चंद्राचे सर्वात मोठे रहस्य

रहस्यमय चंद्र

moon-mahitilake

Moon in Marathi

चंद्राचा आणि आपला संबध लहान पणापासूनच आहे, आजोळी तील आजीच्या गोष्टी असो, किव्हा शाळेतील पुस्तकातील माहिती असो. चंद्र हा आपल्या जीवनात आधीपासून आहेच. पण चंद्राचे असे बरेचसे रहस्य आहे, ज्याचा उलगडा अजूनपर्यंत झाला नाही.

सायटिस्ट (वैज्ञानिक) आपापल्या पद्धतीने चंद्राची संकल्पना मांडतात. बरेचसे वैज्ञानिक म्हणतात, की चंद्र हा पृथ्वीचाच भाग आहे. पण चंद्राच्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभाग पाहिला तर त्यात खूप प्रमाणात बदल आहे.

काही वैज्ञानिक म्हणतात की, पृथ्वीच्या कक्षेपासून एक ग्रह जात असताना. पृथ्वीने त्याला आपल्या गुरुत्वाकर्षण कक्षेत खेचून घेतलं. तो म्हणजे आत्ताचा चंद्र.

हे वाचलंत का? –
* कारमन रेषा नक्की काय आहे?
* आकाशातून वीज अंगावर पडू नये, यासाठी काय काळजी घ्यायला हवी?

चंद्र कसा दिसतो

moon-mahitilake1

चंद्र किती किलोमीटर आहे

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३,८४,४०० किलोमीटर इतके आहे. चंद्र हा पृथ्वीच्या १/४ इतका आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीत ४ चंद्र समावेल इतका.

आत्ता एक विचार करण्यासारखे आहे. गुरू (Jupiter) ग्रहाला ७९ चंद्र आहेत. ते सर्व चंद्र ज्युपिटर पेक्षा खूपच लहान आहे. त्या तुलनेत आपला चंद्र हा खूप मोठा आहे. हे एक कारण वैज्ञानिकांना विचार करण्यास भाग पाडते. कारण आपला चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या मनाने अजून लहान असायला हवा होता. असे वैज्ञानिक म्हणतात.

बाकीचे ग्रह अक्सिक्स मध्ये अंडाकृती (elliptical) आकारातमध्ये फिरतात. पण आपला चंद्रच असा आहे की तो गोलाकार (round circle) मध्ये पृथ्वी भवती फिरतो.

हा चंद्र आपल्या पृथ्वीला खूप प्रमाणात नियंत्रित करतो. चंद्रामुळेच समुद्राला ओहोटी येते.

चंद्राचं अजून रहस्य उलगडलेलं नाही. म्हणून तर सारखेसारखे बाकी देश चंद्रावरची मोहीम काढतात.

चंद्र हा पृथ्वीला एक विशिष्ठ पद्धतीने नियंत्रित करत आहे. जणूकाही कोणी त्याला खास करून तेथे ठेवला आहे. कारण चंद्र नसता, तर पृथ्वीच्या गतीत (rotation) खूप बदल असता, परत सूर्याकडून येणारे किरण हे फक्त उत्तर ध्रुवावरच (north side) पडलं असत. कारण त्याची फिरण्याची गतीच त्या बाजूची असती.

काही लोक म्हणतात की, चंद्र हा परग्रही (aliens) ची रचना आहे. त्यांनी तो उपग्रह पृथ्वीला कंट्रोल करण्यासाठी बनवलेला आहे. आणि ते चंद्रावर येऊन आपल्यावर लक्ष ठेवतात.

full moon

space-station-mahitilake

अमेरिकेतले अँपोलो मिशन मध्ये जेव्हा वैज्ञानिक चंद्रा कडे पोहचणार तितक्यात त्यांचा संपर्क पुथ्वीशी तुटला व त्यांचा नवीन संपर्क जुडला जो की पृथ्वीवरचा नव्हता.

