतीक्षा भानावर आली. प्रतिक्षाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.

दोघेही त्या जागी स्तंभ उभे होते. राजेशने केलेल्या आरडाओरडामुळे परिवारातील सर्व सदस्य तेथे आलीत. कुणालाच काही कळत नव्हते, काय चालले ते.

तिचा पती किती नीच पातळीवर जाऊ शकतो हे तिला कळले होते. स्मिता आणि राजेश मधले सर्व संभाषण तिला कळले होते.

ती रागारागात तेथून निघून गेली.


‘झाली का झोप……?सकाळी डोळे पुसत बाहेर निघालेल्या राजेशच्या कानावर हे वाक्य पडले. दोन पोलीस कॉन्स्टेबल चहा पित होते. त्यातला एक कॉन्स्टेबल हळूच बोलला.

‘आमची झोप उडवून बघा कसे आरामात झोपतात…!’काय म्हटलं तुम्ही…? आपल्या जोडीदाराला बचावात्मक उद्देशाने सोबत असलेला पोलीस म्हणाला.

‘काही नाही साहेब……’

स्मिता राजेश सोबत काम करायची. त्यामुळे सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस चालू होती. परंतु राजेश मध्ये पोलोसांचे जास्तच स्वारस्व होते.

घरी परतन आलेल्या मुलीच्या चिंतेत स्मिताच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. पाणी आत्ता डोक्यावरून जायची वेळ आली, हे राजेशला कळले.

अशा वेळेला सुख, दुःखात काम पडणारे जे मित्र असतात ना त्यापैकी एक दीपक. त्याला थोड्या पैशाची लालूच देऊन शहरातील घरातली स्मिताच्या बॉडीची विलेवाट लावली.

जीवास धोका होईल असा कुठलाच पुरावा राजेशने ठेवला नाही.


डोकेदुखीमुळे डोक्यावर हातोडी मारल्यासारखे प्रतिक्षाला जाणवत होते. अंधाऱ्या खोलीच्या मध्यभागी तिला खुर्चीला बांधल्या गेलेलं होत.

तिच्या चहू भवताल लावल्या गेलेल्या गोल मेणबत्तीच्या रिग्नात मंद असा प्रकाश पडला होता.

घरातील सर्व मंडळी त्याजागी स्तब्ध असे उभी होती. सर्वांची नजर तिच्यावर एकवटलेली होती. राजेश भीतीमुळे दूर उभा होता.

फक्त एकच व्यक्ती तेथे कार्यशील होती. तो म्हणजे एक मांत्रिक. खोलीमध्ये सर्वत्र मंत्र उच्चार होत होते.

‘आई हे काय चाललंय…..? मला सोडवा आधी इथून!

प्रतीक्षा सर्वाना सोडवण्याची विनवणी करत होती शिवाय राजेशला वगळता. ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तिला ज्या दोराणी खुर्चीला बांधल्या गेलेलं होत,

त्यामुळे तिच्या हाताला इजा होत होती. बराच वेळ धळपड करून झाल्यावर ती अचानक शांत झाली. मोकळ्या केसांमुळे तिचा अर्धा चेहरा झाकल्या गेलेला होता. तिने हळूच तिची मान राजेशकडे वळवली. आणि थोढीशी हसून म्हणाली.

‘तुझा शेवट आला आहे….! कर किती प्रयत्न करायचे माझ्या पासून स्वतःला वाचवण्याचे…..शेवट तर तुझा होणार

शेवटचा मंत्र उच्चार होताच प्रतीक्षा आपली शुद्ध हरपून बसली. शांत अशी खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत ती झोपली होती. पूजा संपन्न होताच, मांत्रिक राजेशच्या वडिलांकडे गेला, व त्यांना म्हणाला.

‘चिंता करण्याचे काही कारण नाही, सर्व काही ठीक आहे. फक्त ही पूजा झालेली साहित्य गावामधील स्मशानाच्या मधोमध नेऊन टाका !’

हे काम राजेशने त्याचा मित्र दीपक वर सोपवले. भीतीमूळे आधी दिपकने जाण्यास नकार दिला. परंतु मित्रहट्टा समोर भीतीने हात टेकले होते.

मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे दिपकने सर्व साहित्य स्मशान भूमीच्या मधोमध नेऊन टाकली. तेव्हा रात्रीचे साडेतीन वाजले होते.

