विंचू हा प्राणी जन्माला येताच, खरंच आपल्या आईला खातो?

पुथ्वी तलावावर सर्व प्रजाती मानवांनसाठी हानिकारक नाहीत, परंतु सुमारे 25 प्रजाती मानवांना मारण्यासाठी धोकादायक आहेत. आणि तो जीव वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहेत आणि आता अंटार्क्टिका सोडल्यास तो सर्व खंडांवर आढळतो.

तुम्ही कधी कल्पना केली आहे का की एखादा जीव स्वतःच्या आईला मारेल? मात्र, या पृथ्वीतलावर एक असा प्राणी आहे, जिच्या आईला जन्म देतानाच कळते, की ती आपल्या जीवाच्या शत्रूला जन्म देत आहे.

या पृथ्वीतलावर असा कोणताही प्राणी तुम्हाला माहीत आहे का, जो जन्मानंतर लगेचच आपल्या आईला खातो. आई आणि मुले यांच्यात एक वेगळे प्रेम असते, मग ते प्राणी असोत किंवा मानव. पण हा प्राणी थोडा वेगळा आहे.

हा प्राणी आपल्या घराभोवती आढळतो. ते खूप धोकादायक आणि विषारी देखील आहे. जर तुम्ही सापाबद्दल विचार करत असाल, तर हा तुमचा पूर्णपणे चुकीचा समज आहे.

वास्तविक हा प्राणी विंचू आहे. हे सहसा लहान ठिकाणी लपलेले आढळते आणि त्याचे विष खूप घातक असते. या प्राण्याशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, तो जन्माला येताच, आपल्या आईला खातो.

435 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेला आणि सागरी जीवातून जमिनीवर स्थलांतरित झालेला विंचू हा सर्वात जुना सजीव प्राणी आहे. ते भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि त्यांच्या शिकार वर हल्ला चढवण्यासाठी ते त्यांच्या विषारी डंकाचा वापर करतात. त्यांना त्यांचा बराचसा वेळ अंधारात, म्हणजे रात्री घालवायला आवडते.

मादी विंचू एका वेळी किमान 100 मुलांना जन्म देते. सुरक्षिततेच्या कारणास्तव, ती मादी विंचू त्यांना स्वतःच्या पाठीवर घेऊन जाते. या काळात विंचू आपल्या आईचे मांस खाऊन पोट भरत असतात. मादी विंचूचे शरीर पोकळ होऊन त्याचा मृत्यू होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.

विंचू बद्दल काही तथ्य

विंचूं बद्दल आणखी काही मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.!

१) माती नसेल तर विंचू चे जीवन जगणे थोडं कठीण ओवून बसत. लहान गुहा खोदण्यासाठी त्यांना मातीची गरज असते, ज्यामुळे त्यांना उष्णता आणि थंडीपासून संरक्षण मिळते. मात्र, शहरी भागात ते घर, बेड इत्यादींचा आसरा घेतात.

२) ते संभोग करण्यापूर्वी नृत्य करतात आणि त्यांचे प्रजनन हंगामी असते, याचा अर्थ वर्षाच्या कोणत्याही वेळी होऊ शकत नाही. हे फक्त उबदार महिन्यांतच होते.

३) काही प्रजातींना डोळेच नसतात. या प्रजाती दुर्मिळ आहेत आणि फक्त गुहांसारख्या गडद ठिकाणी आढळतात, म्हणून डोळे असणे त्यांच्यासाठी उपयुक्त नव्हते, म्हणून ते डोळ्यांशिवाय विकसित झाले.

४) एक विंचू 6 दिवसांपर्यंत श्वास रोखू शकतो.

५) सर्वात विषारी विंचू डेथस्टॉकर आहे आणि एक डेथस्टॉकर विंचू मादी सुमारे 155-87 मिनिटांत 35-227 बाळांना जन्म देऊ शकते.

Share