व नंतर परत त्यांचा संपर्क पुथ्वीशी झाला. अजून त्याच्या म्हणण्यानुसार कोणी तरी त्यांचा पाठलाग करत आहे असे सिग्नल मिळत होते.

असे बरेच काही चंद्रबद्दल आहे ज्याचे रहस्य अजून कायम आहेत. वैज्ञानिक त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. लवकरच या गोष्टी पण क्लिअर होतीलच.

चंद्राबद्दल इतर तथ्य (Facts About Moon)

1) चंद्राचा आकार गोलाकार वाटत असला, तरी त्याचा आकार गोल नसून तो अंड्याच्या आकाराचा आहे.

2) चंद्राचे वजन सुमारे 81,00,00,00,000 (81 अब्ज) टन आहे.

3) 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि थिया (मंगळाच्या आकाराचे घटक) यांच्यातील टक्करातून उरलेल्या अवशेषांपासून चंद्राची निर्मिती झाली.

4) पृथ्वीच्या केंद्रापासून चंद्राच्या केंद्रापर्यंतचे अंतर 384,403 किलोमीटर आहे.

5) चंद्रावरून आकाश निळे दिसत नाही. पण काळे दिसते कारण प्रकाशाचा विखुरलेला नाही.

6) चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. आणि सौर मंडळाच्या 181 उपग्रहांपैकी हा पाचवा सर्वात मोठा उपग्रह आहे.

7) चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त एक चतुर्थांश आहे आणि सुमारे 49 चंद्र पृथ्वीवर बसू शकतात.

8) चंद्राचे क्षेत्रफळ आफ्रिकेच्या क्षेत्रफळाच्या बरोबरीचे आहे.

9) तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. तेव्हा चंद्राच्या भूमीवर त्यांनी केलेली खूण आजही आहे आणि पुढील काही लाखो वर्षे तशीच राहील. कारण चंद्रावर असा कोणताही वारा नाही. जो तो नष्ट करू शकेल.

10) जर चंद्र पृथ्वीवरून नाहीसा झाला, तर पृथ्वीवरील दिवस फक्त सहा तासांचा असेल.

11) चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा कमी आहे. जर आपण आकडेवारीत बोललो, तर चंद्रावरील व्यक्तीचे वजन हे 16.5% कमी आहे. यामुळेच तर अंतराळवीर चंद्रावर अधिक उडी मारू शकतात.

12) गेल्या 41 वर्षांपासून एकही माणूस चंद्रावर गेला नाही, आतापर्यंत केवळ 12 लोक चंद्रावर गेले आहेत.

13) चंद्राचे दिवसाचे तापमान 180 °C पर्यंत पोहोचते तर रात्रीची वेळ -153 °C पर्यंत पोहोचते.

14) असं म्हणतात कि, यूएस सरकारने चंद्रावर माणूस पाठवण्यासाठी आणि ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी समान वेळ आणि पैसा खर्च केला. जो कि, 10 वर्षे आणि 100 अब्ज डॉलर्स इतका आहे.

15) हे आश्चर्यकारक असू शकते, परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर खूप अस्थिर आणि हलके वातावरण आहे. चंद्रावरील पाणी देखील द्रव स्वरूपात नसून घन स्वरूपात असते. नासाच्या LADEE प्रकल्पानुसार, हे हीलियम, निऑन आणि आर्गॉन वायूंनी बनलेले आहे.

16) पृथ्वीच्या कक्षेदरम्यान चंद्राचे वेगवेगळे टप्पे, जे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या सापेक्ष स्थितीतील बदलांमुळे उद्भवतात. चंद्राच्या या टप्प्यांना अमावस्या, पौर्णिमा तसेच चंद्राच्या कला इत्यादी म्हणतात.

17) मान्स ह्युगन्स हे चंद्रावरील सर्वोच्च शिखर आहे. त्याची लांबी सुमारे 4700 मीटर आहे.

18) दुर्बिणीतून दिसणारा चंद्राचा पहिला नकाशा ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ थॉमस हॅरियट यांनी बनवला होता.

