लोक पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाची नशा कशी करतात

Rave Party : जगात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. हे आपल्याला महिती असेलच, यातील काही साप बिनविषारी असतात, तर काही साप विषारी असतात. ज्याच्या दंशामुळे जीवही जातो. सोसिअल मीडिया च्या माध्यमातून सध्या सापाच्या विषाची चर्चा वाढली आहे.

सापाच्या विषारी तस्करी केली जाते. या बातम्या आपण बघतच आहोत. पण याबाबत अनेकांना काहीच माहीत नसतं. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊया..!

सापाच्या विषारी तस्करी अश्या प्रकारच्या केसेस समोर आल्यापासून बरेच लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की, लोक सापाच्या विषाची नशा कशी करतात. कारण सापाचं विष तर फार घातक आणि जीवघेणं असतं. तर यापासून नाश्या केल्याने जीवाला धोका नसतो का? असह्य प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतीलच.

सापाचं किंवा सापाच्या विषाचं नाव काढल्यावर कुणालाही घाम फुटतो. कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे की, विषारी सापाने दंश मारला तर काही सेकंदात जीव जातो. येथे कमालीची बाब म्हणजे, आजकाल रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर खूप वाढला आहे.

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिसर्चनुसार, आजकाल लोक साप किंवा विंचवासारख्या रेप्टाइल्सच्या विषाचा वापर मनोरंजक उद्देशांसाठी आणि नशेच्या पदार्थांना पर्याय म्हणून वापरलं जातं.

इंडियन जर्नल ऑफ फिजियोलॉजी अॅ ँड फार्माकोलॉजी रिसर्च च्या अनुसार सापाच्या विषाची नशा करण्यासाठी लोक सापाला आपल्या ओठांजवळ नेऊन दंश मारण्यास भाग पाडतात. त्याशिवाय नशा करण्यासाठी लोक ओठ, जीभ किंवा कानाच्या लोबवरही सापाकडून दंश मारून घेतात.

तसेच जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. नशा करण्यासाठी यांच्या काही खास प्रजातींचा वापर केला जातो. यासाठी या सापांची तस्करी केली जाते. या सापांचं विष फार जास्त घातक नसतं की, ज्यामुळे जीव जाईल.

सापाचे विष हजारो वर्षांपासून वापरले जात आहे. जेव्हा बाजारात औषधे नव्हती तेव्हा चेचक, कुष्ठरोग आणि जखमा भरण्यासाठी औषधाची आवश्यकता होती. तेव्हा प्राण्यांचे विष वापरले जात असे. या प्राण्यांमध्ये सापाच्या विषाचाही समावेश होता. काही सापांचे विष न्यूरोटॉक्सिक असते आणि त्याचा परिणाम वेदनाशून्यता असतो . म्हणूनच आता औषधांमध्ये याची शिफारस केली जाते.

सापाच्या विषातमध्ये असं काय खास आहे ?

रिपोर्टनुसार, सापाच्या विषामध्ये एक विशेष प्रकारचा आनंद आणि मज्या देणारे केमिकल असते. हे विष शरीराला एनर्जी ने भरते. त्याची नशा कित्येक तासांनंतरही कायम असते. सापाच्या विषाचे काही थेंब अल्कोहोलमध्ये मिसळल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. विशेषतः रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा वापर सर्रास केला जात आहे.

अशा ड्रगचा वापर थेट मृत्यूचा धोका वाढवतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार अशा ड्रगचा वापर मृत्यूचे कारण बनतो. गेल्या काही वर्षात 15 ते 64 वयोगटातील जगातील 5.5 टक्के म्हणजेच (27 कोटी) लोकसंख्येने अशी सायकोएक्टिव्ह ड्रग वापरली. यामध्ये वर्षाला 5 लाख लोकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 3,50,000 पुरुष आणि 1,50,000 महिला होत्या.

कोणत्या प्रजाती स[प वापरल्या जातात ?

काही विशिष्ट प्रजातींचे साप नशेसाठी वापरले जातात. यामध्ये नाजा-नाजा म्हणजेच (कोब्रा), ऑफियोड्रायस वर्नेलिस (ग्रीन स्नेक) आणि बंगेकरस केरिलियस (क्रोमन क्रेट) यांचा समावेश आहे. मुंबई आणि बंगलोर सह देशातील अनेक शहरांमध्ये सापाच्या विषाच्या एडिक्शन ची प्रकरणे समोर आली आहेत. अनेक ठिकाणाहून सापांचे विष जप्त करण्यात आले आहेत.

सायकोएक्टिव्ह ड्रग्ज म्हणजे काय ?

सायकोएक्टिव्ह ड्रग्ज हे औषध निर्मिती आणि रिसर्च क्षेत्रात कायदेशीररित्या वापरले जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय ते विकत घेणे किंवा एखाद्याला देणे हा अनेक देशांमध्ये गुन्हा आहे. सापाचे विष सायकोएक्टिव्ह औषधांच्या श्रेणीत येते.

एका कायद्यानुसार वेगवेगळ्या प्रजातीच्या आणि जंगली जीवांचा असा गैरवापर करणं एक गंभीर गुन्हा आहे.
कायद्यानुसार यासाठी तीन ते चार वर्षाची शिक्षा होऊ शकते. जिथे बेकायदेशीर मादक पदार्थ पुरवले जातात. भारतात अशा रेव्ह पार्ट्यांवर बंदी आहे.

एखाद्या व्यक्तीने अशा पार्टीला गेल्यास किंवा त्याचे आयोजन केल्यास, पकडल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळेच नार्कोटिक्स विभाग यांच्याकडून देशातील विविध भागात अशा पार्टीवर अनेकदा छापे टाकले जातात.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