घराबाहेर सर्व मंडळी दिपकची वाट पाहत होती. दीपक येताच विधीप्रमाणे दिपकचे स्नान करून त्याची शुद्धीकरण केले.

‘आत्ता चिंतेचे काही कारण नाही. सर्व काही ठीक पार पडले !’

असे म्हणून मांत्रिक सर्वांचा निरोप घेऊन निघाला. या घटनेला होऊन दोन दिवस लोटले होते. प्रतीक्षा आणि राजेश मध्ये अजून पण अबोला होताच.

रात्रीचे सुमारे सव्वा दोन झालेले असतील. राजेशला त्याचे केस कुरवाडल्या सारखे भासले, त्याने झोपेतच कळ बद्दलवला असता,त्याला बाजूला प्रतीक्षा दिसली. तो तिला बघून म्हणाला.

‘थँक्स…..!

‘थँक्स कश्या बद्दल…..?’

‘तू मला माफ केल्या बद्दल..!

‘तो तिच्या डोळयात डोळे टाकून बोलत होता.’ परंतु मी तर तुला माफ केलंच नाही..!’

हे वाक्य बोलत असताना प्रतिक्षाच्या चेहऱ्याचा भाव बदलला. प्रतिक्षाच्या शरीरातून स्मिता बोलत आहे, हे त्याला कळले. आता भीतीमुळे त्याची शुद्ध हरपली होती.


सकाळी राजेश शुद्धीवर आला असता, घरातील सर्व मंडळी त्याच्या बेड जवळ उभी दिसली.

‘राजेश…..काय झालं होतं तुला….?’ आईने काळजीने विचारले.

प्रतीक्षा तेथेच दूर भिंतीजवळ उभी होती. राजेश डोळ्यांनीच प्रतीक्षाच्या दिशेने आईला खुणावत होता. त्याला तेथे स्मिता दिसत होती.

पण तोंडातून एक देखील शब्द निघत नव्हते, कोणाला काहीच कळत नव्हते. काही वेळाने प्रतीक्षा तेथून निघून गेली.


‘हे कसं शक्य आहे….?’ मांत्रिक चिंतेच्यास्वरात राजेशला म्हणाला.

मंत्रिकाच्या चहूभवताल घरची मंडळी बसली होती. राजेशकळे मांत्रिक एक कटाक्ष टाकत बोलला.

‘तुमचा मित्र कुठे आहे त्याला बोलवा आधी….!

दीपक आल्याबरोबर मांत्रिकाने दिपकला विचारपूस करण्यास सुरुवात केली.

‘मी जसे सांगितले तसेच केलेस ना तू….? मांत्रिक ताकीद देत दिपकला म्हणाला. दीपक घाबरल्या स्वरात, ‘हो….हो….महाराज ! जसे तुम्ही म्हटलं तसच मी केलं!

”तू सर्व पूजेचे साहित्य स्मशानात टाकून आला होतास ना? की काही सोबत घेऊन आलास?’नाही….मी सर्व टाकून आलो स्मशानात….’

‘आठवण कर एखादी कुठली वस्तू सोबत तर नाही आलीस…..? मांत्रिक चिंतेच्या भरात परत त्याला विचारत होता. मांत्रिक विचारमग्न अवस्थेत हळूच पुटपुटला.

‘हे कसं शक्य आहे…..?’ परत त्यांनी त्याला विचार करून सांगण्यास सांगितले.
‘तू इथून गेला तेव्हा काय काय केलंस ते मला सविस्तर सांग.!

‘मी इथून सरळ स्मशानभूमी कळे गेलो ! तुम्ही सांगितल्या प्रमाणे स्मशानातील मध्यभागात जाऊन सर्व साहित्य टाकून निघणार, तेव्हा मला कोणी तरी दुरून बघित असल्या सारख वाटलं…

माझा भीतीने थरकाप सुटला….माझे पाय त्या दिशेला वळत नव्हते,

कारण ज्या दिशेनी मी आत गेलो होतो, त्याच दिशेकडून मला कोणी असण्याचा भास झाला. मी नंतर स्वतःला सावरलं आणि जवळची एक सिगरेट काळून पूजेवरची आगपेटी नि पेटवली……’

वाक्याला अर्ध्यात सोडून दीपक विचारात मग्न झाला. त्याला मांत्रिक नंतर काय झाले? ते विचारत होते. परंतु दिपकला आपली चूक कळली होती.