19) चंद्राच्या पृष्ठभागावरही गोल्फ खेळला गेला आहे. गोल्फर अंतराळवीर एलन शेफर्ड होते, ज्याने 1971 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर गोल्फ खेळला होता. त्याने मारलेल्या गोल्फ बॉलने 800 मीटर अंतर कापले होते.

20) नील आर्मस्ट्राँग जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर गेला तेव्हा त्याच्याकडे राइट ब्रदर्सच्या पहिल्या विमानाचा तुकडा होता.

21) चंद्राच्याच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीच्या समुद्राच्या पाण्यात भरती-ओहोटी निर्माण होतात.

22) चंद्राच्या फोटोत तुम्ही काही खड्डे पाहिले असतीलच. हे विवर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळणाऱ्या लघुग्रह आणि धूमकेतूंमुळे होतात.

23) वृत्तानुसार, 1950 मध्ये अमेरिकेने अणुबॉम्बने चंद्र उडवण्याची योजना आखली होती. दोन्ही देशांमधील शीतयुद्ध शिगेला असताना. अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांनी त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी रशियाला त्यांच्या पराक्रमाने घाबरवण्यासाठी ही खळबळजनक योजना आखली.

24) चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. कोणत्याही प्रकारचे वातावरण नसणे म्हणजे सौर वारा आणि उल्का येण्याचा सतत धोका असतो.

25) चंद्रावरील पाण्याचा भारताचा शोध आहे. भारतापूर्वीही अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास होता, की चंद्रावर पाणी असेल, पण त्याचा शोध कोणीही लावला नाही. याचे आपल्याला गर्व असायला हवे.

26) पृथ्वीभोवती फिरत असताना, चंद्र पृथ्वीसारखाच स्वतःचा एक भाग ठेवतो, म्हणून आजपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दुसरा भाग मानवाने पाहिलेला नाही. मात्र, उर्वरित भागाचा फोटो काढण्यात आला आहे. जो आपण इंटरनेट वर बघू शकतो.

27) जेव्हा सर्व अपोलो अंतराळयान चंद्रावरून परत आले तेव्हा त्यांनी एकूण 296 खडकाचे तुकडे आणले ज्यांचे वस्तुमान (वजन) 382 किलो होते.

28) जर पृथ्वीवर चंद्रग्रहण असेल तर चंद्रावर सूर्यग्रहण होईल.

29) आतापर्यंत ज्या उपग्रहांची घनता माहिती आहे, त्यापैकी चंद्र हा दुसरा सर्वात घनता असलेला उपग्रह आहे. पहिल्या स्थानावर गुरु चा उपग्रह आयो हा आहे.

30) चंद्राचा आकार पृथ्वीच्या केवळ 27 टक्के आहे.

31) पृथ्वीवर तुमचे वजन 60 किलो असेल, तर चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावरील तुमचे वजन फक्त 10 किलो असेल.

32) जागतिक विक्रम करत, नासाने चंद्रावर वाय-फाय कनेक्शनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा वेग 19 एमबीपीएस आहे. हे अतिशय आश्चर्यकारक आहे. \

33) चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून 3.78 सेमीने दूर जात आहे आणि पुढील 50 अब्ज वर्षांपर्यंत असेच चालू राहील. असे झाल्यास चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यास ४७ दिवस लागतील. सध्या चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 28 दिवस लागतात.

34) सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी धुळीचा ढग चंद्राच्या पृष्ठभागावर फिरतो. याचे खरे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

35) चंद्रावर माणसाच्या 96 पिशव्या सोडलेल्या आहेत. ज्यात विष्ठा, मूत्र आणि उलट्या आहेत.

36) चंद्रावर सुमारे 1 लाख 81 हजार 400 किलो मानवनिर्मित मलबा पडून आहे, ज्यामध्ये 70 हून अधिक अंतराळ यान आणि क्रॅश झालेल्या कृत्रिम उपग्रहांचा समावेश आहे.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत. धन्यवाद!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share