Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 : शेत कुंपण योजना, शेतकऱ्याला मिळणार आता शेती करिता कुंपण वर 90 टक्के अनुदान चला या बद्दल पूर्ण माहिती बघुया..!
या योजने मध्ये शेतकऱ्याला किती टक्के अनुदान दिले जाते.? त्या करिता कोणत्या अटी आहेत.? कागद पत्रे कोणती लागतात.? या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखात आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याकरिता हा लेख पूर्ण वाचा.!
शेतकरी मित्रांनो, जेव्हा पासून शिंदे सरकार आले आहे. तेव्हा पासून योजनांचा जणू पाऊस होत आहे . आणि या पूर्वीचे सरकार सुद्धा शेतकऱ्यानं साठी खूप योजना घेऊन आले होती. त्यातील एक योजना आहे. शेती करिता तार कुंपण योजना
या योजने करिता शेतकऱ्याला त्याच्या शेतीला तार कुंपण करण्याकरिता 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
काही वर्षा पासून बदलत्या वातावरामुळे शेतकऱ्याला पीक कमी होत असून यामुळे शेतकरी खूप कमी खर्चा मध्ये शेती करायला पाहतो आहे.
परंतु वाढलेल्या महागाईत त्याला हे जमेनास झाले आहे. आणि काही कालावधी पासून वन्य प्राण्यांचा त्रास सुद्धा वाढलेला आहे. या करिता शेतीला तार कुंपण करण्याकरिता पैसे खूप कमी आहे.
या मुळेच केंद्र सरकारने शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला ही तार कुंपण साहित्य योजना आणली आहे. या योजने मध्ये शेतकऱ्याला 90 टक्के अनुदानावर तार कुंपण मिळणार आहे.
तार कुंपण मुळे शेतीला फायदा
तार कुंपण लावल्यामुळे आपल्या शेतीचे वन्य प्राण्यांन पासून सौरक्षण तर होणारच सोबतच चोरान पासून सुधा सौरक्षण केल्या जाणार. आता या काही दिवसात शेतीतील जनावरे, पाईप, बोर मोटार चोरीला जात आहेत.
या करिता तुम्ही शेतात लावलेल्या तार कुंपणाला विजेच्या मदतीने अधिक सुरक्षित बनवू शकता. यामुळे कुणी व्यक्ती शेतात चोरी करण्याचा विचार करणार नाही.
याच सोबत खूप शेतकरी रानडुकरांन मुळे आपल्या शेतात काही पीक घेण्याचं टाळतात. त्यांना कुंपण लावल्या वर कोणतेही पीक घेवून त्या मधून आपला आर्थिक समृद्धी लवकर साधता येईल.
सरकार ने ही योजना 2020 मध्ये सुरू केली. या योजने मध्ये शेतकऱ्याला शेती करिता कामात येणारी अनेक उपकरणे घेण्याकरिता अनुदान दिले जाते. या मुळे शेतकऱ्याला शेती करण्यास त्याचा फायदा होत आहे.
या योजने करिता लागणारे कागद पत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- शेतीचा सातबारा
- जातीचे प्रमाण पात्र
या योजने करिता अर्ज करण्याकरिता पुढील Website वर जा.
हे वाचलंत का ? –