RBI Rule on CIBIL Score – आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि, लोण घेण्यासाठी सिबिल स्कोर खूप महत्वाचा असतो. भारतीय रिजर्व बँक (RBI) या संबंधात एक मोठा नियम घेतलेला आहे. या नियमामुळे ग्राहकांचे क्रेडिट स्कोर हा १५ दिवसामध्ये update होणार. यामुळे ग्राहकांना आता आपले क्रेडिट स्कोर हा मेंटेन ठेवणे खूप गरजेचे असेल. या करीत ग्राहकांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
हा नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात येणार असून, हा नियम लागू झाल्यावर तुमचा सिबिल स्कोर कमी असल्यास, लोण काढतांना तुम्हाला बँक च्या चक्रा माराव्या लागू शकतात.
कुठल्या लोकांना याचे नुकसान होणार
या मध्ये सर्वात आधी असे लोक येतात, जे लोक लोण घेऊन वेळेवर भरत नाही. तसेच लोण वेळेवर भरणे विसरून जातात. किव्हा लोण सेटलमेंट करतात. अश्या व्यक्तीवर याचा प्रभाव पडणार आहे. यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर कमी होऊन, त्यांना परत लोण काढण्यात खूप त्रास होणार आहे.
भारतीय रेसेर्व बँक ने म्हटले आहे कि, बँक आणि फायनांशियल इन्स्टिट्यूशन यांनी आत्ता क्रेडिट स्कोर लवकरात लवकर अपडेट करावे. स्वतः RBI गव्हर्नर ने या बद्दल घोषणा केलेली आहे. आणि म्हटले आहे कि, प्रत्येक १५ दिवसांनी क्रेडिट स्कॉट अपडेट करण्यात येणार आहे.
कुठल्या तारखेला सिबिल स्कोर अपडेट करण्यात येईल?
ग्राहकांचा सिबिल स्कोर प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट करण्यात येऊ शकते. क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CI ) आणि क्रेडिट इन्फॉर्मशन कंपनी (CIC) त्याच्या इच्छेप्रमाणे कुठली पण तारीख निश्चित करू शकतात. जेणेकरून १५ ते १५ दिवसांनी डेटा अपडेट करू शकतील. आणि क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CI ) यांनी ग्राहकांचे क्रेडिट इन्फॉर्मशन हे क्रेडिट इन्फॉर्मशन कंपनी (CIC ) यांना देणे अनिवार्य आहे.
बँक आणि ग्राहकांना याचा कसा होईल फायदा
हा निर्णय लोण घेणारा आणि लोण देणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर होणार आहे. ग्राहकांचे योग्य क्रेडिट इन्फॉर्मशन बँक आणि NBFC या दोघांसाठी खूप महत्वाचे असते. याच्याच माध्यमातून लोण देणारा ठरवू शकतो, कि लोण कोणाला द्यावे आणि कोणाला नको. याच माध्यमातून चांगल्या क्रेडिट स्कोर असलेल्या आवश्यक व्यक्तींना कमी दारात लोण उपलब्ध करू शकतील.
जर क्रेडिट स्कोर दर १५ दिवसांनी अपडेट करण्यात आला. तर बँक कडे ग्राहकांची योग्य आणि अचूक माहिती असेल, यामुळे बँक यांना माहिती पडेल कि कोणता व्यक्ती लोण फेडू शकेल आणि कोणता नाही. यामुळे आशा आहे कि, डिफॉल्ट लिस्ट कमी होईल, कारण ग्राहकाने काही गडबड केले असेल तर त्याचे सिबिल स्कोर १५ दिवसात अपडेट होईलच.