Gudi Padwa In Marathi
Gudi Padwa Information In Marathi – हिंदू कॅलेंडरनुसार, नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून मानली जाते. या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दिवस महाराष्ट्र राज्यात गुढीपाडव्याच्या नावाने साजरा केला जातो. गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात.
आपण वापरात असलेल्या इंग्रजी कॅलेंडरनुसार, यावर्षी गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्यानंतर स्त्रिया विजयाचे प्रतीक म्हणून घरामध्ये सुंदर गुढी उभारतात आणि तिची पूजा करतात. आपल्या मराठी लोकांमध्ये असे मानले जाते की, असे केल्याने तेथील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
विशेषतः हा सण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशात साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी श्री खंड, पुरणपोळी, खीर असे खास पदार्थ बनवले जातात. वैज्ञानिक दृष्ट्या गुढीपाडव्याबद्दल असे म्हटले जाते की, रिकाम्या पोटी पुरणपोळीचे सेवन केल्याने त्वचाविकारांची समस्याही दूर होते.
जग निर्मितीचा दिवस
धार्मिक मान्यतेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी जगत्पिता ब्रह्माजींनी विश्वाच्या निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली आणि या दिवसापासूनच सत्ययुगाची सुरुवात झाली.म्हणूनच या दिवसाला सृष्टीचा पहिला दिवस किंवा युगादि तिथी असेही म्हणतात. या दिवशी नवरात्री घटस्थापना, ध्वजारोहण, संवत्सराचे पूजन इ.केले जातात.
गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?
या दिवशी लोक आपली घराची स्वच्छता करतात आणि घरात रांगोळी आणि आंब्याच्या पानाची तोरणे लावतात. तसेच घराच्या अंगणामध्ये ध्वज लावला जातो आणि तसेच त्यावर एक गडवा ठेऊन स्वस्तिक बनवले जाते आणि त्यावर रेशमी वस्त्र गुंडाळले जाते. या दिवशी सुंदरकांड, रामरक्षास्रोत आणि देवी भगवतीची पूजा केली जाते आणि सूर्यदेवाच्या उपासनेसह मंत्रांचा उच्चार केला जातो. आरोग्य उत्तम राहण्यासाठी कडुलिंबाची पान (साखरेची गाठी) गुळासोबत खाल्ली जातात.
हे वाचलंत का ? –