कोमट पाणी पिण्याचे फायदे
Hot Water Benefits In Marathi
तुम्ही डॉक्टर कडून नेहमी ऐकले असेलच की, पाणी नेहमी गरम करून प्यावे. बरेचश्या देशांमध्ये डॉक्टर सुचवतात जिथे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत सुरक्षित नाहीत, अशा ठिकाणचे पाणी पिणे हे आरोग्यास नुकसान दायक आहे.
काहीवेळा मुलांमध्ये सामान्य आजार होण्याचे कारण हे पाणी असू शकते.
असुरक्षित पाणी पिण्यामुळे दुर्गम भागात जलयुक्त रोगाचा प्रादुर्भाव होऊन संसर्गजन्य आजारांनी बळी गेलेले आहेत.
पाण्यामुळे होणा-या आजारांच्या घटनेपासून बचाव करण्यासाठी, पिण्याचे पाणी उकळणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
डॉक्टरांच्या मते , तीन मिनिटांपर्यंत उकळलेले पाणी रोगास कारणीभूत असलेले जीव गियर्डिया सिस्ट्ससह (giardia cysts) बॅक्टेरियाला नष्ट करते.
गरम किंवा थंड पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि हायड्रेटेड राहते. थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी हे पचनक्रिया सुधारते, रक्तसंचय दूर करते आणि शरीराला विश्रांती देखील देते.
गरम पेये पिताना, संशोधक सांगतात की, १३० ते १६० डिग्री फारेनहाइट (५४ आणि ७१ डिग्री सेल्सियस) दरम्यान पाणी तापलेले असावे. या वरील तापमानामुळे पाण्यात बर्न्स किंवा स्कॅलड्स होऊ शकतात.
गरम पाणी पिण्याचे फायदे (Garam pani pinyache fayade)
१. पिण्याचे पाणी गरम केल्यामुळे पाण्यातील काही जीवाणू, विषाणू, अल्सर आणि वर्म्स मरतात.
२. पाण्यातील रोगजनकांना काढून टाकण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्याची ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे. थंड पाणी पिण्याच्या तुलनेत गरम पाणी पिणे हे सुरक्षित आणि शरीरासाठी फायदेशीर आहे.
३. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी पिल्याने तुम्हाला लघवी बद्दल चे आजार तसेच लघवी करतांना होणारा त्रास कमी होतो.
४. गरम पाणी पिल्यामुळे तुमची त्वचा ही सुंदर, ताजी आणि टवटवीत दिसते.
५. तुम्हाला जर गॅस आणि ऍसिडिटी चा प्रोब्लेम असेल तर, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी पिणे तुमच्या साठी फायदेशीर ठरत. यामुळे तुमच्या पोटातील गॅस चे प्रॉब्लेम दूर होतात.
६. दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिण्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगले तसेच वेगवान होते. याव्यतिरिक्त, गरम पाणी पिण्यामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे आपल्याला घाम फुटतो. नंतर शरीरातील सर्व विषारी द्रव घामावाटे बाहेर पडतो.
७. तुम्हाला दमा, उचकी आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवल्यास गरम पाणी पिण्यामुळे शरीराला फायदा होतो.
८. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू मिसळून पिल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळतो, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
९. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी देखील खूप फायदेशीर आहे. पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी, जेवण झाल्यानंतर एक तासाने कोमट पाणी प्या. तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल.
१०. कधीकधी मासिक पाळी दरम्यान पोटात वेदना होतात. अशा समस्येमध्ये कोमट पाणी पिणे योग्य आहे. कोमट पाणी हे पाळीच्या काळात स्नायूंच्या होणाऱ्या तणावातून मुक्त करतो.
११. बर्याच वेळा असे होते की, काहीही न खाता पोट भरले भरलेसे जाणवते आणि त्यामुळे भूक लागत नाही. अशा समस्येमध्ये एका ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस, काळी मिरची आणि मीठ मिसळा आणि प्या. हे मिश्रण पिण्यामुळे पोटाची जडपणा कमी होईल आणि तुमची भूकही वाढेल.
अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद.!
- सागर राऊत
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.