कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी.. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नवीन अर्ज नोदणी सुरू झाली आहे.
नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो… तुमच्या करिता आम्ही अतिशय आनंदाची बातमी घेवून आलो आहे. ती बातमी पुढील प्रमाणे आहे.
महावितरणच्या द्वारे शेतकऱ्यांना जे सौर कृषी पंप दिले जात होते.
ज्याला आपण मुखमंत्री सौर कृषी पंप योजना सुद्धा म्हणतो. त्यातील प्रलंबित जे शेतकरी आहे त्यांची नोदणी सुरू झाली आहे.
महाराष्ट्र सरकारचे धेय आहे. राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना सोलर पंप द्यावा जेणेकरून त्यांना आपल्या शेती ला दिवसा पाणी देणे शक्य होईल. ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहे. जे शेतकरी पैसे भरून महावितरणच्या वीज जोडणी साठी प्रलंबित आहेत.
या शेतकऱ्यांना विजेच्या जोडणी ऐवजी सोलर पंप जोडणी दिली जाईल.
आपण जर मूख्यमंत्री सौर कृषी पंप योजना म्हणजेच, महावितरण द्वारे दिल्या जाणाऱ्या सोलर पंप योजने मध्ये उत्सुक असाल तर आपण या करिता अर्ज करू शकता.
आपण हा अर्ज भरून महावितरण ला सांगत आहात, की मी सोलर पंप योजने मध्ये उत्सुक आहे. मला वीज जोडणी ऐवजी सोलर पंप द्या.
सोलर पंपाचे वीज पंपा पेक्षा फायदे
सोलर पंप तुमचे महावितरण वरील अवलंबन कमी करते.
आपण आपल्या पिकाला रोज दिवसा पाणी देवू शकतो ते देखील आपल्या वेळी नुसार.
आपले हजारो रुपये वाचतात, जे आपण महावितरण ला बिला स्वरूपात देतो.
ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप नकोय त्यांनी या मध्ये अर्ज करू नये.
अर्ज कश्या प्रकारे भरायचा व कुठे भरायचा?
- सर्वात आधी आपल्याला खालील संकेस्थळावर जायचे आहे.
- आपल्याला जो प्रलंबित ग्राहक नंबर मिळाला, असेल तो ग्राहक क्रमांक तिथ दिलेल्या एका रिकाम्या जागी भरा.
- नंतर तिथे एक नोदणी करा, म्हणून बटन असेल त्या वर क्लिक करा.
- तुम्ही तेथे क्लिक केलं की तुमच्या समोर एक अर्ज येईल, तो अर्ज आधी पूर्ण वाचून घ्या त्यावर तुमची माहिती दिली असेल.
- आता तो अर्ज व्यवस्थित काहीही चूक न होवू देता पूर्ण भरून घ्या आणि तिथ दिल्या असलेल्या सबमिट या बटन वर क्लिक करा.
- झाला आपला अर्ज भरून.
शेती संबंधी आणखी माहिती करिता आमच्या WhatsApp ग्रूप ला जॉईन करा, यामुळे आपल्याला शेती संबंधी सर्व माहिती आपल्या मोबाईल मध्ये मिळेल.
हे वाचलंत का ? –