पोस्ट ऑफिस मध्ये 4 लाख रुपयांची FD करून, तुम्हाला 5 वर्षात किती पैसे मिळतील?

Post Office Scheme :- जर तुम्ही पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी काही गोष्टींबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण तुम्ही गुंतवणूक करताना, तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करत आहात त्याबद्दल तुम्हाला चांगले माहिती असणे आवश्यक आहे. तुम्हाला किती रिटर्न्स मिळतो.? आणि रिटर्न्स किती पर्सेंट व्याजदर दिला जाईल. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

यासोबतच गुंतवणुकी (investment) बाबत लागू केलेल्या सर्व नियमांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असले आणि त्याचा परतावा तुम्हाला वेळेवर मिळत असला, तरीही तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये 4 लाख रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला किती पैसे पोस्ट ऑफिस कडून मिळतील?. हे आपण या टकले च्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.!

पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुम्हाला कालावधीनुसार विविध पर्याय मिळतात आणि या सर्व पर्यायांमध्ये, पोस्ट ऑफिसकडून तुम्हाला कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर दिले जातात. सध्या तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणूक केली, तर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून 1 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी तुमचे पैसे गुंतवण्याचा पर्याय मिळतो.

पोस्ट ऑफिस एफडी योजनेतील किती व्याजदर मिळतो?

पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींवर वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर लागू होतात. यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला 6.9 टक्के व्याजदर लागू होतो. जर तुम्ही FD स्कीममध्ये 2 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला जमा केलेली रक्कम मॅच्युरिटीवर 7 टक्के व्याजासह परत मिळेल. जर पैसे 3 वर्षांच्या कालावधीसाठी इन्व्हेस्ट केलेले असेल, तर व्याज दर 7.1 टक्के मिळतो.

तर पोस्ट ऑफिसमधील 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर सर्वाधिक 7.5 टक्के व्याजदर लागू आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास, 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर, व्याज आणि ठेवीची रक्कम 7.5 टक्के दराने परत केली जाते.

( सूचना – व्याजदरात बदल होऊ शकतो. कारण सरकार वेळोवेळी व्याजदराशी संबंधित सुधारणा करत असते. सध्याच्या व्याजदराची माहिती येथे दिली आहे.)

पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवणुकीच्या अटी

पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये गुंतवणुकीच्या अटींबद्दल बोलायचे झाले तर, त्यात फारशा अटी घालण्यात आलेल्या नाहीत, परंतु तरीही त्यात गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आहे आणि यासोबतच ज्या व्यक्तीला पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करायची असल्यास तो भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

4 लाखांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षात नफा किती ?

तुम्ही तुमचे ४ लाख रुपये पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवत असाल तर ५ वर्षानंतर पोस्ट ऑफिस तुम्हाला ७.५ टक्के दराने एकूण १,७९,९७९ रुपये व्याजाचा लाभ देईल. यासोबतच तुम्हाला 5 वर्षांनंतर मिळणारा एकूण परतावा 5,79,979 रुपये असेल.

Share