GPS म्हणजे काय?।GPS काम कसे करतो?

gps meaning in marathi

gps meaning in marathi

GPS म्हणजे काय? GPS काम कसे करतो..?

GPS in marathi.

आज वाढत्या Technology च्या वापराने आपले जीवन कीती सोपे झाले आहे.

हे आपण या गोष्टी वरुन समजु शकतो की, आज आपल्याला कोठे जायचे असल्यास लोकांना रस्ता विचारायची गरज भासत नाही. आपन आपल्या मोबाईल मध्ये एक click करुन कोणता पण रस्ता पाहु शकतो.

आज हे सर्व शक्य झाल आहे. ते फक्त GPS मुळे. तुम्ही पण GPS चा वापर कधी केला असेलच.

God is like a GPS no matter where you are in life he will find you.

GPS बद्दल तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का? की तुम्ही घरुन निघताना GPS LOCATION ऑन केल व तुम्हाला जिथे जायच आहे ती LOCATION SEARCH केली की, ते ठीकाण किती दुर आहे व तिथे जायला किती वेळ लागेल हे पण दाखवते.

आणि त्या रस्त्यावर Traffic असेल, तर ते पण दाखवते व तुम्हाला कोणता रस्ता जवळ पडेल हे सांगते.

GPS FULL FORM :- GLOBAL POSITIONING SYSTEM

हे वाचलंत का? –
* Google तुमच्याबद्दल कोणती वैयक्तिक माहिती ठेवतो?
* सॅटेलाईट फोन काम करण्याची पद्धत आणि रिचार्जे प्लॅन

GPS कधी तयार करण्यात आले व त्याचा इतिहास

GPS हे आपल्यासाठी जरी नवीन असेल पण GPS TECHNOLOGY ही खुप जुनी आहे. ही TECHNOLOGY 1960 मध्ये अमेरिकेने त्यांच्या सैन्यासाठी विकसीत केली होती.

याच्या सहाय्याने ते त्यांच्या शत्रू वर लक्ष ठेवत होते. नंतर काही वर्षानी या TECHNOLOGY ला सर्वांना वापरण्याची परवानगी देण्यात आली. याच निर्णयामुळे आज सर्व मोबाईल मध्ये GPS आपल्याला पाहायला मिळते.


GPS हे तुम्हाला कसे TRACK करतो..?

GPS हे सॅटेलाईट वर काम करणारी यंत्रणा आहे. यासाठी 50 सॅटेलाईट हे दिवस रात्र पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारत आहेत. जे अमेरिकेनी अंतरीक्षात पाठविले आहेत. ते सॅटेलाईट पृथ्वीवर असलेल्या त्यांच्या रीसीवरला सिग्नल पाठवतात.

त्या सॅटेलाईट मधुन आलेल्या सिग्नल ला पकडण्यासाठी किवा समजण्यासाठी एक रिसिव्हर पाहिजे असतो. तो रिसिव्हर तुमचा मोबाईल पण असु शकतो.

जेंव्हा तुमचा मोबाईल त्या SIGNALS ला रीसीव करतो तेव्हा सॅटेलाईट तुमच्या लोकेशन ला तपासतात व तुमची अचुक अशी एक किलोमीटर अंतरातील लोकेशन दाखवतो.

म्हणुनच तुम्ही जेंव्हा GPS चालु करता व लोकेशन पाहता तेंव्हा तुमची लोकेशन दिसते त्यावेळेस तुमचा मोबाईल हा SIGNALरिसिव्हर च काम करत असतो.


GPS कसे काम करतो..?

तुमच्या लक्षात आले असेलच की GPS हे एक सॅटेलाईट वर चालणारी यंत्रणा आहे. ती नेमकी काम कशी करते ते आता आपन पाहु.

GPS हे एक सॅटेलाईट च नेटवर्क आहे जे वर अंतरीक्षात पृथ्वीपासून 20,000 कि.मी दुर एका कक्षेत फिरत आहे.

4 सॅटेलाईट आपली लोकेशन सांगतात म्हणून. तर त्या 4 मधील एक सॅटेलाईट हा वेळोवेळी तुमची सध्याची लोकेशन तुम्हाला पाठवीत राहतो.

तुमचा मोबाईल म्हणजेच GPS DEVICE जो सॅटेलाईट पासुन येणाऱ्या सिग्नल्स ना रिसिव्ह करतो व त्या सॅटेलाईट चे अंतर मोजून तुम्हाला तुमची लोकेशन सांगतो.


GPS कसे वापरतात..?

GPS वापरणे खुप सोपे आहे. हे सामान्य व्यक्तीसाठी खुले केले तेव्हापासून याला कुणी देखील वापरु शकतो. त्याच्या मोबाईल मध्ये GPS चा वापर करु शकतो.

खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही GPS कसे वापरतात हे शिकू शकता.

● तुमच्या मोबाईल मध्ये GOOGLE MAP म्हणून एक APP असेलच. नसेल तर ते तुम्ही PLAY STORE वरुन DOWNLOAD करु शकता.

● त्याला OPEN करा व मोबाईल ची लोकेशन चालु करा.

● आता त्यामध्ये वर एक SEARCH BOX आहे. त्याने तुम्हाला जिथे जायच आहे ती लोकेशन टाका.

● त्यानंतर खाली एक निळ्या रंगाचे DIRECTION चे बटन असेल तेथे क्लीक करा.

● आता START वर क्लिक करा आता तुम्हाला जिथे जायच आहे तेथील लोकेशन दाखवेल

आशा करतो की तुम्हाला ही GPS बद्दल ची माहिती समजली असेल अश्याच छान-छान माहितीसाठी माहितीलेक ला भेट देत राहा.
धन्यवाद….

– धीरज तायडे


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share