मांत्रिक विचारत असताना त्यांच्या पण डोक्यात प्रकाश पडल्या सारखे दीपकच्या खांद्यावर हात ठेवून विचारले

‘तू ती आगपेटी सोबत तर नाही घेऊन आलास….?

दिपकने होकारार्थी मान हलवली.

‘ज्याची भीती होती तेच झालं….! ती परत आली आहे! मांत्रिक चिंतेने म्हणाला व ज्या खोलीत प्रतीक्षा झोपली होती, त्या खोलीकडे एक कटाक्ष टाकत मांत्रिक परत म्हणाला.

‘आत्ता लक्ष पूर्वक एका…..! दोन दिवसानी अमावस्येला आपल्याला परत पूजा करावी लागेल, तो पर्यंत प्रतिक्षाला खोलीमध्ये बंद करावे लागेल.

‘पण ती आमची सून आहे….!’ खोलीत बंद केल्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होईल!
‘ राजेशचे वडील चिंतेच्या भरात बोलून गेले.

‘तिच्या जीवाला काय….या घरातील कोणालाच तिचा धोका नाही,शिवाय राजेश वगळता.’

‘ते कसे काय….? परत वडिलांनी मांत्रिकाला प्रश्न केला.’कारण की त्या रात्री जेव्हा प्रतीक्षा रिंगणात होती, तेव्हा ती रिंगण सहज भेदू शकली असती, परंतु तिने तसे नाही केले.’मांत्रिक घरच्यांना स्पष्टीकरण देत होता.

मांत्रिकाच बोलणे अर्ध्यात तोडून दीपक म्हणाला.’मी नाही समजलो तुम्ही जे बोलत आहात ते….?

‘बर नीट एका….. ते रिंगण आत्म्याला जकडणारे होते, रिंगणामध्ये दोन आत्मे आणि एकच शरीर होत, त्यात एक आत्मा स्मिताचा आणि दुसरा प्रतिक्षाचा…..त्यामधून कोणी एकच बाहेर येऊ शकलं असत, एक तर स्मिता प्रतीक्षाच्या शरीरासोबत नाहीतर, प्रतीक्षा तिच्याच शरीरासोबत, त्या वेळेला स्मिता प्रतीक्षाचे शरीर तर बाहेर घेऊन आली असती, परंतु प्रतिक्षाचा आत्मा आतच राहला असता, स्मिताने स्वतःच्या बदल्याची भावना सोडून प्रतीक्षाला तिने वाचवले.

तुम्ही प्रतिक्षाची काही काळजी करू नका. तिला स्मिता पासून काही एक धोका नाही….!


ठरल्या प्रमाणे दोन दिवसानी परत तशीच पूजा करण्यात आली. या वेळेस आधीपेक्षा जास्त सावधगिरीने पूजा संपन्न करून दिपकला परत मध्यरात्री नंतर स्मशानात पूजेचे साहित्य टाकून द्यायला पाठवले.

या वेळेला दीपक जास्तच घाबरलेला होता. पूजेचे झालेले साहित्य स्मशानात टाकून निघाला असता, त्याला पाठीमागून कोणीतरी पकळले.

भीतीमुळे त्याला हार्ट अटॅक आला मारण्या आधी त्याने माघे वळून देखील नाही, पाहाले की त्याचा शर्ट एक काटेरी झुडुपाला अडकला ते

इकडे सर्व दिपकची वाट पाहून थकलेत. शेवटी दीपक घरी गेला असे समजून सर्व मंडळी चिंता मुक्त विचारांनी गाढ झोपी गेलीत.


राजेशला रात्री झोपेत कळ बद्दलवता येत नव्हता, त्याने आपले डोळे उघडले तेव्हा तो स्वतःला बेडला बांधलेल्या अवस्थेत आढळला. आणि त्याला जवळच प्रतीक्षा उभी दिसली.

तिने लगेच राजेशचा गळा आवळून धरूला आणि म्हणाली.

‘तुझा तर शेवट होणार……!

राजेशने जेव्हा मृत्यूच्या स्वाधीन झाला तेव्हा प्रतीक्षा रडायला लागली.

‘स्मिता तुझा राहलेला बदला मी पूर्ण केला….तुझ्या आत्म्याला शांती मिळो…..!

असे बोलून राजेशच्या शातीवर डोकं ठेऊन प्रतीक्षा जोरजोरात रडायला लागली.

समाप्त……

  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

Share