आपण चंद्रावर जमीन खरेदी करू शकता की नाही? चंद्रावर कोणाचाही मालकी हक्क नाही, पण असे असूनही चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.!
Buy Land on Moon Price : लोकांच्या मनात असाही प्रश्न आहे की, चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? अनेक कंपन्यांनी चंद्रावर जमीन विकून, तसेच अनेक लोकांमार्फत चंद्रावर जमीन खरेदी केल्याचे याआधीही खूप बातम्या आलेल्या आहे. पण ते खरे आहे, कि खोटे यामागील वास्तव्य काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या या आर्टिकल मध्ये आपण तेच जाणून घेऊया.!
इंटरनॅशनल स्पेस कायदा
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, पृथ्वीवरील कोणत्याही देशाचा अवकाशा (space) वर कुठलाच अधिकार नाही, तसेच चंद्र, तारे आणि इतर स्पेस वरील वस्तूंवर कोणत्याही देशाचा अधिकार नाही. याबाबत आंतरराष्ट्रीय अवकाश कायदाही करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ कायद्याच्या पाच करार आणि अधिवेशनांमध्ये कोणत्याही एका देशद्वारे बाह्य अवकाशाचा विनियोग न करणे, शस्त्रास्त्र नियंत्रण, अन्वेषण स्वातंत्र्य, अवकाशातील वस्तूंमुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी, अंतराळयान आणि अंतराळवीरांची सुरक्षा, प्रतिबंध यांचा समावेश आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही चंद्रावर जमीन खरेदी करू शकता की नाही. इंटरनॅशनल स्पेस कायदा चंद्रावर जमीन खरेदी करण्यास कायदेशीर मान्यता देत नाही. तश्यातच, काही कंपन्या असा दावा करतात की, हा कायदा देशांना चंद्रावर कोणत्याही प्रकारचे हक्क सांगण्यापासून प्रतिबंधित करतो. अशा स्थितीत त्या कंपन्या चंद्रावर कायदेशीररीत्या जमीन खरेदी करू शकतात असे सांगतात.
जमीन विकण्याचा दावा
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे, की लुना सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्री (international lunar land registry) या कंपन्या आहे. ज्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करतात. त्यांच्यामार्फत अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
दुसरीकडे, किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Lunarregistry.com नुसार, चंद्रावरील एका एकर जमिनीची किंमत $37.50 म्हणजेच सुमारे 3,080 रुपये आहे. दुसरीकडे, जर आपण चंद्राच्या मालकीबद्दल बोललो, तर त्यावर कोणाचीही मालकी नाही आणि कोणीही त्यावर मालकी मिळवू शकत नाही.
हे वाचलंत का ? –